दक्षिण आशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दक्षिण आशिया
दक्षिण आशिया
लोकसंख्या १७० कोटी
देश
जीडीपी (२०१४) $९०५ अब्ज
प्रमाणवेळा यूटीसी+०५:००, यूटीसी+०५:३०, यूटीसी+०५:४५, यूटीसी+०६:००
राजधानीची शहरे

दक्षिण आशिया हा आशिया खंडामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. ह्या प्रदेशामध्ये भारतीय उपखंडामधील भूभागाचा समावेश होतो. भौगोलिक दृष्ट्या दक्षिण आशिया हिमालयाच्याहिंदुकुश पर्वतरांगे दक्षिणेकडील भारतीय प्रस्तरावर स्थित असून त्याच्या दक्षिणेस हिंदी महासागर आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेशश्रीलंका हे भारतीय उपखंडामधील प्रमुख देश तसेच, नेपाळ, अफगाणिस्तान, भूतानमालदीव ह्या आठ देशांना साधारणपणे दक्षिण आशियाई देश मानले जाते.

१९८५ साली दक्षिण आशियाई देशांनी प्रादेशिक राजकीय व वाणिज्य संबंध बळकट करण्यासाठी सार्कची स्थापना केली व २००४ साली दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराला मान्यता दिली.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: