ए.बी. डी व्हिलियर्स
| ए.बी. डी व्हिलियर्स | ||||
| व्यक्तिगत माहिती | ||||
|---|---|---|---|---|
| पूर्ण नाव | अब्राहम बेंजामिन डी व्हिलियर्स | |||
| उपाख्य | एबी, अब्बास | |||
| जन्म | १७ फेब्रुवारी, १९८४ | |||
| प्रिटोरिया,दक्षिण आफ्रिका | ||||
| उंची | १.७८ मी (५ फु १० इं) | |||
| विशेषता | फलंदाज, यष्टीरक्षक | |||
| फलंदाजीची पद्धत | उजखोरा | |||
| गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने ऑफ स्पिन | |||
| आंतरराष्ट्रीय माहिती | ||||
| राष्ट्रीय स्पर्धा माहिती | ||||
| वर्ष | संघ | |||
| २००८– | दिल्ली डेरडेव्हिल्स (संघ क्र. १७) | |||
| २००४– | टायटन्स (संघ क्र. १७) | |||
| २००३–०४ | नॉर्थन्स | |||
| कारकिर्दी माहिती | ||||
| कसोटी | ए.सा. | प्र.श्रे. | लि.अ. | |
| सामने | ६६ | ११४ | ९० | १४१ |
| धावा | ४,७४१ | ४,१७० | ६,५९० | ५,२८० |
| फलंदाजीची सरासरी | ४७.४१ | ४३.८९ | ४७.७५ | ४४.७४ |
| शतके/अर्धशतके | २२/४५ | २५/५३ | १५/३७ | ११/३४ |
| सर्वोच्च धावसंख्या | २७८* | १४६ | २७८* | १४६ |
| चेंडू | १९८ | १२ | २२८ | १२ |
| बळी | २ | ० | २ | ० |
| गोलंदाजीची सरासरी | ४९.५० | – | ६६.५० | – |
| एका डावात ५ बळी | ० | ० | ० | ० |
| एका सामन्यात १० बळी | ० | n/a | ० | n/a |
| सर्वोत्तम गोलंदाजी | २/४९ | ०/२२ | २/४९ | ०/२२ |
| झेल/यष्टीचीत | ९३/१ | ८५/२; | १३९/२ | १०७/२ |
|
६ फेब्रुवारी, इ.स. २०११ | ||||
अब्राहम बेंजामिन डि व्हिलियर्स (१७ फेब्रुवारी, इ.स. १९८४:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - ) हा
दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघांचा संघनायकही होता
याच्या नावावर फलंदाजीतील असंख्य विक्रम आहेत यात एकदिवसीय सामन्यांतील सर्वात जलद ५०, १०० आणि १५० धावा करण्याचा विक्रमही आहे.
त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिदीची सुरुवात २००४ साली
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात केली. त्याने त्याचा पहिला एकदिवासीय सामना २००५ साली खेळला आणि पहिला वीसषटकी सामना २००५ साली खेळला.
डिव्हिलियर्सने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात यष्टीरक्षक म्हणून केली, परंतु आपल्या फलंदाजीत सुधारणा करून फक्त फलंदाजीच्या जोरावर असंख्य सामने दक्षिण आफ्रिकेला जिंकवून दिले. डेव्हिलियर्स त्याच्या अपारंपरिक फटकेबाजी साठी ओळखला जातो.तो चौफेर फटकेबाजी करतो. तो उत्तम यशस्वी फलंदाज आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे Mr 360 शॉट्स. तसेच तो उत्तम यश्टीरक्षक आहे. तो चांगला कर्णधार आहे. सर्ववाधिका वेगवान धावा करन्यात एबी डिविलियर्स बादशाह मानला जातो तो
प्रारंभिक जीवन
[संपादन]अब्राहम बेंजामिन डीव्हिलियर्स यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील वार्मबाड येथे झाला.[१] त्यांचे वडील डॉक्टर होते तरुण असताना त्यांनी रग्बी युनियन खेळ खेळले होते आणि त्यांनी आपल्या मुलाला खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले. लहानपणापासून डीव्हिलियर्स क्रिकेट खेळत असत.
पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर डी व्हिलियर्सने २०१२ मध्ये ताज महाल येथे त्याची मैत्रीण डॅनिएल स्वार्टला लग्नासाठी विचारले.[२] या जोडप्याचे लग्न ३० मार्च २०१३ रोजी दक्षिण आफ्रिकेतील बेला-बेला (Bela-Bela) येथे झाले. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे.[३][४][५]
डी व्हिलियर्स हा एक निष्ठावान ख्रिश्चन असून त्याच्या मते त्याची श्रद्धा त्याच्या जीवनदृष्टीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.[६] तो एक उत्तम गिटार वादक आणि गायक देखील आहे. २०१० मध्ये त्याने आपला मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा गायक एम्पी डू प्रीझ याच्यासह माक जो ड्रोम वार नावाचा द्विभाषिक पॉप संगीतसंच प्रदर्शित केला.[७] त्याचे आत्मचरित्र, 'एबी डी व्हिलियर्स - द ऑटोबायोग्राफी' सप्टेंबर २०१६ मध्ये प्रकाशित झाले.[८] इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला तो दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे.[९]
कारकीर्द
[संपादन]नोव्हेंबर २००८ मध्ये बांगलादेशविरूद्ध नाबाद होण्याआधी डक (७८),नोंदविल्याशिवाय त्याने सर्वाधिक कसोटी डावांचा विक्रम केला आहे. २७८ (नाबाद नसतानाही दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज म्हणून त्याने दुसऱ्या क्रमांकाची वैयक्तिक धावसंख्या घेतली आहे.
|
- ↑ Parker, Jay (1998). "Like Greased Lightning, Musicians Storm the Field". Imagine. 6 (1): 16–17. doi:10.1353/imag.2003.0296. ISSN 1086-3230.
- ↑ "The Proposal". Circle of cricket.
- ↑ abdevilliers17 (25 July 2015). "My wife looked after AB for 3 days and finally left the hospital, all healthy and happy to be home". Instagram. 26 December 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 March 2026 रोजी पाहिले.साचा:Cbignore
- ↑ abdevilliers17 (20 July 2017). "Now we are 4!". Instagram. 26 December 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 March 2026 रोजी पाहिले.साचा:Cbignore
- ↑ "On 11-11-2020, we welcomed a beautiful baby girl into the world". abdevilliers17. 26 December 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 March 2026 रोजी पाहिले.साचा:Cbignore
- ↑ Baines, Ollie (29 June 2016). "South Africa icon, AB de Villiers, 'My advice would be just to keep it simple and enjoy every second'". Cross the Line. 7 May 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 March 2026 रोजी पाहिले.
- ↑ Shukla, Ira (5 January 2018). "We Just Found Out AB de Villiers Released An Album In 2010! Is There Anything This Man Can't Do?". Scoop Whoop. 18 March 2026 रोजी पाहिले.
- ↑ "De Villiers' autobiography draws huge response in India". Sportstar (इंग्रजी भाषेत) (2 September 2016). 18 March 2026 रोजी पाहिले.
- ↑ Walubengo, Peris (4 April 2022). "Top 20 most followed people on Instagram in South Africa 2022". Briefly (इंग्रजी भाषेत). 2025-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 March 2026 रोजी पाहिले.