ब्रेट ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रेट ली
Brett lee.JPG
Flag of Australia.svg ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव ब्रेट ली
उपाख्य बिंग, बिंगा, द स्पिडस्टर
जन्म ८ नोव्हेंबर, १९७६ (1976-11-08) (वय: ४१)
न्यू साउथ वेल्स,ऑस्ट्रेलिया
उंची ६ फु १ इं (१.८५ मी)
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद
नाते शेन ली (भाउ)
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (३८३) २६ डिसेंबर १९९९: वि भारत
शेवटचा क.सा. २६ डिसेंबर २००८: वि दक्षिण आफ्रिका
आं.ए.सा. पदार्पण (१४०) ९ जानेवारी २०००: वि पाकिस्तान
शेवटचा आं.ए.सा. १९ फेब्रुवारी २०१२:  वि भारत
एकदिवसीय शर्ट क्र. ५८
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९५ – न्यू साउथ वेल्स ब्ल्यु
२००८-२०१० किंग्स XI पंजाब
२०११- कोलकाता नाइट रायडर्स
२०११ वेलिंग्टन
२०११– सिडनी सिक्सर्स
कारकिर्दी माहिती
कसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.
सामने ७६ २२१ ११६ २६२
धावा १,४५१ ११७६ २,१२० १,३६५
फलंदाजीची सरासरी २०.१५ १७.८१ १८.५९ १७.०६
शतके/अर्धशतके ०/५ ०/३ ०/८ ०/३
सर्वोच्च धावसंख्या ६४ ५९ ९७ ५९
चेंडू १६,५३१ ११,१८५ २४,१९३ १३,४७५
बळी ३१० ३८० ४८७ ४३८
गोलंदाजीची सरासरी ३०.८१ २३.३६ २८.२२ २४.०५
एका डावात ५ बळी १० २० १०
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ५/३० ५/२२ ७/११४ ५/२२
झेल/यष्टीचीत २३/– ५४/– ३५/– ६२/–

१४ जुलै, इ.स. २०१२
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)


ब्रेट ली (नोव्हेंबर ८, इ.स. १९७६) हा एक माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. ली ला जगातील सर्वात जलद गोलंदाजापैकी एक मानले जाते. पदार्पणा नंतर सातत्याने २ वर्ष त्याने गोलंदाजी सरासरी २० चेंडू पेक्षा कमी ठेवली.[१]

ली उत्तम क्षेत्ररक्षक तसेच चांगला लोवर ऑर्डर फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये त्याची फलंदाजी सरासरी २० पेक्षा जास्त आहे. मायकल हसी सोबत १२३ धावांची सातव्या गड्यासाठी त्याची ऑस्ट्रेलियन संघासाठी विकमी भागीदारी आहे.[२]

लीचे उपाख्य 'बिंगा', न्यू साउथ वेल्स मधील बिंग ली ह्या इलेक्ट्रॉनिक वस्तुच्या दुकानांवरून पडले.

ब्रेट ली कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी आयपीएल मध्ये खेळतो.[३]

१३ जुलै, २०१२ रोजी ऑस्ट्रेलियन संघाच्या इंग्लंड दौऱ्या दरम्यान झालेल्या दुखापती नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधुन संन्यास घेण्याचे घोषित केले. ली आयपीएल तसेच बिग बॅश लीग खेळत राहील. [४]

गोलंदाजी पद्धती[संपादन]

ली जलदगती गोलंदाजी साठी जाणल्या जातो व तो नियमित पणे १५० किमी/ता किंवा अधिक गोलंदाजी करतो. पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर (१६१.३ किमी/ता, १००.२ मा/ता) नंतर जलदगती गोलंदाजीत ब्रेट ली चा नंबर आहे.[५] सातत्याने जलद गोलंदाजी केल्याने त्याला अनेक दुखापतींना सामोर जावे लागल. दुखापतीं पासुन दुर राहण्यासाठी त्याने आपली गोलंदाजी पद्धती बदलली.[६].

कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात लीची गोलंदाजी एक्शन चुकीची(क्रिकेट नियमांनुसार) असल्याचे म्हणले जायचे.[७] तसेच अनेक बीमर चेंडू एकदिवसीय सामन्यात टाकल्या नंतर बराच गदारोळ झाला होता.[८][९]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. HowSTAT! Player Analysis by Year.
  2. HowSTAT! Partnerships (ODI).
  3. "Brett Lee heaps praise on KKR skipper Gautam Gambhir". 
  4. "Lee calls time on international career". 
  5. International Bowling Speeds. Cricinfo. Retrieved 2 February 2007.
  6. "Farewell Brett Lee, a very modern purveyor of good old-fashioned pace". 
  7. "Lee's action cleared by ICC panel". 
  8. "Lee beamer lands him in hot water again". 
  9. "Beamers are not intentional – Ponting".