विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
माझा होशील ना
|
दिग्दर्शक
|
अनिकेत साने
|
निर्माता
|
सुजय हांडे
|
कलाकार
|
खाली पहा
|
देश
|
भारत
|
भाषा
|
मराठी
|
एपिसोड संख्या
|
३८४
|
निर्मिती माहिती
|
प्रसारणाची वेळ
|
* सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
- सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता (१३ जुलै २०२० पासून)
|
प्रसारण माहिती
|
वाहिनी
|
झी मराठी
|
पहिला भाग
|
२ – २७ मार्च २०२०
|
प्रथम प्रसारण
|
१३ जुलै २०२० – २८ ऑगस्ट २०२१
|
अधिक माहिती
|
माझा होशील ना ही अनिकेत साने दिग्दर्शित झी मराठी वाहिनीवरील एक मालिका आहे. या मालिकेचे प्रमुख कलाकार विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे आहेत.
- गौतमी देशपांडे - सई शशिकांत बिराजदार / सई आदित्य देसाई
- विराजस कुलकर्णी - आदित्य विजय देसाई (कश्यप)
- मुग्धा पुराणिक - नयना यशपाल नाईक
- अतुल परचुरे - जयवंत देसाई (जेडी)
- सुलेखा तळवलकर / वर्षा घाटपांडे - शर्मिला शशिकांत बिराजदार
- अतुल काळे - शशिकांत बिराजदार (बबन)
- विद्याधर जोशी - जगदीश विनायक ब्रह्मे (दादा)
- सीमा देशमुख - सिंधू जगदीश ब्रह्मे
- विनय येडेकर - जनार्दन विनायक ब्रह्मे (भाई)
- सुनील तावडे - प्रभाकर विनायक ब्रह्मे (बंधू)
- निखिल रत्नपारखी - स्वानंद विनायक ब्रह्मे (पिंट्या)
- दीप्ती जोशी - गुलप्रीत प्रभाकर ब्रह्मे
- राजवीरसिंह राजे - बळवंत प्रभाकर ब्रह्मे (बिल्लू)
- अच्युत पोतदार - विनायक ब्रह्मे (अप्पा)
- आशय कुलकर्णी - सुयश सुहास पटवर्धन (डॉक)
- धीरज कांबळे - हरिश्चंद्र (फिल्टर)
- सानिका गाडगीळ - मेघना रघुवीर काशीकर
- प्रदीप जोशी - रघुवीर काशीकर
- लीना पालेकर - सुजाता
- राजेश उके - चंदू
- अनिषा सबनीस - मधुरा
- स्नेहल शिदम - विद्या भगवान झगडे
- सुजय हांडे - माँटी जयवंत देसाई
- कोमल धांडे - हिरा जोहरी
- विवेक जोशी - श्री. जोशी
- सई आदित्यला सांगणार तिच्या मनातल्या प्रेमाचं गुपित. (२ मार्च २०२०)
- दादा पकडणार का सई आदित्यची शर्टाची चोरी? (३ मार्च २०२०)
- सुयश सईची माफी मागणार, पण स्वतःहून की आदित्यच्या सांगण्यावरून? (४ मार्च २०२०)
- आज सई सुयशला नडेल, त्याचा माज आणि लग्न मोडेल. (५ मार्च २०२०)
- आदित्यला घोड्यावर बसवण्यासाठी सुरू होणार मामांची घोडदौड. (६ मार्च २०२०)
- स्थळ म्हणून दादापुढे येणार सईचा फोटो. (७ मार्च २०२०)
- सईसाठी आदित्य आणि आदित्यसाठी सई, पण दादाला आवरणार बंधू आणि भाई. (९ मार्च २०२०)
- सई नावाचं चक्रीवादळ ब्रह्मेंचं घर पेलवू शकेल का? (१० मार्च २०२०)
- सईला कळेल का आदित्यची खरी अडचण, फाटके शूज की पैशांची चणचण? (११ मार्च २०२०)
- मिडल क्लास हाच वरचा क्लास. (१२ मार्च २०२०)
- प्रिय आदित्यला, अडीअडचणीच्या वेळी बिराजदारांकडून छोटीशी भेट? (१३ मार्च २०२०)
- सई-आदित्यच्या निखळ मैत्रीचे शर्मिला करणार 'एक घाव दोन तुकडे'. (१४ मार्च २०२०)
- बिराजदारांच्या श्रीमंतीला तडा देणार आदित्यचा मध्यमवर्गीय स्वाभिमान. (१६ मार्च २०२०)
- गैरसमजुतीचा पडदा उलगडणार, कारण आज आदित्य सईचं गिफ्ट उघडणार. (१७ जुलै २०२०)
- सईच्या नाकावरचा राग आदित्य कोणत्या औषधाने घालवणार? (१८ जुलै २०२०)
- आदित्यची रातराणी सईची कळी खुलवणार? (२१ जुलै २०२०)
- आदित्यपुढे उलगडणार भूतकाळातील एक गुपित. (२३ जुलै २०२०)
- सईला रातराणी आणि आदित्यला त्याची आई सापडणार का? (२५ जुलै २०२०)
- आदित्यच्या आयुष्यात होणार आईचा नव्याने जन्म. (२८ जुलै २०२०)
- सईला रातराणी कोण मिळवून देणार सुयश की आदित्य? (३० जुलै २०२०)
- आदित्य खरंच सईचे सगळे हट्ट पुरवणार? (१ ऑगस्ट २०२०)
- सई-आदित्यचा एक उनाड दिवस! (३ ऑगस्ट २०२०)
- सई-आदित्य खरंच आहेत का 'मेड फॉर इच अदर'? (५ ऑगस्ट २०२०)
- सईला होऊ लागली आहे का आदित्यबद्दल प्रेमाची जाणीव? (७ ऑगस्ट २०२०)
- सईच्या हट्टीपणाची शिक्षा भोगणार आदित्य. (८ ऑगस्ट २०२०)
- आदित्यच्या नशिबाला पुन्हा नवी ठोकर, कंपनीचा मालक असूनही आज होणार नोकर. (११ ऑगस्ट २०२०)
- आला झटका की दिला फटका, समशेरसिंह करणार आज लाज्जोची सुटका. (१३ ऑगस्ट २०२०)
- सई आदित्यची शपथ पाळणार, पण ती दादाच्या रागाला कशी टाळणार? (१५ ऑगस्ट २०२०)
- फायद्यासाठी करणार आदित्यशी यारी, आज सुयश उभा राहणार ब्रह्मेंच्या दारी. (१७ ऑगस्ट २०२०)
- मल्होत्राच्या पापांचा भरलाय घडा, आता ब्रह्मेच शिकवणार त्याला धडा. (१९ ऑगस्ट २०२०)
- आदित्यवर अन्याय आणि कंपनीचा तोटा, मल्होत्राच्या डोक्यावर आता ब्रह्मेंचा सोटा. (२१ ऑगस्ट २०२०)
- आदित्य सुयशला देतोय साथ, सई पकडणार का रंगेहाथ? (२२ ऑगस्ट २०२०)
- आंधळा जेव्हा डोळे मिटेल, सुयशचा चांगुलपणा तेव्हाच सईला पटेल. (२५ ऑगस्ट २०२०)
- सईचं भलं व्हावं हीच आदित्यची इच्छा, पण मनातला गोंधळ सोडेल का त्याचा पिच्छा? (२८ ऑगस्ट २०२०)
- रात्री जागून करून विचार, दादा पहाटे फरार. (३१ ऑगस्ट २०२०)
- आदित्य हैराण सुयश आजारी, कोण बरं येणार आज ब्रह्मेंच्या दारी? (१ सप्टेंबर २०२०)
- फराळ बनवतेय सई ब्रह्मेंच्या घरी, होणाऱ्या सुनेची आज परीक्षा खरी. (५ सप्टेंबर २०२०)
- सई व्हावी सून भाई-बंधूची ही आस, पण कोण जिंकेल दादाचा विश्वास? (९ सप्टेंबर २०२०)
- दादाने भरून काढली सुनेची उणीव, सईला होणार खऱ्या प्रेमाची जाणीव. (२७ सप्टेंबर २०२०)
- चकलीच्या परीक्षेचा लागणार निकाल, सुनेची पदवी होणार का सईला बहाल? (४ ऑक्टोबर २०२०)
- सई-आदित्यच्या डोक्यावर अक्षदा पडणार, दादाला बांगड्या सईच्या हाती सापडणार. (११ ऑक्टोबर २०२०)
- संकटाच्या वेळी सई ठामपणे उभी ब्रह्मे कुटुंबापाठी. (१८ ऑक्टोबर २०२०)
- सुयशच्या हट्टापायी सई सोडेल का आदित्यची साथ? (१ नोव्हेंबर २०२०)
- सई-आदित्यच्या मनातलं आज येणार का ओठांवर? (२६ नोव्हेंबर २०२०)
- सईपासून वेगळा झालेला आदित्यचा रस्ता जाणार का मेघनाकडे? (१३ डिसेंबर २०२०)
- आदित्यचं प्रेम मिळवण्यासाठी सईचा डॅशिंग प्लॅन. (१४ डिसेंबर २०२०)
- सईचा प्रवास मुंबई ते दापोली व्हाया आदित्य. (१५ डिसेंबर २०२०)
- मनातली इच्छा पूर्ण होणार, सये तूच ह्या गावची सून होणार. (१६ डिसेंबर २०२०)
- आदित्यचं लग्न कॅन्सल? (१७ डिसेंबर २०२०)
- आदित्य तू माझ्याशी लग्न करशील? सईचा थेट सवाल. (१८ डिसेंबर २०२०)
- तुजविण मीही अपुरी, तुजविण मीही आधा अन् अधुरा. (१९ डिसेंबर २०२०)
- आदित्य कसं पार पाडणार कर्तव्य आणि सईच्या साखरपुड्याचं अग्निदिव्य? (२ जानेवारी २०२१)
- नियतीचा खेळ की नाइलाज, सईच्या साखरपुड्याला आदित्य पोहोचणार आज. (५ जानेवारी २०२१)
- साखरपुड्यात सुयशचा तमाशा, धुळीला मिळणार सईच्या आशा. (७ जानेवारी २०२१)
- मनातलं प्रेम आलं नाही ओठात, तरी आदित्यच घालणार अंगठी सईच्या बोटात. (९ जानेवारी २०२१)
- ब्रह्मेंच्या दारात मेघना सोडून आपलं माहेर, आदित्यला मुठीत ठेवून सईला काढणार बाहेर? (१२ जानेवारी २०२१)
- आदित्य आणि सईमधलं वातावरण तंग, मेघना आता दाखवणार तिचे खरे रंग. (१४ जानेवारी २०२१)
- केळवणाचा बेत पुरता बिघडणार, सईसमोर आदित्यचं गुपित उलगडणार. (१६ जानेवारी २०२१)
- सुयश झालाय सईसाठी जीवघेणा त्रास, भोगावा लागणार का तिच्या डॅडूला तुरुंगवास? (१९ जानेवारी २०२१)
- मेघनाचे खडे बोल सईला बोचणार, पण सईचा निरोप आदित्यपर्यंत कसा पोहोचणार? (२१ जानेवारी २०२१)
- सईमध्ये गुंतलंय आदित्यचं हृदय, ऐन साखरपुड्यात निघणार सईचाच विषय. (२३ जानेवारी २०२१)
- सई-आदित्यचं प्रेम पार करणार हद्द, मेघना आणि आदित्यचा साखरपुडा रद्द. (२६ जानेवारी २०२१)
- सईची स्वप्नं आज होणार भंग, लागणार का गाली सुयशच्या हळदीचा रंग? (२८ जानेवारी २०२१)
- टांगा पलटी घोडे फरार, सईला पळवायला मामा तयार. (३० जानेवारी २०२१)
- ऐका दादा ऐका ताई, सई-आदित्यची लगीनघाई. (२ फेब्रुवारी २०२१)
- ब्रह्मेंची उडाली तारांबळ, सई-आदित्यचं लग्न आलं जवळ. (४ फेब्रुवारी २०२१)
- बिलंदर मामांचा भाचा बोहल्यावर चढणार, बाईविना घराला हक्काची सूनबाई मिळणार. (६ फेब्रुवारी २०२१)
- सई चढणार बोहल्यावर, कळी खुलणार गालावर, ब्रह्मेंचा लाडोबा आदित्य होणार नवरोबा. (९ फेब्रुवारी २०२१)
- रातराणी आणि सोनचाफा फुलणार, सई-आदित्यचं लग्न लागणार. (११ फेब्रुवारी २०२१)
- ब्रह्मेंच्या घराचा राखून मान, आदित्य-सईचं शुभमंगल पण सावधान. (१३ फेब्रुवारी २०२१)
- व्हॅलेंटाईन्स डे होणार खास, सई भरवणार आदित्यला प्रेमाचा घास. (१४ फेब्रुवारी २०२१)
- हळद लागली हळद लागली, सून येण्याची आस जागली. (१५ फेब्रुवारी २०२१)
- आली लग्नघटी समीप नवरा, आदित्य-सईचा जोडा शोभतो खरा. (१६ फेब्रुवारी २०२१)
- घरात सून येण्याची आता संपली रुखरुख, पाचही ब्रह्मे हरखून गेले पाहता सूनमुख. (१७ फेब्रुवारी २०२१)
- सूनबाई यावी म्हणून मामांनी केले नवस आणि ब्रह्मेंच्या घरात सईचा आज पहिलाच दिवस. (१८ फेब्रुवारी २०२१)
- ब्रह्मेंच्या घरात पाच इरसाल पात्रं, त्यांच्या गर्दीत रंगणार सई-आदित्यची पहिली रात्र. (१९ फेब्रुवारी २०२१)
- सईच्या वेडेपणातच दडलीये तिची हुशारी आणि सईची मम्मा येणार ब्रह्मेंच्या दारी. (२० फेब्रुवारी २०२१)
- सईची मम्मा बेटूच्या सासरी आलीये आज, पण ब्रह्मेंची पदोपदी काढू पाहतेय लाज. (२४ फेब्रुवारी २०२१)
- मला सुखसुविधा नको फक्त तुमचं प्रेम हवंय. (१६ मार्च २०२१)
- बंद पेटी उघडणार गुपितं सारी उलगडणार, आदित्यची खरी ओळख आज सईसमोर येणार का? (१८ मार्च २०२१)
- समशेरसिंह सईची आज साडीत होणार भेट, आदर्श गृहिणी होण्याची मामांशी लावणार बेट. (२० मार्च २०२१)
- आदित्य-सईच्या एकांतासाठी मामांची घराकडे पाठ, बसणार नवा धक्का जेव्हा सिंधूशी पडणार गाठ. (२३ मार्च २०२१)
- हादरून टाकणार ब्रह्मेंचं घरदार, घरातलाच पण बाहेरचा छोटा सरदार. (२६ मार्च २०२१)
- बंधूच्या पाठीवर काळजीचा दगड, बिल्लूच्या पापाजींचं नाव होणार का उघड? (२८ मार्च २०२१)
- सईला खेळायची आहे रंगांची होळी, पण दादाच्या रागावर कुठे आहे गोळी? (३१ मार्च २०२१)
- सई-आदित्यची होळीला धमाल, भांगेच्या नशेत सई करणार कमाल. (३ एप्रिल २०२१)
- जेडीची आहे खोपडी येडी, बोलीत त्याची डेंजर गोडी, पण हातात कधी पडली नाही बेडी, तो जेडी. (७ एप्रिल २०२१)
- आदित्य म्हणाला सई म्हणाली, चलो मनाली चलो मनाली. (१२ एप्रिल २०२१)
- बर्फात रमलेत आदित्य-सई, गुलप्रीतला ब्रह्मेघरी यायची झाली घाई. (१४ एप्रिल २०२१)
- सई-आदित्यचं हनिमून मनालीत रंगणार, गुलप्रीतला लपवून बंधू दमणार. (१६ एप्रिल २०२१)
- वाजवा नगाडे वाजवा ढोल, आज होणार बंधूची अखेर पोलखोल. (१८ एप्रिल २०२१)
- ब्रह्मेंच्या घरात शिरणार एक विषारी साप, सिंधू जगदीश ब्रह्मे आता ओलांडणार माप. (२० एप्रिल २०२१)
- घरातून पळ काढणार कैदाशिण सिंधू आणि ब्रह्मेंच्या भेटीला येणार का मिसेस बंधू? (२३ एप्रिल २०२१)
- सई मारतेय ब्रह्मेंसोबत पंजाबची चक्कर आणि आदित्य देणार जेडीला पुन्हा एकदा टक्कर. (२६ एप्रिल २०२१)
- सई-आदित्यच्या पुढ्यात संकटं आणि क्लेश, कसा होणार ब्रह्मेंच्या घरात गुलप्रीतचा गृहप्रवेश? (२८ एप्रिल २०२१)
- पंजाबचं प्रेम महाराष्ट्रात वाहणार, आजपासून गुलप्रीत ब्रह्मेंच्या घरात राहणार. (३० एप्रिल २०२१)
- गुलप्रीतचा हिरमोड पण सईने घेतलाय ध्यास, आजच होणार गृहप्रवेश हाच मनी विश्वास. (५ मे २०२१)
- गुलप्रीतच्या येण्याने होणार आनंदाची लयलूट की १४ वर्षांची फसवणूक भावाभावांत पाडणार फूट? (८ मे २०२१)
- बंधूच्या विरोधात उभे राहिलेत सारे, सई-आदित्य कसं थांबवणार हे युद्धाचे वारे? (१० मे २०२१)
- रविवारचं खास सरप्राइज, ब्लॉकबस्टर नाईट विथ ब्रह्मे बॉईज. (२३ मे २०२१)
- सई-आदित्य सोडणार मामांची साथ, स्वतंत्र संसाराचा घालणार घाट. (२४ मे २०२१)
- कधी रस्त्यावर वणवण, कधी झाडाचा आधार, घरापासून दूर सुरू, सई-आदित्यचा संसार. (२७ मे २०२१)
आठवडा
|
वर्ष
|
TRP
|
संदर्भ
|
TVT
|
क्रमांक
|
आठवडा १३
|
२०२०
|
२.०
|
३
|
|
आठवडा २८
|
२०२०
|
३.१
|
३
|
[१]
|
आठवडा २९
|
२०२०
|
३.४
|
३
|
|
आठवडा ३१
|
२०२०
|
४.१
|
२
|
|
आठवडा ३२
|
२०२०
|
४.२
|
२
|
|
आठवडा ३३
|
२०२०
|
४.१
|
२
|
|
आठवडा ३४
|
२०२०
|
३.९
|
२
|
|
आठवडा ३५
|
२०२०
|
४.३
|
२
|
|
आठवडा २६
|
२०२०
|
३.९
|
१
|
|
आठवडा ३७
|
२०२०
|
३.९
|
३
|
|
आठवडा ३८
|
२०२०
|
३.१
|
५
|
[२]
|