जॉर्ज बेली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्ज बेली

जॉर्ज जॉन बेली (सप्टेंबर ७, इ.स. १९८२:लॉन्सेस्टन, तास्मानिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. याने एकदिवसीय तसेच टी२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्वही केले आहे. हा तास्मानिया क्रिकेट संघाकडून शेफील्ड शील्ड सामने खेळतो. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत बेली चेन्नई सुपर किंग्सकडून तर बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सतर्फे खेळतो.

बेलीने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले. ऑस्ट्रेलियाच्या सर्वप्रथम सामन्यात संघनायक असणाऱ्या डेव्ह ग्रेगरीनंतर असे करणारा तो पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]