जवागल श्रीनाथ
Appearance
जवागल श्रीनाथ (कन्नड: ಜಾವಗಲ್ ಶ್ರೀನಾಥ್; ३१ ऑगस्ट १९६९ , म्हैसूर, कर्नाटक) हा एक निवृत्त भारतीय क्रिकेट खेळाडू व विद्यमान आय.सी.सी. सामनाधिकारी (Referee) आहे. तो आजवरच्या सर्वोत्तम द्रुतगती भारतीय गोलंदाजांपैकी एक मानला जातो. श्रीनाथने ६७ कसोटी सामन्यांमध्ये ३०.४९ च्या सरासरीने २३६ बळी तर २२९ एकदिवसीय सामन्यांमध्ये २८.०८ च्या सरासरीने ३१५ बळी घेतले. एकदिवसीय सामन्यांमध्ये ३००पेक्षा अधिक बळी घेणारा तो एकमेव द्रुतगती भारतीय गोलंदाज आहे.
श्रीनाथने १९९२, १९९६, १९९९ व २००३ ह्या चार क्रिकेट विश्वचषकांमध्ये सहभाग घेतला व एकूण ४४ बळी घेतले.