नवा गडी नवं राज्य
नवा गडी नवं राज्य | |
---|---|
निर्माता | श्रुती मराठे, गौरव घाटणेकर |
निर्मिती संस्था | ब्लॅक कॉफी प्रोडक्शन |
कलाकार | खाली पहा |
देश | भारत |
भाषा | मराठी |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता आणि सकाळी ११.३० वाजता (पुनःप्रक्षेपण) |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | ८ ऑगस्ट २०२२ – चालू |
अधिक माहिती |
नवा गडी नवं राज्य ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.[१]
कलाकार[संपादन]
- अनिता दाते-केळकर - रमा पुरुषोत्तम पाटकर / रमा राघव कर्णिक
- कश्यप परुळेकर - राघव कर्णिक[२]
- पल्लवी पाटील - आनंदी वामन परब / आनंदी राघव कर्णिक
- साईशा भोईर - रेवा राघव कर्णिक (चिंगी)[३]
- वर्षा दांदळे - सुलक्षणा कर्णिक
- किर्ती पेंढारकर - वर्षा कर्णिक
- अभय खडापकर - वामन परब
- प्राजक्ता वाड्ये - माई परब
- मृणाल चेंबूरकर - मालती पुरुषोत्तम पाटकर
- पंकज चेंबूरकर - पुरुषोत्तम पाटकर
- श्रीपाद पडवळ - टग्या
- अनिरुद्ध हरी - अतुल
- शेखर फडके - शिवानंद गावडे (नंदू)
- संजीवनी जाधव - इंदू गावडे
- सौरभ गोखले - विराज इनामदार
- मिलिंद जोशी
- अदिती सारंगधर
विशेष भाग[संपादन]
- जीव लावला की संसारातला प्रत्येक डाव जिंकता येतो. (८ ऑगस्ट २०२२)
- संकटांमुळे रखडलेली राघवची वरात अखेर आनंदीच्या दारात हजर होणार. (११ ऑगस्ट २०२२)
- आनंदी-राघवच्या आयुष्यात रमा अवतरणार. (१६ ऑगस्ट २०२२)
- रोज नवा खेळ खेळायला होणार आनंदी आणि रमा सज्ज. (२० ऑगस्ट २०२२)
- आनंदीच्या गृहप्रवेशाला झाली रमा सज्ज, नवा गडी नवं राज्य. (२७ ऑगस्ट २०२२)
- रमाच्या रूपात आनंदीला मिळणार नवी सखी. (३१ ऑगस्ट २०२२)
- आनंदीला मिळणार तिने न केलेल्या चुकीची शिक्षा. (३ सप्टेंबर २०२२)
- आनंदी सोडवू शकेल का राघव नावाचं अवघड कोडं? (८ सप्टेंबर २०२२)
- रमाच्या घरात आनंदी निर्माण करु शकेल का स्वतःचं स्थान? (११ सप्टेंबर २०२२)
- आनंदी राघवकडे करणार रमाच्या घरात गणपती बसवण्याचा हट्ट. (१३ सप्टेंबर २०२२)
- रमाच्या घरात बसणार आनंदीने बनवलेला गणपती. (१५ सप्टेंबर २०२२)
- आमच्या चिंगीच्या गणपतीच्या दर्शनाला यायचं हं! (२२ सप्टेंबर २०२२)
- आनंदी घेणार मानाच्या लालबागच्या राजाचं दर्शन. (२५ सप्टेंबर २०२२)
- मुंबईच्या गर्दीत आनंदी हरवणार. (२८ सप्टेंबर २०२२)
- आनंदीला सापडेल का राघवच्या घरची वाट? (३० सप्टेंबर २०२२)
- रमाचा सल्ला पडणार आनंदीला महाग. (४ ऑक्टोबर २०२२)
- राघवला होणार त्याच्या चुकीची जाणीव. (१३ ऑक्टोबर २०२२)
- आनंदी सांगणार रमालाच भुताच्या गोष्टी. (५ नोव्हेंबर २०२२)
- चिंगीच्या खोटं बोलण्याची शिक्षा मिळणार आनंदीला. (८ नोव्हेंबर २०२२)
- चिंगी आनंदीला आई म्हणून स्वीकारणार का? (१३ नोव्हेंबर २०२२)
- रमाचा आनंदीला त्रास देण्याचा प्लॅन तिच्यावरच उलटणार. (६ डिसेंबर २०२२)
- सर्वपित्री अमावास्येला आनंदीला पटणार रमाची खरी ओळख. (१० डिसेंबर २०२२)
- मैत्रीण की सवत, आनंदी कसं निभावणार नवीन नातं? (१ जानेवारी २०२३)
- आनंदी कसं सावरणार स्वतःला रमा नावाच्या वादळातून? (१२ मार्च २०२३)
- आनंदी एका निर्णयावर होणार ठाम, काही झालं तरी आता रमाला मिळणार नाही तिच्या आयुष्यात स्थान. (७ मे २०२३)
निर्मिती[संपादन]
श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर या जोडप्याने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवून ब्लॅक कॉफी प्रोडक्शनद्वारे या नव्या मालिकेची निर्मिती केली.[४] यात कश्यप परुळेकर, पल्लवी पाटील आणि अनिता दाते-केळकर मुख्य भूमिकेत आहेत.[५]
संदर्भ[संपादन]
- ^ "'राधिका मसाले'ची मालकीण आता दाखवणार वेगळा ठसका; अनिता दातेची नवी हटके मालिका". न्यूझ१८ लोकमत.
- ^ "मराठी मालिकेचा रंगला प्रीमियर सोहळा, कार्यक्रमाचे Photo झाले व्हायरल". महाराष्ट्र टाइम्स.
- ^ "साईशानं शाळेसाठी 'रंग माझा वेगळा' मालिका सोडली? खरं कारण आलं समोर". महाराष्ट्र टाइम्स.
- ^ "'राधा ही बावरी' फेम अभिनेत्री नवऱ्यासह करतेय 'या' मालिकेची निर्मिती". न्यूझ१८ लोकमत.
- ^ "भूमिकेसाठी काही पण! 'नवा गडी नवं राज्य'साठी पल्लवी पाटील शिकली ही गोष्ट". महाराष्ट्र टाइम्स.
बाह्य दुवे[संपादन]
रात्री ९च्या मालिका |
---|
आभाळमाया | वादळवाट | वहिनीसाहेब | अभिलाषा | कळत नकळत | लक्ष्मणरेषा | शुभं करोति | अमरप्रेम | पिंजरा | अजूनही चांदरात आहे | तुझं माझं जमेना | एका लग्नाची तिसरी गोष्ट | का रे दुरावा | काहे दिया परदेस | स्वराज्यरक्षक संभाजी | माझ्या नवऱ्याची बायको | एक गाव भुताचा | माझा होशील ना | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | नवा गडी नवं राज्य |