देवकी पंडित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

देवकी पंडित या मराठी गायिका आहेत. सुरुवातीला आईकडे-उषा पंडित- यांच्याकडे शिकल्यानंतर त्यांनी वयाच्या ननव्या वर्षापासून पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे काही काळ संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर किशोरी आमोणकर, व जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शिकायची संधी त्यांना मिळाली. गुरूंकडून सतत शिकत रहावे या वृत्तीने त्या पुढेहा बबनराव हळदणकर, डॉ अरुण द्रविड यांची मार्गदर्शन घेत राहिल्या.


Copyright-problem paste.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकूर http://www.loksatta.com/viva-news/devaki-pandit-speak-with-ordinance-in-viva-lounge-1148522/ येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.पंडित वसंतराव कुलकर्णीकडे शिकत असताना ते पूर्वीच्या गायकांची उदाहरणे द्यायचे. पूर्वी गायक कसे १२-१२ तास रियाज करत असत हे सांगायचे. एकदा ते दोन महिन्यांकरता बाहेरगावी जात असताना रियाज व्यवस्थित चालू ठेवण्यास सांगून गेले. तेव्हा देवकी पंडित यांनी ते ते इतके मनावर घेतले, की भरपूर रियाज करायचा एवढा एकच विचार मनात ठेवून त्या गात राहिल्या. दोन महिने सतत गायल्यामुळे त्यांचा आवाज बंदच झाला. त्यानंतर त्या जवळजवळ तीन वर्षे गाऊच शकल्या नाहीत. त्या दोन-तीन वर्षांच्या काळात देवकी पंडित तंबोरा लावून बसायच्या आणि गाता येत नसल्याने केवळ तंबोर्‍याचे सूर ऐकत राहायच्या. त्या काळात त्यांनी सगळ्यांची खूप गाणी ऐकली. तंबोरा योग्य रीतीने कसा लावला पाहिजे, खर्ज, पंचम कसा लावायचा या गोष्टी पुन्हा पुन्हा करून त्यांनी आत्मसात केले. याच काळात देवकी पंडित हार्मोनियम व तबला शिकल्या.

शीर्षकगीते[संपादन]

देवकी पंडित यांनी अनेक हिंदी-मराठी दूरचित्रवाणी मालिकांची शीर्षकगीते गायिली आहेत. त्यांपैकी काही मालिकांची नावे -

देवकी पंडित यांनी गायिलेली चित्रपट गीते[संपादन]

देवकी पंडित यांनी गायलेली भावगीते[संपादन]

  • माझी उदास गीते तू ऐकतोस का रे? (कवी - सुरेश भट)
  • रंगुनी रंगात सार्‍या (कवी - सुरेश भट, संगीत - सुधीर मोघे)

बाह्य दुवे[संपादन]

  1. संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले