१९७५ क्रिकेट विश्वचषक (अधिक्रुत नाव प्रुडंशियल चषक) आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (आयसीसी) आयोजित क्रिकेट विश्वचषकाचे पहिले आयोजन होते. हि स्पर्धा इंग्लंडमध्ये ७ जुन ते २१ जुन १९७५ च्या दरम्यान खेळवली गेली. हि स्पर्धा प्रुडंशियल ऍश्युरन्स कंपनीने प्रायोजित केली व ह्या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले. सहभागी संघातील ६ संघ कसोटी खेळणारे (ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान व वेस्ट इंडिज) तसेच श्रीलंका व पुर्व आफ्रिका. साखळी सामने ४ संघांच्या २ गटात खेळवले गेले. गट फेरीतील प्रमुख दोन संघ बाद फेरीत गेले.
सामने पाढर्या कपड्यात खेळवण्यात आले व प्रत्येक डाव ६० षटकांचा होता. सर्व सामने दिवसा खेळवण्यात आले. स्पर्धेच्या इतिहासातील एक विचत्र विक्रम भारतीय फलंदाज सुनिल गावस्करने केला. इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करत ६० षटकात ४ गडी गमावून ३३४ (डेनिस अमिस-१३७(१४७ चें. १८ चौ.) व किथ फ्लेचर - ६८(१०७ चें. ४ चौ, १ ष.) धावा केल्या. सुनिल गावस्करने ६० षटके फलंदाजी केली व १७४ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने नाबाद ३६ धावा केल्या.
प्रुडेंशियल चषक वेस्ट इंडिज ने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला हारवून जिंकला.
साखळी सामन्या साठी ४ संघांचा १ गट बनवण्यात आला ज्यात प्रत्येक संघ एकमेकाशी सामने खेळेल व गटातील मुख्य दोन संघ दुसर्या गटातील प्रमुख दोन संघासोबत बाद फेरीतील सामने खेळेल
अंतिम सामन्यात वेस्ट ईंडीझसंघाने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. वेस्ट ईंडीझसंघासाठी क्लाईव लॉईडने उत्तम फलंदाजी करत ८५ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज धावबाद झाले त्यातील तीन फलंदाजांना व्हिव्हियन रिचर्ड्सने धावबाद केले. ह्या स्पर्धेसाठी मालिकावीर पुरस्कार ठेवण्यात आलेला नव्हता.