नवज्योतसिंग सिद्धू
Jump to navigation
Jump to search
नवज्योतसिंग सिद्धू (पंजाबी: ਨਵਜੋਤ ਸਿੰਘ ਸਿੱਧੂ ; रोमन लिपी: Navjot Singh Sidhu ) (२० ऑक्टोबर, इ.स. १९६३; पतियाला - हयात) हा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू व पंजाबी राजकारणी आहे. इ.स. १९८३ ते इ.स. १९९९ या कालखंडात हा भारतीय संघाकडून ५१ कसोटी व १३६ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला. हा उजव्या हाताने आक्रमक फलंदाजी करत असे.
व्यावसायिक क्रिकेटजगतातून निवृत्त झाल्यावर सिद्धूने क्रिकेट समालोचन व राजकारण या क्षेत्रांत प्रवेश केला. इ.स. २००४ व इ.स. २००५ सालांतील लोकसभा निवडणुकींत तो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर अमृतसर लोकसभा मतदारसंघातून उभा राहिला व लोकसभेवर निवडून आला. मनुष्यवधाच्या खटल्यात दोषी सिद्ध झाल्यामुळे त्याने संसदसदस्यत्वाचा राजीनामा दिला[ संदर्भ हवा ].
बाह्य दुवे[संपादन]
- "नवज्योतसिंग सिद्धू - प्रोफाइल व आकडेवारी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
![]() |
---|
![]() |