संजय बांगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
Indian Cricket team training SCG 2015 (16005493848).jpg

संजय बापूसाहेब बांगर (ऑक्टोबर ११, इ.स. १९७२; गाव - भायाळा ता.पाटोदा जि.बीड, महाराष्ट्र - हयात) हा मराठी क्रिकेटखेळाडू असून भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय कसोटी व एकदिवसीय सामने खेळलेला खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे.

संजय ने महाराष्ट्र व मुंबई क्रिकेट युवक संघांकडून खेळत कारकिर्दीस सुरुवात केली. इ.स. १९९३-९४ सालातील हंगामापासून तो रेल्वे संघाकडून राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागला. रेल्वे संघाला रणजी करंडक स्पर्धेच्या इ.स. २०००-२००१ हंगामात उपविजेतेपद व इ.स. २००१-२००२ हंगामात विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता. त्याच्या अष्टपैलू कामगिरीने त्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघात त्याची वर्णी लागली. भारताकडून संजय बांगरने 12 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 12 कसोटीत 470 धावा केल्या असून सात बळीही घेतले. तसेच झिम्बाब्वेविरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती. 2002 साली यजमान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 68 धावांची झुंजार खेळी करताना भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडसोबत 170 धावांची भागीदारी केली होती. 2003 झालेल्या विश्व करंडक स्पर्धेतील अंतिम फेरीत खेळणाऱ्या संघात प्रतिनिधित्व केले. संजय बांगर रेल्वेचा कर्णधार प्रतिनिधित्व केले आहे. १ जानेवारी, २०१३ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्तरावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि रेल्वेचा कर्णधार संजय बांगरने निवृत्तीची घोषणा केली.

बाह्य दुवे[संपादन]