Jump to content

मार्क ग्रेटबॅच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मार्क जॉन ग्रेटबॅच (११ डिसेंबर, इ.स. १९६३:ऑकलंड, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.

ग्रेटबॅचने १९८९मध्ये ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे दोन दिवस फलंदाजी करून १४६ धावा काढल्या व न्यू झीलँडसाठी सामना वाचला होता. या खेळीदरम्यान ग्रेटबॅच ११ तास नाबाद राहिला होता.