२०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक
Appearance
सर्बिया क्रिकेट संघाने जून २०२२ मध्ये चार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बल्गेरियााचा दौरा केला. मालिकेला २०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक नाव दिले गेले. सोफिया चषक स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती होती. यावेळेस बहुदेशीय स्पर्धा न ठेवता द्विपक्षीय मालिका खेळवली गेली. सदर मालिका २०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी खेळवली गेली.
बल्गेरियाने सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवत २०२२ सोफिया ट्वेंटी२० चषक ४-० या फरकाने जिंकला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि |
||
विंट्ले बर्टन ८३ (२७) एहसान खान २/१८ (३ षटके) |
केविन डि'सुझा ९२* (३४) निकोलस जॉन्स-विकबर्ग २/३९ (३.३ षटके) |
- नाणेफेक : बल्गेरिया, क्षेत्ररक्षण.
- मॅथ्यू कॉस्टिक, एयो मीने-एजीगी आणि रॉबिन विटास (स) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

