क्रिकेट विश्वचषक, २०१९

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०१९
300px
२०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक अधिकृत लोगो
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान

इंग्लंडइंग्लंड

वेल्सवेल्स
सहभाग १०
२०१५ (आधी) (नंतर) २०२३

२०१९ क्रिकेट विश्वचषक (अधिकृतपणे आय.सी.सी क्रिकेट विश्वचषक २०१९) ही जागतिक क्रिकेट स्पर्धा क्रिकेट विश्वचषकातील १२वी स्पर्धा इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे ते १४ जुलै २०१९ दरम्यान खेळण्यात येईल..[१][२] याआधी इंग्लंड आणि वेल्सकडे १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ मध्ये या स्पर्धेचे यजमानपद होते. ऑस्ट्रेलिया विद्यमान जेते आहेत.

साल २००६ मध्ये यजमानपद इंग्लंडला देण्यात आले. पहिला सामना द ओव्हलवर तर अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होईल. स्पर्धेच्या स्वरुपात बदल करण्यात आले. सर्व १० संघ एकाच गटात राहतील व प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी एक सामना खेळेल, गुणफलकातील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. १० देशांचा विश्वचषकाला जगभरातून खासकरुन असोसिएट देशांकडून विरोध झाला कारण असोसिएट सदस्य देश मोठ्या आणि संधी देण्याऱ्या स्पर्धेस मुकले. साल २०१७ मध्ये आय.सी.सी ने पुर्ण सदस्यांची संख्या आयर्लंड आणि अफगाणिस्तान यांना कसोटी देश घोषित करून १० वरून १२ केली, त्यामुळे सगळे पुर्ण सदस्य खेळत नसलेला हा पहिलाच विश्वचषक असणार आहे[३] तर पात्रतेतून एकही असोसिएट देश पात्र न ठरल्याने एकही असोसिएट देश खेळत नसलेला हा पहिलाच विश्वचषक आहे.

फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे भारतीय सैन्यावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक भारतीय खेळाडू आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट फेरीतील सामन्यावर बहिष्कार घालून, पाक संघाला स्पर्धेत खेळण्यास बंदी घालण्याची विनंती केली. [४][५][६] परंतू, दुबई येथे पत्रकार परिषदेच्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानवर बंदी घालण्याच्या बीसीसीआयच्या निवेदनास नकार दिला आणि दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या वादानंतरही, निर्धारित सामना नियोजित वेळेवरच खेळवला जाईल असे अश्वासन दिले. [७][८]

पात्र देश[संपादन]

२०११ आणि २०१५ मधील विश्वचषक स्पर्धांमध्ये १४ संघ पात्र ठरले होते, ज्यामध्ये घट होऊन २०१९च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये १० संघच पात्र होऊ शकले.[९] यजमान, इंग्लंड आणि ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत आयसीसी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय रँकिंगमधील अन्य पहिले सात संघ हे आपोआप पात्र झाले, तर उर्वरित दोन स्थानांसाठी क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ स्पर्धेतील दोन अव्वल संघ पात्र होऊ शकले.[१०]

पात्रता संरचना घोषित करताना आयसीसी असोसिएट आणि संलग्न सदस्य, ज्यांना मागील दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये चार स्थानांची हमी देण्यात आली होती, त्यापैकी जास्तीत जास्त दोन संघ जर त्यांच्यापेक्षा खालील क्रमांकांच्या संघांकडून पराभूत न झाल्यास पात्र होऊ शकतात.[१०] याचा अर्थ असाही होतो की, कसोटी क्रिकेट खेळणार्‍या १० देशांपैकी किमान दोन संघांना पात्रता स्पर्धेला तोंड द्यावे लागेल, आणि कदाचित विश्वचषक स्पर्धेलासुद्धा मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली.

अलीकडील यशानंतर, आयर्लंड आणि अफगाणिस्तानला आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये पदोन्नती मिळाली तसेच आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व मिळाल्याने हे संघ कसोटी क्रिकेट खेळणारे सर्वात नवीन संघ ठरले. तथापि, त्यांना सध्याच्या प्रक्रियेदनुसार विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळण्याची आवश्यकता होती.

फाइनलमध्ये वेस्टइंडीजला पराभूत करून अफगाणिस्तानने पात्रता स्पर्धा जिंकली. दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले, तर पात्रता स्पर्धेचे आयोजक असलेल्या झिम्बाब्वेला पात्रता स्पर्धेची अंतिम फेरी गाठता आली नाही आणि १९८३ नंतर पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेतील स्थान गमावण्याची नामुष्की ओढवली.[११] अलीकडेच पूर्ण सदस्य म्हणून निवड झालेला आयर्लंडच्या संघाला सुद्धा २००८ नंतर पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागेल आणि पहिल्यांदाच एकही संलग्न राष्ट्र विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही..[१२]

२०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणारे देश गडद रंगात दाखवले आहेत.
  यजमान म्हणून पात्र
  आयसीसी एकदिवसीय क्रमवारीनुसार पात्र
  सहभागी परंतू पात्रता मिळविण्यात अपयशी
पात्रता स्रोत दिनांक स्थळ जागा पात्र देश[१३]
यजमान देश ३० एप्रिल २००६[१४] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
आयसीसी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रमवारी २० सप्टेंबर २०१७ विविध ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
भारतचा ध्वज भारत
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८ २३ मार्च २०१८ झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
एकूण १०

मैदाने[संपादन]

२६ एप्रिल २०१८ रोजी कोलकाता येथे सर्वसाधारण सभेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनी मैदानांची आणि सामन्यांची यादी जाहीर केली. नियोजनच्या टप्प्यामध्ये लंडन स्टेडियमला संभाव्य स्थान म्हणून घोषित केले गेले होते,[१५][१६] आणि जानेवारी २०१७ मध्ये आयसीसीने मैदानाची तपासणी केली आणि सदर खेळपट्टी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आयोजित करण्याची आवश्यकता असलेल्या आयामांने अनुपालन करत असल्याची पुष्टी केली.[१७] तथापि, जेव्हा सामन्यांची घोषणा झाली तेव्हा लंडन स्टेडियम स्थान म्हणून समाविष्ट करण्यात आले नाही.[१८]

शहर बर्मिंगहॅम ब्रिस्टल कार्डिफ चेस्टर-ली-स्ट्रीट लीड्स
मैदान एजबॅस्टन ब्रिस्टल काउंटी मैदान सोफिया गार्डन्स रिव्हरसाईड मैदान हेडिंग्ले
प्रेक्षकक्षमता २५,००० १७,५०० १५,६४३ २०,००० १८,३५०
सामने ५ (उपांत्य सामनासहीत)
Edgbaston---close-of-play.jpg Bristol County Ground.jpg Cathedral Road end, SWALEC Stadium, Cardiff, Wales.jpg Riverside-ground.jpg Headingley Cricket Stadium.jpg
लंडन लंडन मँचेस्टर नॉटिंगहॅम साउथहँप्टन टाँटन
लॉर्ड्स द ओव्हल ओल्ड ट्रॅफर्ड ट्रेंट ब्रिज रोझ बाऊल काउंटी मैदान
२८,००० २५,५०० २६,००० १७,५०० २५,००० १२,५००
५ (अंतिम सामन्यासहीत) ६ (उपांत्य सामन्यासहीत)
Lords-Cricket-Ground-Pavilion-06-08-2017.jpg OCS Stand (Surrey v Yorkshire in foreground).JPG Old Trafford Cricket Ground August 2014.jpg Trent Bridge MMB 01 England vs New Zealand.jpg Pavilion stands.JPG County Ground, Taunton panorama.jpg

संघ[संपादन]

सर्व सहभागी संघांना २३ एप्रिल २०१९ पर्यंत संबंधित विश्वचषक संघातील खेळाडूंची नावे सादर करावी लागली.[१९] स्पर्धा सुरू होण्याच्या जास्तीत जास्त सात दिवसांपूर्वी कोणत्याही संघाला आपल्या १५ खेळाडूंमध्ये बदल करण्याची मुभा देण्यात आली.[२०] न्यूझीलंडने सर्वात आधी त्यांचा विश्वचषक संघ जाहीर केला.[२१]

सामना अधिकारी[संपादन]

एप्रिल २०१९ मध्ये, स्पर्धेच्या अधिकार्‍यांची यादी आयसीसीने जाहीर केली.[२२] स्पर्धेच्या समाप्तीनंतर निवृत्त होत असल्याची घोषणा इयान गोल्ड यांनी केली.[२३]

पंच[संपादन]

सामनाधिकारी[संपादन]

आयसीसीने ६ सामनाधिकार्‍यांची सुद्धा घोषणा केली.[२२]

बक्षिसाची रक्कम[संपादन]

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१५च्या संस्करणाप्रमाणेच स्पर्धेसाठी १० दशलक्ष डॉलर्सची बक्षिसे जाहीर केली. [२४] खालीलप्रमाणे संघाच्या प्रदर्शनानुसार बक्षिसे वितरीत केली जातील:[२५]

टप्पा बक्षिसाची रक्कम (US$) एकूण
विजेते $४०,००,००० $४०,००,०००
उपविजेते $२०,००,००० $२०,००,०००
उपांत्य फेरीतील पराभूत संघ $८,००,००० $१६,००,०००
प्रत्येक गट सामन्यातील विजेता संघ $४०,००० $१८,००,०००
गट फेरी पार केलेल्या प्रत्येक संघास $१,००,००० $६,००,०००
एकूण $१,००,००,०००

सराव सामने[संपादन]

२४ ते २८ मे २०१९ दरम्यान दहा सराव सामने खेळवण्यात येतील. सर्व वेळा ह्या ब्रिटीश उन्हाळी वेळा आहेत (यूटीसी+०१:००).[२६]

सराव सामने२५ मे २०१९
१०:३०
धावफलक
वि


गट फेरी[संपादन]

गट फेरी ही राउंड-रॉबिन पद्धतीने खेळवली जाईल, जेथे सर्व दहा संघ एकमेकांविरुद्ध एक-एक सामना खेळतील. याचा अर्थ एकूण ४५ सामने खेळवले जातील, ज्यामध्ये प्रत्येक संघ एकूण नऊ सामने खेळेल. ग्रुपमधील पहिले चार संघ बाद फेरीत प्रगती करतील. ह्याप्रकारचे स्वरूप क्रिकेट विश्वचषक, १९९२ मध्ये वापरले गेले होते, परंतु त्या स्पर्धेत दहाऐवजी नऊ टीम्स खेळल्या होत्या.

गुणफलक[संपादन]

विश्वचषक २०१९ मध्ये गुणांचे वाटप खालील प्रकारे केले जाईल:
विजय : २ गुण.
सामना रद्द : प्रत्येकी १ गुण (बाद फेरीसाठी १ राखीव दिवस ठेवला गेला आहे.)

विश्वचषक २०१९ गुण फलक मानदंड:
१० संघांपैकी पहिले ४, बाद फेरीमध्ये पोहोचतील.
मानांकने ठरविण्यासाठी खालील निकष लावले जातील:

 1. सर्वात जास्त गुण.
 2. जर दोन किंवा अधिक संघांचे समान गुण असतील तर जास्त सामने जिंकलेला संघ वरील क्रमांकावर असेल.
 3. जर दोन किंवा अधिक संघांचे गुण अद्याप समान असतील तर निव्वळ धावगती आणि एकमेकांविरुद्ध सामन्यांतील विजयाचे निकष लावले जातील.
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ०.००० उपांत्य फेरीत बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.०००
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ०.०००
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.०००
भारतचा ध्वज भारत ०.००० स्पर्धेतून बाद
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०.०००
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.०००
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०.०००
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०.०००
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०.००
संदर्भ: इएसपीएन क्रिकइन्फो
संघ
गट फेरी बाद फेरी
उपांत्य सामने अंतिम सामना
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
भारतचा ध्वज भारत
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
विजय पराभव सामना अणिर्नित
टीप: प्रत्येक साखळी सामन्याच्या शेवटी गुण दर्शविलेले आहेत.
टीप: सामन्याची पाहिती पाहण्यासाठी साखळी सामन्यांच्या गुणांवर किंवा बाद फेरीच्या वि/प वर क्लिक करा.

सामने[संपादन]

आयसीसीने सामन्यांचे वेळापत्रक २६ एप्रिल २०१८ रोजी जाहीर केले. [२७] सामन्यांच्या वेळा ब्रिटीश उन्हाळी वेळनुसार (यूटीसी+०१:००)

३० मे २०१९
१०:३०
धावफलक
वि

३१ मे २०१९
१०:३०
धावफलक
वि

१ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

१ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
वि

२ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

३ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

४ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

५ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

५ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
वि

६ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

७ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

८ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

८ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
वि

९ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

१० जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

११ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

१२ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

१३ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

१४ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

१५ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

१५ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
वि

१६ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

१७ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

१८ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

१९ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

२० जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

२१ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

२२ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

२३ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
वि

२४ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

२५ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

२६ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

२७ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

२७ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

२८ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

२९ जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

२९ जून २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
वि

३० जून २०१९
१०:३०
धावफलक
वि

१ जुलै २०१९
१०:३०
धावफलक
वि

२ जुलै २०१९
१०:३०
धावफलक
वि

३ जुलै २०१९
१०:३०
धावफलक
वि

४ जुलै २०१९
१०:३०
धावफलक
वि

५ जुलै २०१९
१०:३०
धावफलक
वि

६ जुलै २०१९
१०:३०
धावफलक
वि

६ जुलै २०१९
१३:३० (दि/रा)
धावफलक
वि

बाद फेरी[संपादन]

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
९ जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
 पात्रता १  
 पात्रता ४  
 
१४ जुलै – लॉर्ड्स, लंडन
     
   
११ जुलै – एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
 पात्रता २
 पात्रता ३  

उपांत्य सामने[संपादन]

९ जूलै २०१९
१०:३०
धावफलक
पात्रता १
वि
पात्रता ४

११ जुलै २०१९
१०:३०
धावफलक
पात्रता २
वि
पात्रता ३


अंतिम सामना[संपादन]

१४ जुलै २०१९
१०:३०
धावफलक
उपांत्य सामना १ विजेते
वि
उपांत्य सामना २ विजेते


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "२०१९ विश्वकप ब्रिटिशांच्या भूमीवर". बीबीसी स्पोर्ट्स. ३० एप्रिल २००६. 
 2. ^ "इंग्लंडला २०१९ क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद बहाल". ई.एस.पी.एन क्रिकैइन्फो. ३० एप्रिल २००६. 
 3. ^ "ट्वेंटी२० विश्वकप मध्ये जास्ती संघ हवेत : डेव्हिड रिचर्डसन, सीईओ". 
 4. ^ सीएनएन, जेम्स मास्टर. "हिंसाचार भारताविरूद्ध पाकिस्तान विश्वचषक सामना थांबवेल का?". सीएनएन. १५ मे २०१९ रोजी पाहिले. 
 5. ^ "भारत वि पाकिस्तान सामना न खेळवला जाण्याचे कोणतेही संकेत नाहीत - आयसीसीचे प्रतिपादन". २५ फेब्रुवारी २०१९. १५ मे २०१९ रोजी पाहिले. 
 6. ^ दिल्ली फेब्रुवारी २२, इंडिया टूडे वेब डेस्क; फेब्रुवारी २२, २०१९ अद्ययावत; १, २०१९ १६:५०. "आयसीसी कडून बीसीसीआयला चेतावणी: विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर बंदी घालण्याचा प्रस्ताव भारताने गमावण्याची शक्यता". इंडिया टूडे. १५ मे २०१९ रोजी पाहिले. 
 7. ^ दुबई मार्च ३, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया; मार्च ३, २०१९ अद्ययावत; १, २०१९ १२:२६. "आयसीसीने बीसीसीआयला कळवले: देशांमधील क्रिकेट संबंध तोडणे आमचे काम नाही". इंडिया टुडे. १५ मे २०१९ रोजी पाहिले. 
 8. ^ NDTVSports.com. "भारतीय मंडळाची दहशतवाद संदर्भातील विनंतीची मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने फेटाळली: बातमी | क्रिकेट न्यूज". NDTVSports.com. १५ मे २०१९ रोजी पाहिले. 
 9. ^ "क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये फक्त १० संघांचा समावेश". बीबीसी स्पोर्ट. २६ जून २०१५. १७ मे २०१९ रोजी पाहिले. 
 10. a b "पूर्ण सदस्यांसह अफगाणिस्तान आणि आयर्लंडला आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ साठी पात्रता मिळविण्याची संधी". icc-cricket.com. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १९ जानेवारी २०१५ रोजी मिळविली). १७ मे २०१९ रोजी पाहिले. 
 11. ^ "युएईने झिम्बाब्वेला चकवले". हिंदुस्तान टाइम्स. २२ मार्च २०१८. १७ मे २०१९ रोजी पाहिले. 
 12. ^ असोसिएशन, प्रेस (२३ मार्च २०१८). "२००३ नंतर आयर्लंड पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेला मुकणार". द गार्डियन. १७ मे २०१९ रोजी पाहिले. 
 13. ^ "क्रिकेट विश्वचषक: अंतिम १० संघ". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ मे २०१९ रोजी पाहिले. 
 14. ^ "क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये". बीबीसी स्पोर्ट. ३० एप्रिल २००६. १७ मे २०१९ रोजी पाहिले. 
 15. ^ "लंडन स्टेडियममदऍये २०१९ विश्वचषकाचे सामने होण्याची शक्यता". बीबीसी स्पोर्ट. ६ डिसेंबर २०१६. 
 16. ^ "इंग्लंड क्रिकेट बोर्डातर्फे २०१९ क्रिकेट विश्वचषक सामना खेळवण्यासाठी ऑलिम्पिक स्टेडियमचा विचार". द गार्डियन. ५ डिसेंबर २०१६. १७ मे २०१९ रोजी पाहिले. 
 17. ^ "लंडन ऑलिम्पिक मैदानाला आयसीसीची मान्यता". इएसपीएन क्रिकइन्फो. २३ जानेवारी २०१७. १७ मे २०१९ रोजी पाहिले. 
 18. ^ "२०१९ विश्वचषक: स्पर्धेच्या ११ मैदानांमध्ये लंडन स्टेडियमचा समावेश नाही". बीबीसी स्पोर्ट. २६ एप्रिल २०१९. १७ मे २०१९ रोजी पाहिले. 
 19. ^ "आयसीसी विश्वचषक २०१९: स्पर्धेसाठी संघांना संभाव्य ३० खेळाडूंची नावे देण्याची गरज नाही". क्रिकट्रॅकर. १८ फेब्रुवारी २०१९. १८ मे २०१९ रोजी पाहिले. 
 20. ^ "क्रिकेट विश्वचषक २०१९: इंग्लंड संघात स्थान मिळवण्याच्या स्पर्धेत जोफ्रा आर्चर". www.bbc.com. ३ मार्च २०१९. १८ मे २०१९ रोजी पाहिले. 
 21. ^ "न्यूझीलंड संघात नवोदित ब्लंडेलची निवड, ॲस्टल ऐवजी सोधीला पसंती". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १८ मे २०१९ रोजी पाहिले. 
 22. a b "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०१९ सामन्यांच्या अधिकार्‍यांची घोषणा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १५ मे २०१९ रोजी पाहिले. 
 23. ^ "पंच इयान गोल्ड विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्त होणार". इएसपीएन क्रिकइन्फो. १७ मे २०१९ रोजी पाहिले. 
 24. ^ "विश्वचषक २०१९ विजेत्याला १० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मिळणार". इएसपीएन क्रिकइन्फो. १७ मे २०१९ रोजी पाहिले. 
 25. ^ "आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०१९ साठी १० दशलक्ष डॉलर्सची बक्षिसे". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ मे २०१९ रोजी पाहिले. 
 26. ^ "आयसीसी पुरुष विश्वचषक २०१९ च्या अधिकृत सराव समन्यांच्या वेळा जाहीर". क्रिकेट विश्वचषक. ३१ जानेवारी २०१९. २० मे २०१९ रोजी पाहिले. 
 27. ^ "आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर". २१ मे २०१९ रोजी पाहिले.