Jump to content

२०२४ आयसीसी पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अंतिम सामना
स्पर्धा २०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक
दिनांक २९ जून २०२४
मैदान केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस
२०२६ →


२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अंतिम सामना २९ जून २०२४ रोजी ब्रिजटाउन, बार्बाडोस येथील केन्सिंग्टन ओव्हल येथे २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा विजेता निश्चित करण्यासाठी खेळवला जाणारा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट सामना असेल.[१][२] हा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान होणार आहे. आशियाई संघ आणि आफ्रिकन संघ टी२० विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे.[३]

पार्श्वभूमी[संपादन]

२२ सप्टेंबर २०२३ रोजी, आयसीसीने संपूर्ण स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन करणारी ठिकाणे जाहीर केली,[४] बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल अंतिम सामन्याचे ठिकाण ठरविण्यात आले.[५] ५ जानेवारी २०२४ रोजी, आयसीसीने स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आणि अंतिम सामना २९ जून २०२४ रोजी होणार आहे.[६]

दक्षिण आफ्रिका टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीसाठी पहिल्यांदाच पात्र ठरला[७], तर भारत २००७ मध्ये चॅम्पियन आणि २०१४ मध्ये उपविजेता ठरल्यानंतर तिसऱ्यांदा अंतिम फेरीसाठी पात्र ठरला[८]. दोन्ही संघ अपराजित राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले, त्यांनी एकही गट स्टेज गेम किंवा सुपर ८ सामना गमावला नाही.[९] या सामन्यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहा वेळा एकमेकांशी सामना केला होता ज्यामध्ये भारताने चार वेळा (२००७, २०१०, २०१२, २०१४) आणि दक्षिण आफ्रिकेने दोन वेळा (२००९ आणि २०२२) विजय मिळवला होता.[१०]

अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास[संपादन]

आढावा[संपादन]

  • स्रोत: इएसपीएन क्रिकइन्फो[११]
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका वि भारतचा ध्वज भारत
प्रतिस्पर्धी दिनांक निकाल गुण सामना प्रतिस्पर्धी दिनांक निकाल गुण
गट ड गट फेरी गट अ
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २ जून २०२४ विजयी आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ५ जून २०२४ विजयी
Flag of the Netherlands नेदरलँड्स ८ जून २०२४ विजयी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ जून २०२४ विजयी
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १० जून २०२४ विजयी Flag of the United States अमेरिका १२ जून २०२४ विजयी
नेपाळचा ध्वज नेपाळ १४ जून २०२४ विजयी कॅनडाचा ध्वज कॅनडा १५ जून २०२४ अनिर्णित
गट २ सुपर ८ गट १
Flag of the United States अमेरिका १९ जून २०२४ विजयी अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २० जून २०२४ विजयी
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २१ जून २०२४ विजयी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २२ जून २०२४ विजयी
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २३ जून २०२४ विजयी (ड/लु) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २४ जून २०२४ विजयी
उपांत्य सामना १ बाद फेरी उपांत्य सामना २
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २६ जून २०२४ विजयी उपांत्य सामना इंग्लंडचा ध्वज इंग्लंड २७ जून २०२४ विजयी
२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अंतिम सामना

दक्षिण आफ्रिका[संपादन]

दक्षिण आफ्रिकेने नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम  येथे श्रीलंकेवर विजय मिळवून त्यांच्या टी२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली आणि त्याच ठिकाणी नेदरलँड्स आणि बांगलादेशला पराभूत केले. अर्नोस व्हॅले येथे नेपाळला पराभूत केल्यानंतर, त्यांनी ड गटामध्ये शीर्ष स्थानावर राहत गट फेरी पूर्ण केली.  सुपर ८ टप्प्यात, त्यांनी नॉर्थ साउंड येथे सह-यजमान युनायटेड स्टेट्सचा पराभव केला,  गतविजेत्या इंग्लंडचा ग्रॉस आयलेट येथे पराभव केला आणि नॉर्थ साउंड येथे माजी विजेतेआणि सह-यजमान वेस्ट इंडीज संघाचा पराभव करून गट २ मध्ये अग्रस्थान मिळविले

दक्षिण आफ्रिकेने त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील सॅन फर्नांडो येथील ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये पहिल्या उपांत्य सामन्यात मध्ये अफगाणिस्तानचा पराभव करून प्रथमच टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये स्थान मिळवले. मार्को यान्सिनने ३ गडी बाद केले, त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

भारत[संपादन]

भारताने त्यांच्या टी२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे आयर्लंडवर विजय मिळवून केली आणि त्याच मैदानावर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि सह-यजमान युनायटेड स्टेट्स यांचा पराभव केला.  फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क येथे मुसळधार पावसामुळे कॅनडा विरुद्धचा सामना रद्द करण्यात आला, अशा प्रकारे भारताने अ गटात पहिले स्थान मिळवून गट फेरी पूर्ण केली. सुपर ८ टप्प्यात, त्यांनी बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे अफगाणिस्तानचा पराभव केला, सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर बांगलादेश आणि सेंट लुसियातील ग्रॉस आयलेट येथील डॅरेन सॅमी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि गट १ मध्ये पहिले स्थान पटकावले.

भारताने गतविजेत्या इंग्लंडला दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये पराभूत करून गयानामधील जॉर्जटाउन येथील प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक अंतिम फेरीत स्थान मिळवले. १० धावा आणि ३ गाडी बाद घेतल्याबद्दल अक्षर पटेलला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "नवीन स्वरूप, नवीन स्थान: २०२४ टी२० विश्वचषक कसा असेल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २१ नोव्हेंबर २०२२. Archived from the original on २१ नोव्हेंबर २०२२. २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ बद्दल सर्वकाही". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). 2024-05-21. २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ आयसीसी (२७ जून २०२४). "टी२० विश्वचषक २०२४ अंतिम सामन्यासाठी तपशीलांची पुष्टी". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ पश्चिमेकडे जात असताना कॅरिबियन, यूएसए स्थळांची पुष्टी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. Archived from the original on २५ सप्टेंबर २०२३. २२ सप्टेंबर २०२३ रोजी पाहिले.
  5. ^ "बार्बाडोसमध्ये जून २०२४ मधील आयसीसी टी२० विश्वचषकातील अंतिम आणि इतर ८ सामने खेळविण्यात येणार". बार्बाडोस क्रिकेट असोसिएशन. ५ जानेवारी २०२४ रोजी पाहिले.
  6. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२४ साठी गट, सामने निश्चित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ जानेवारी २०२४. Archived from the original on १० मार्च २०२४. २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  7. ^ "अफगाणिस्तानला पराभूत करून दक्षिण आफ्रिकेचा पुरुष विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २७ जून २०२४ रोजी पाहिले.
  8. ^ "रोहित, फिरकीपटूंच्या कामगिरीच्या जोरावर भारत तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत". हिंदुस्थान टाइम्स. २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  9. ^ "टी२० विश्वचषक २०२४ वेळापत्रक | आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक सामने आणि निकाल". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ जून २०२४ रोजी पाहिले.
  10. ^ "भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमने सामने - टी२० विश्वचषक". स्पोर्ट्स कीडा. २८ मे २०२४ रोजी पाहिले.
  11. ^ "टी३० विश्वचषक २०२४ वेळापत्रक | आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक सामने आणि निकाल". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २८ जून २०२४ रोजी पाहिले.