बॉब वूल्मर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बॉब वूल्मर हा माजी इंग्लिश क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेटप्रशिक्षक होता. प्रशिक्षक म्हणून गाजलेल्या वूल्मरने दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान क्रिकेटसंघांचे प्रशिक्षकपद भूषविले होते.

बॉब वूल्मर याचा जन्म भारतात कानपूर शहरात मे १४, १९४८ रोजी झाला होता. १९७५ मध्ये त्याने इंग्लंडकडून कसोटीत पदार्पण केले.

18 मार्च 2007 रोजी, वूल्मरचे जमैकामध्ये अचानक निधन झाले, 2007 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडकडून पाकिस्तान संघाचा अनपेक्षितपणे पराभव झाल्यानंतर काही तासांनी .