२०२२-२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)
२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान विविध
२०१७-२० (आधी)

२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा ही जून २०२२ पासून महिला क्रिकेट या खेळामध्ये सुरू होणारी एक स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनद्वारे सुरू केलेल्या आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेची ही तिसरी आवृत्ती आहे. स्पर्धेतील सर्व सामने हे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने या स्वरूपाचे असणार आहेत. सदर स्पर्धा २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीचा पहिला टप्पा आहे. एकूण दहा देशांदरम्यान सदर स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धेच्या शेवटी अव्वल पाच संघ व यजमान अद्याप अघोषित २०२५ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र होतील व तळाचे चार संघ विश्वचषकाच्या इतर दोन जागांसाठी महिला वनडे क्रमवारीमधून इतर दोन संघासोबत पात्रता सामने खेळतील.

सप्टेंबर २०१८ मध्ये आयसीसीने स्पर्धेत आणखी दोन संघांना दाखल करण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार स्पर्धेच्या या आवृत्तीसाठी बांगलादेश आणि आयर्लंड हे दोन देश आयसीसी महिला वनडे क्रमवारीनुसार पात्र ठरले. मार्च २०२२ मध्ये २०२२-२५ महिला अजिंक्यपद स्पर्धेसाठी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करणारा आयर्लंड पहिला देश ठरला जेव्हा आयर्लंड क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याची घोषणा केली. पाठोपाठ पाकिस्तानने देखील तीन मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले.

सहभागी देश[संपादन]

खालील देश सदर स्पर्धेत सहभाग घेतील:

निकाल[संपादन]

प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी प्रत्येकी ३ सामने खेळला

गुण देण्याची पद्धत :

  • सामना जिंकल्यास - २ गुण
  • सामना बरोबरीत, अनिर्णित, पावसामुळे रद्द करण्यात आला तर १ गुण
  • सामना हरल्यास - ० गुण

सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे :

फेरी विंडो यजमान संघ पाहुणा संघ दिनांक निकाल

२०२२

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १ जून २०२२ २-१
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ११ जून २०२२ ०-३
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत २३ जून २०२२ ०-३
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत १८ सप्टेंबर २०२२ ०-३

२०२२-२३

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ नोव्हेंबर २०२२ ३-०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान जानेवारी २०२३

गुणफलक[संपादन]

संघ
सा वि का.गु. गुण पात्रता
भारतचा ध्वज भारत १२ २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक करिता थेट पात्र
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १०
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता करिता पात्र
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड

स्रोत: क्रिकइन्फो[१]

  •   २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र.
  •   महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी पात्र.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "आयसीसी महिला चॅम्पियनशिप २०२२/२३-२०२५". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]