भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)
१९३२ भारतीय क्रिकेट संघ
भारत
{{{चित्र_शीर्षक}}}
{{{चित्र_शीर्षक}}}
{{{चित्र_शीर्षक}}}
टोपण नाव मेन ईन ब्ल्यू, टिम इंडिया, भारत आर्मी
प्रशासकीय संस्था {{{प्रशासकीय‌_संस्था}}}
कर्णधार रोहित शर्मा,हार्दिक पंड्या,शिखर धवन
मुख्य प्रशिक्षक {{{मुख्य‌_प्रशिक्षक}}}
आयसीसी दर्जा संपूर्ण सदस्य (१९३२ पासून)
आयसीसी सदस्य वर्ष इ.स. १९२६
सद्य कसोटी गुणवत्ता २ रे
सद्य एकदिवससीय गुणवत्ता ३रे
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता १ रे
पहिली कसोटी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध २५-२८ जून १९३२ रोजी लॉर्ड्स, लंडन येथे.
अलीकडील कसोटी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध १-५ जुलै २०२२ रोजी एजबॅस्टन क्रिकेट मैदान,बर्मिंगहॅम येथे.
एकूण कसोटी ५६३
वि/प : १६८/१७४ (२२२ अनिर्णित, १ बरोबरीत)
एकूण कसोटी सद्य वर्ष
वि/प : २/३ (० अनिर्णित)
पहिला एकदिवसीय सामना इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध १३ जुलै १९७४ रोजी हेडिंग्ले क्रिकेट मैदान, लीड्स येथे.
अलीकडील एकदिवसीय सामना न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विरुद्ध ३० नोव्हेंबर २०२२ रोजी हॅगले ओव्हल, येथे.
एकूण एकदिवसीय सामने १०१७
वि/प : ५३१/४३४ (९ बरोबरीत, ४३ बेनिकाली)
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष २१
वि/प : १३/६ (० बरोबरीत, २ बेनिकाली)
पहिला ट्वेंटी२० सामना दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका विरुद्ध १ डिसेंबर २००६ रोजी वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग येथे.
अलीकडील ट्वेंटी२० सामना न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विरुद्ध २२ नोव्हेंबर २०२२ रोजी , मॅकलीन पार्क,नेपियर येथे.
एकूण ट्वेंटी२० सामने १९४
वि/प : १२३/६१ (४ बरोबरीत, ६ बेनिकाली)
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष ४१
वि/प : २८/१०(१ बरोबरीत, २ बेनिकाली)
विश्वचषक कामगीरी १ला विश्वचषक १९७५ साली, एकूण ११ विश्वचषकांमध्ये सहभाग.
सर्वोत्कृष्ट कामगीरी विजेते (१९८३, २०११)
शेवटचा बदल {{{asofdate}}}भारतीय क्रिकेट संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे. भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे.

इतिहास[संपादन]

१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिशांसोबत हा खेळ भारतात आला. १८४८ मध्ये मुंबईच्या पारसी लोकांनी स्थापलेला ओरिएंटल क्रिकेट क्लब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिला क्लब आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस काही भारतीय इंग्लडमध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यांपैकी रणजीत सिंग व दुलिप सिंग हे लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळविण्यात येतात. सन १९२६ मध्ये भारताला इंपिरियल क्रिकेट संघात सामिल करण्यात आले. १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी सामना इंग्लंड क्रिकेट विरुद्ध खेळला. ह्या सामन्यात भारताचे कर्णधार महान फलंदाज सी.के. नायडू होते. स्वातंत्र्यानंतर भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट विरुद्ध १९४८ मध्ये खेळला. भारताने सर्वप्रथम कसोटी सामन्यात विजय १९५२ मध्ये इंग्लंड विरुद्ध मिळवला. १९५२ मध्येच भारताने सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकली (पाकिस्तान विरुद्ध).भारताचा कर्णधार २०१६ मध्ये विराट कोहली झाला .

महत्त्वाच्या स्पर्धा[संपादन]

भारतातील महत्त्वाच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी[संपादन]

  • एदिसा = एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने
  • टी२०आं. = टी२० आंतरराष्ट्रीय सामने
  • क.आं.सा. = कसोटी आंतरराष्ट्रीय सामने
आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील भारताची कामगिरी
  सामने विजय पराभव अनिर्णित बरोबरी बेनिकाली पहिला सामना
कसोट्या[१] ५६३ १६८ १७४ २२२ २५ जून १९३२
एदिसा[२] १०१६ ५३१ ४३४ - ४२ १३ जुलै १९७४
टी२०आं.[३] १९४ १२३ ६१ १ डिसेंबर २००६

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी[संपादन]

क्रिकेट विश्वचषक
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
इंग्लंड १९७५ पहिली फेरी 6/8 3 1 2 0 0
इंग्लंड १९७९ पहिली फेरी 7/8 3 0 3 0 0
इंग्लंड १९८३ विजेता 1/8 8 6 2 0 0
भारतपाकिस्तान १९८७ तिसरे 3/8 7 5 2 0 0
ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड १९९२ पहिली फेरी 7/9 8 2 5 0 1
भारतपाकिस्तानश्रीलंका १९९६ तिसरे 3/12 7 4 3 0 0
इंग्लंडवेल्सस्कॉटलंडनेदरलँड्सआयर्लंडचे प्रजासत्ताक १९९९ दुसरी फेरी (सुपर सिक्स) 6/12 8 4 4 0 0
दक्षिण आफ्रिकाझिम्बाब्वेकेन्या २००३ उपविजेता 2/14 11 9 2 0 0
वेस्ट इंडीज २००७ पहिली फेरी 10/16 3 1 2 0 0
भारतश्रीलंकाबांगलादेश २०११ विजेता 1/14 9 7 1 1 0
ऑस्ट्रेलियान्यूझीलंड २०१५ उपांत्य फेरी
इंग्लंडवेल्स २०१९ उपांत्य फेरी ३/१० १०
भारत २०२३ - - - - - - -
दक्षिण आफ्रिकाझिम्बाब्वेनामिबिया २०२७ - - - - - -
भारतबांगलादेश २०३१ - - - - - - -
एकूण १२/१२ २ अजिंक्यपदे ६७ ३९ २६
चॅम्पियन्स ट्रॉफी
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
बांगलादेश १९९८ उपांत्य फेरी - - - - - -
केन्या २००० उपविजेता - - - - - -
श्रीलंका २००२ विजेता - - - - - -
इंग्लंड २००४ साखळी फेरी - - - - - -
भारत २००६ साखळी फेरी - - - - - -
दक्षिण आफ्रिका २००९ साखळी फेरी - - - - - -
इंग्लंडवेल्स २०१३ विजेता - - - - - -
इंग्लंडवेल्स २०१७ उपविजेता - - - - - -
एकूण ०७/०७ २ अजिंक्यपदे - - - - -

|}

आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
दक्षिण आफ्रिका २००७ विजेता - - - - - -
इंग्लंड २००९ सुपर ८ - - - - - -
वेस्ट इंडीज २०१० सुपर ८ - - - - - -
श्रीलंका २०१२ सुपर ८ - - - - - -
बांगलादेश २०१४ उपविजेता - - - - - -
भारत २०१६ उपांत्य फेरी - - - - - -
संयुक्त अरब अमिरातीओमान २०२१ सुपर १२ - - - - - -
ऑस्ट्रेलिया २०२२ ? - - - - - -
अमेरिकावेस्ट इंडीज २०२४ ? - - - - - -
भारतश्रीलंका २०२६ ? - - - - - -
ऑस्ट्रेलियान्यूझीलंड २०२८ ? - - - - - -
इंग्लंडआयर्लंडचे प्रजासत्ताकस्कॉटलंड २०३० ? - - - - - -
आय.सी.सी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
स्थान बदलते<bɾ>(अंतिम सामना:इंग्लंड)<bɾ>२०१९-२१ ? - - - - - -
आयसीसी विश्वचषक सुपर लीग
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
२०२०-२२ ? - - - - - -
आशिया चषक
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
संयुक्त अरब अमिराती १९८४ विजेता १/३ 0 0 0
श्रीलंका १९८६ सहभाग नाही - - - - - -
बांगलादेश १९८८ विजेता १/४ - -
भारत १९९०-९१ विजेता १/३ 0 0
संयुक्त अरब अमिराती १९९५ विजेता १/४ 0 0
श्रीलंका १९९७ उपविजेता २/४ 0
बांगलादेश २००० साखळी फेरी ३/४ 0 0
श्रीलंका २००४ उपविजेता २/६ ? ? ? ? ?
पाकिस्तान २००८ उपविजेता २/६ ? ? ? ? ?
श्रीलंका २०१० विजेता १/४ ? ? ? ? ?
बांगलादेश २०१२ साखळी फेरी ३/४ 0 0
बांगलादेश २०१४ साखळी फेरी ३/५ 0 0
बांगलादेश २०१६ विजेता १/५ 0 0 0
संयुक्त अरब अमिराती २०१८ विजेता १/६ 0 0
पाकिस्तान २०२० - - - - - -

कसोटी मैदान[संपादन]

मैदान शहर कसोटी सामने
इडन गार्डन्स कोलकाता ३४
फिरोज शहा कोटला दिल्ली २८
एम‌.ए. चिदंबरम‌ मैदान चेन्नई २९
वानखेडे स्टेडियम मुंबई २१
ग्रीन पार्क (सद्य नाव: मोदी मैदान) कानपुर १९
ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई १७
एम. चिन्नास्वामी स्टेडियम बंगळूर १६
नेहरू मैदान, चेन्नई चेन्नई
विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राउंड नागपूर
सरदार पटेल स्टेडियम,मोटेरा स्टेडियम अमदावाद
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम मोहाली
बारबती स्टेडियम कटक
लाल बहादुर शास्त्री स्टेडियम हैदराबाद
बॉम्बे जिमखाना मुंबई
गांधी स्टेडियम जलंधर
के डी सिंग बाबु स्टेडियम लखनौ
सवाई मानसिंह स्टेडियम जयपुर
सेक्टर १६ स्टेडियम चंदिगड
विद्यापीठ स्टेडियम लखनौ
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम चिंचवड

विक्रम[संपादन]

सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वात जास्त विक्रम आहेत. सर्वात जास्त एकदिवसीय सामनेकसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ह्या शिवाय एकदिवसीय सामने व कसोटी सामन्यात सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या(३०९ धावा) नावावर आहे. विरेंद्र सेहवाग हा एकमेव भारतीय क्रिकेटपटु आहे ज्याने त्रिशतक झळकावले आहे. कसोटी सामन्यात संघाची सर्वात जास्त धाव संख्या ७०५ (वि. ऑस्ट्रेलिया) तर एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धाव संख्या ४१३ ( वि.बर्म्युडा) आहे.

भारताच्या अनिल कुंबळे ने एकाच डावात १० विकेट (वि. पाकिस्तान)घेण्याचा विक्रम केलेला आहे, ह्या शिवाय ५०० कसोटी बळी घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज आहे.

हेसुद्धा पहा[संपादन]

  1. भारतीय क्रिकेट संघनायक
  2. भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Test results summary". Cricinfo. 20 November 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "ODI results summary". Cricinfo. 25 April 2012 रोजी पाहिले.
  3. ^ "T20I results summary". Cricinfo. 25 April 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

भारतचा ध्वज भारत च्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

इराणी करंडक · चॅलेंजर करंडक · दुलीप करंडक · रणजी करंडक · रणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा · देवधर करंडक