Jump to content

स्टॉर्मोंट (क्रिकेट मैदान)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टॉर्मॉन्ट (क्रिकेट ग्राउंड) या पानावरून पुनर्निर्देशित)
स्टोरमोंट
मैदान माहिती
स्थान बेलफास्ट, उत्तर आयर्लंड
स्थापना १९४९
आसनक्षमता ६,०००

प्रथम ए.सा. १३ जून २००६:
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
अंतिम ए.सा. ४ जून २०१९:
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
प्रथम २०-२० २ ऑगस्ट २००८:
केन्या Flag of केन्या वि. Flag of the Netherlands नेदरलँड्स
अंतिम २०-२० १० जुलै २०१९:
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
शेवटचा बदल २५ मे २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

स्टोरमोंट (किंवा सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदान) हे उत्तर आयर्लंडच्या बेलफास्ट शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१३ जून २००६ रोजी आयर्लंड आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तर २ ऑगस्ट रोजी नेदरलँड्स आणि केन्या या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.

५ ऑगस्ट १९९७ रोजी आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला जो की दक्षिण आफ्रिका महिलांचा पहिला महिला एकदिवसीय सामना होता. तर आयर्लंड आणि स्कॉटलंड या देशांनी या मैदानावरचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना २४ मे २०२१ रोजी खेळला.