दिल दोस्ती दुनियादारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिल दोस्ती दुनियादारी
दिग्दर्शक संजय जाधव
कलाकार सुव्रत जोशी
अमेय वाघ
पुष्कराज चिरपूटकर
पूजा ठोंबरे
स्वानंदी टिकेकर
सखी गोखले
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३०१
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ०९ मार्च २०१५ – २० फेब्रुवारी २०१६
अधिक माहिती
आधी चला हवा येऊ द्या / अस्मिता
सारखे कार्यक्रम दिल दोस्ती दोबारा

दिल दोस्ती दुनियादारी ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील तरुणांची आवडती एक मालिका आहे.[१] या मालिकेचे निर्माते संजय जाधव आहेत.[२] या मालिकेचे पुनःप्रसारण झी युवा वाहिनीवर करण्यात आले होते.[३]

मुंबईत एकाच फ्लॅटमध्ये भाड्याने राहणार्‍या सहा मित्रांची ही गोष्ट आहे. त्यांपैकी सुजय मुख्य भाडेकरू असून मीनल, ॲना, रेश्मा, आशुतोष व कैवल्य हे बाकीचे भाडेकरू आहेत. हे सहा मित्र फक्त रुम शेअर करत नाहीत तर ते त्यांचे जीवन, एकमेकांची सुख-दुःख सुद्धा शेअर करतात. मीनल ही एक ज्युनियर ॲक्ट्रेस असते, तर ॲना ही ड्रेस डिझायनर असते. सुजय एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असतो, तर कैवल्य हा एक गायक आणि गिटार वादक असतो. हे सहा जण मुंबईत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले असतात आणि एकमेकांच्या मदतीने मजा-मस्ती करत जीवन कसे जगावे हे सांगतात.

कलाकार[संपादन]

• मुख्य पात्र:

 • सुव्रत जोशी - सुजय साठे (स्कॉलर)
 • अमेय वाघ - कैवल्य कारखानीस
 • पुष्कराज चिरपूटकर - आशुतोष शिवलकर (आशू)
 • पूजा ठोंबरे - ॲना मॅथ्यूज
 • स्वानंदी टिकेकर - मीनल शेवाळे
 • सखी गोखले - रेश्मा इनामदार


• सहाय्यक पात्र:

 • पंकज खामकर - राकेश इनामदार
 • ललित प्रभाकर - कबीर
 • ऋचा आपटे - सुप्रिया साठे (पीयू)
 • रसिका वेंगुर्लेकर - प्रगल्भा नागांवकर
 • सुवेधा देसाई - किंजल
 • श्वेता आंबेकर - रेवा पाटील