आतापर्यंत १७ संघ किमान एकदा क्रिकेट विश्वचषकाचे सामने (qualifying tournaments वगळता) खेळले आहेत. त्या पैकी ७ संघांनी प्रत्येक प्रतीयोगीतेत भाग घेतला आहे आणि फक्त ५ संघ जिंकले आहेत. वेस्ट इंडीज प्रथम दोन वेळा (१९ जून १९७५, २३ जून १९७९), ऑस्ट्रेलिया चार वेळा (०७ नोव्हेंबर १९८७, २० जून १९९९, २३ मार्च २००३ आणि १६, एप्रिल २००७) तर दक्षिण आशियातील देशांनी (भारत: २५ जून १९८३, ०२ एप्रिल २०११, पाकिस्तान: २५ मार्च १९९२, श्रीलंका: १७ मार्च १९९६) चार वेळा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. वेस्ट इंडीज (१९७५, १९७९) व ऑस्ट्रेलिया (१९९९, २००३ व २००७) या दोनच देशांनी ही स्पर्धा लागोपाठ जिंकली आहे. ऑस्ट्रेलिया आत्तापर्यंतच्या विश्वचषकांतील पाच अंतिम स्पर्धांमध्ये खेळला आहे. इंग्लंड तीनदा अंतिम फेरीत पोचून एकदाही चिंकलेला नाही. कसोटी सामने न खेळणाऱ्या संघांपैकी केन्या उपांत्य फेरीत पोचला.