महेश कोठारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
महेश कोठारे
जन्म सप्टेंबर २८, इ.स. १९५७
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट
बॉलीवूड
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८५ - चालू
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट धूमधडाका
दे दणा दण
थरथराट
धडाकेबाज
झपाटलेला,
झपाटलेला २
प्रमुख टीव्ही कार्यक्रम जय मल्हार
पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार
महाराष्ट्र शासन पुरस्कार
स्क्रीन पुरस्कार
वडील अंबर कोठारे
अपत्ये आदिनाथ कोठारे
अधिकृत संकेतस्थळ http://maheshkothare.blogspot.com

महेश कोठारे (सप्टेंबर २८, इ.स. १९५७ - हयात) हे मराठी चित्रपट-अभिनेते आहेत.त्याबरोबर ते मराठी चित्रपट-दिग्दर्शक व निर्माता आहेत.

जीवन[संपादन]

महेश कोठारे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है" हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले [संदर्भ हवा].

महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिलीदेखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असतानादेखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकी पात्र वठवण्याचे साहसही त्यांनी स्वीकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचूप गुपचूप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या. कारकीर्द भरात असताना कोठार्‍यांनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयही घेतला. धुमधडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्ड्यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठार्‍यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली.

महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठार्‍यंनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही दमदार पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाह या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांची मन उधाण् वार्‍याचे ही मालिका लोकप्रिय ठरली.

कारकीर्द[संपादन]

चित्रपट[संपादन]

महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेले मराठी चित्रपट


महेश कोठारे दिग्दर्शित हिंदी चित्रपट


महेश कोठारे अभिनित चित्रपट


महेश कोठारे यांचे बालकलाकार म्हणून अभिनित चित्रपट


दूरचित्रवाणी[संपादन]

  • मस्त मस्त है जिंदगी (झी टीव्ही)
  • मन उधाण वार्‍याचे (स्टार प्रवाह)

बाह्य दुवे[संपादन]