Jump to content

जेम्स अँडरसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेम्स ॲंडरसन
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव जेम्स मायकल ॲंडरसन
उपाख्य जिमी, जिम, जिम्झा, द बर्नली एक्सप्रेस
जन्म ३० जुलै, १९८२ (1982-07-30) (वय: ४१)
बर्नली, लॅंकेशायर,इंग्लंड
उंची ६ फु २ इं (१.८८ मी)
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद-मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ९ (prev. ४०)
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००२–present लॅंकेशायर (संघ क्र. ९)
२००७/०८ ऑकलंड
२००० लॅंकेशायर
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने १८८ १९४ २९६ २६१
धावा १,३५३ २७३ २,०३९ ३७६
फलंदाजीची सरासरी ८.९६ ७.५८ ९.२६ ८.९५
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ०/१ ०/०
सर्वोच्च धावसंख्या ८१ २८ ८१ २८
चेंडू ३७,८७७ ९,५८४ ५८,८७५ १२,७३०
बळी ७०३ २६९ १,११४ ३२८
गोलंदाजीची सरासरी २६.५२ २९.२२ २४.६७ २८.५७
एका डावात ५ बळी ३२ ५४
एका सामन्यात १० बळी n/a -
सर्वोत्तम गोलंदाजी ७/४२ ५/२३ ७/१९ ५/२३
झेल/यष्टीचीत १०१/– ५३/– १५७/– ६८/–

११ जुलै, इ.स. २०२४
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

जेम्स मायकेल जिमी अँडरसन (जुलै ३०, इ.स. १९८२:बर्नली, लॅंकेशायर, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा २००३ पासून इंग्लंडसाठी सतत खेळत आहे. अँडरसन काउंटी क्रिकेटमध्ये लँकेशायरकडून खेळतो.

अँडरसन क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. याने जलदगती गोलंदाजांमध्ये सर्वाधिक तर एकूण गोलंदाजांमध्ये (मुतिया मुरलीधरन नंतर) दुसऱ्या क्रमांकाने सर्वाधिक बळी घेतले आहेत.

फेब्रुवारी २०२३मध्ये हा आयसीसी गोलंदाज क्रमवारीत हा पहिल्या क्रमांकावर होता. त्यावेळी त्याने सर्वाधिक वयाच्या गोलंदाजाने पहिला क्रमांक मिळविण्याचा विक्रम रचला.[१][२] वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या मोजक्या जलदगती गोलंदाजांत अँडरसन एक आहे.[३] २०२४मध्ये निवृत्तीच्या आधी अँडरसन ७व्या क्रमांकावर होता.[४]

अँडरसन आपला पहिला कसोटी सामना २००३मध्ये आणि शेवटचा २०२४मध्ये खेळला. हा इंग्लंडकडून २००२-१५ दरम्यान एकदिवसीय आणि २००७-०९ दरम्यान टी२० सामने खेळला..[५] २०१८मध्ये इंग्लंडच्या १,०००व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आपल्या सर्वोत्तम संघामध्ये त्याची निवड केली होती.[६]

अँडरसन जलदगती गोलंदाजांमध्ये कसोट्यांमधून सर्वाधिक बळी (७०४) घेणारा आहे. हा ६०० आणि ७०० बळी घेणारा पहिला जलदगती गोलंदाज आहे. इंग्लंडकडून अँडरसनने सर्वाधिक बळी घेतलेले आहेत.[७] हा इंग्लंडकडून सर्वाधिक आणि सचिन तेंडुलकरनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर सगळ्यात जास्त कसोटी सामने खेळलेला आहे.[८] याने इंग्लंडसाठी एकदिवसीय सामन्यांमध्येही सर्वाधिक (२६९) बळी घेतलेले आहेत.[९] अँडरसन आणि ज्यो रूटची १९८ धावांची भागीदारी इंग्लंडसाठी शेवटच्या विकेटसाठीची विक्रमी भागीदारी आहे. अँडरसन कसोट्यांमध्ये फलंदाजी करीत असताना विक्रमी ११४ वेळा नाबाद राहिला आहे.[१०]

उच्च फॉर्ममध्ये[मराठी शब्द सुचवा] असतानाही २०२४मध्ये इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने अँडरसनला लॉर्ड्स कसोटी सामन्यानंतर निवृत्त करण्याची घोषणा केली

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
  1. ^ Hogwood, Cameron (22 February 2023). "Anderson returns to top of ICC Test bowling rankings". Sky Sports. 1 June 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "England's 'evergreen' Anderson becomes oldest cricketer to top Test rankings". The Times of India. 22 February 2023.
  3. ^ "James Anderson: England bowler set to join illustrious list of stars to compete at the elite level after turning 40". BBC Sport. 16 August 2022.
  4. ^ "ICC – Test Match Player Rankings". Icc-cricket.com. 22 February 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "James Anderson profile and biography, stats, records, averages, photos, and videos".
  6. ^ "England's greatest Test XI revealed". ICC. 30 July 2018. 22 December 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 December 2022 रोजी पाहिले.
  7. ^ "James Anderson becomes third-highest wicket-taker in Tests". International Cricket Council. 4 April 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 6 August 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "Records – Test Matches – Individual Records (Captains, Players, Umpires) – Most Matches In Career". ESPNcricinfo. 22 December 2022 रोजी पाहिले.
  9. ^ "Records - England - One-Day Internationals - Most Wickets". ESPNcricinfo. 22 December 2022 रोजी पाहिले.
  10. ^ "Records. Test matches. Partnership records. Highest partnerships by wicket". ESPNcricinfo. 16 November 2021 रोजी पाहिले.