Jump to content

२०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा
तारीख १७ – २५ जून २०२२
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान मलेशिया मलेशिया
विजेते संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती (१ वेळा)
सहभाग १०
सामने २३
मालिकावीर संयुक्त अरब अमिराती तीर्था सतीश
सर्वात जास्त धावा संयुक्त अरब अमिराती ईशा ओझा (१९२)
सर्वात जास्त बळी नेपाळ अस्मिना कर्माचार्य (८)
हाँग काँग माऱ्याम बीबी (८)

२०२२ एसीसी महिला ट्वेंटी२० अजिंक्यपद स्पर्धा ही आशिया क्रिकेट संघटनद्वारे अयोजीत केलेली महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १७-२५ जून २०२२ दरम्यान मलेशियामध्ये झाली. सदर स्पर्धा डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशात झालेल्या २०२२ महिला आशिया चषक स्पर्धेसाठी पात्रता स्पर्धा होती. अव्वल दोन संघ मुख्य आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरले. क्वालालंपूर मधील किन्रर अकॅडेमी ओव्हल मैदानावर खेळवले गेलेले हे शेवटचे क्रिकेट सामने होते. ३० जून २०२२ रोजी सदर मैदान पाडण्यात आले.

यजमान मलेशियासह बहरैन, भूतान, हाँग काँग, कुवेत, नेपाळ, ओमान, कतार, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती या दहा देशांनी स्पर्धेत भाग घेतला. १० संघांना पाचच्या दोन गटात ठेवण्यात आले. गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. आणि उपांत्य सामन्यांचे विजेते थेट आशिया चषकास पात्र ठरले. तरीसुद्धा स्पर्धेचा विजेता ठरविण्यासाठी उपांत्य सामन्यांच्या विजेत्यांमध्ये जेतेपदासाठी अंतिम सामना खेळविण्यात आला. उपांत्य फेरीतून मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती अंतिम सामन्यासाठी आणि परिणामतः २०२२ महिला आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात संयुक्त अरब अमिरातीने मलेशियाचा ५ गडी राखून पराभव करत अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

गट फेरी

[संपादन]

गट अ

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ५.७१३ उपांत्य फेरीत बढती
मलेशियाचा ध्वज मलेशिया २.३८३
कतारचा ध्वज कतार -१.४१९ बाद
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर -३.७७७
ओमानचा ध्वज ओमान -२.०५८
१७ जून २०२२
११:००
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१७१/४ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
५४ (१७.४ षटके)
मास एलिसा ५९ (३९)
अदा भसिन २/३९ (४ षटके)
विघ्नेश्वरी पसुपथी १० (२२)
निक नुर अतीला २/२ (२ षटके)
मलेशिया महिला ११७ धावांनी विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: समद अकबर (था) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: मास एलिसा (मलेशिया)
  • नाणेफेक : मलेशिया महिला, फलंदाजी.
  • चतुराणी अबेरत्ने, अदा भसिन, विनु कुमार, जोहन्ना पुरणाकरण, दामिनी रमेश आणि झे हुआ तान (सिं) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१७ जून २०२२
१५:००
धावफलक
ओमान Flag of ओमान
२६/३ (८.४ षटके)
वि
फिझा जावेद ९ (२४)
ईशा ओझा १/२ (०.४ षटक)
सामन्याचा निकाल लागला नाही.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: लोगनाथन पूबालन (म) आणि नारायणन सिवन (म)
  • नाणेफेक : ओमान महिला, फलंदाजी.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करावा लागला.
  • ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीने मलेशियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • अलिफिया सैय्यद (ओ) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१८ जून २०२२
११:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
२९ (१७.२ षटके)
वि
शफिना महेश ९ (१६)
ईशा ओझा ३/६ (४ षटके)
ईशा ओझा २९* (१४)
संयुक्त अरब अमिराती महिला १० गडी राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: विश्वनंदन कालीदास (म) आणि नारायणन सिवन (म)
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, क्षेत्ररक्षण.
  • सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • संयुक्त अरब अमिरातीने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सिंगापूरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • रिया भसिन (सिं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१८ जून २०२२
१५:००
धावफलक
कतार Flag of कतार
६९ (१९.४ षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
७१/० (१२.३ षटके)
आयशा ३३* (४७)
नूर दानिया स्युहदा २/९ (४ षटके)
वान जुलिया ३१* (३८)
मलेशिया महिला १० गडी राखून विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: आनंद नटराजन (सिं) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: विनीफ्रेड दुराईसिंगम (मलेशिया)
  • नाणेफेक : मलेशिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • मलेशिया आणि कतार या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • कतारने मलेशियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • मलेशियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये कतारवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

१९ जून २०२२
१०:३०
धावफलक
ओमान Flag of ओमान
४८ (१३ षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
४९/३ (८.५ षटके)
भक्ती शेट्टी २२ (३३)
हिरल अगरवाल ३/१ (२ षटके)
श्रुतीबेन राणा ११ (२०)
अमांदा डिकोस्टा १/१० (१.५ षटके)
कतार महिला ७ गडी राखून विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: तबारक दर (हाँ.काँ.) आणि नारायणन सिवन (म)
सामनावीर: अँजेलिन मारे (क)
  • नाणेफेक : कतार महिला, क्षेत्ररक्षण.
  • कतारने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ओमानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२० जून २०२२
१०:३०
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
१३४/१ (२० षटके)
वि
मलेशियाचा ध्वज मलेशिया
१०३/८ (२० षटके)
तीर्था सतीश ५२* (५६)
मास एलिसा १/१८ (२ षटके)
मास एलिसा ३४ (३१)
इंदुजा नंदकुमार ४/१० (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती महिला ३१ धावांनी विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: आनंद नटराजन (सिं) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: इंदुजा नंदकुमार (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : मलेशिया महिला, क्षेत्ररक्षण.

२० जून २०२२
१४:१५
धावफलक
ओमान Flag of ओमान
१०९/६ (२० षटके)
वि
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर
११०/५ (१९.५ षटके)
प्रियांका मेंडोन्का ४८* (३९)
विनु कुमार २/२० (४ षटके)
विनु कुमार ३८ (४५)
प्रियांका मेंडोन्का २/१५ (४ षटके)
सिंगापूर महिला ५ गडी राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: समद अकबर (था) आणि लोगनाथन पूबालन (म)
सामनावीर: विनु कुमार (सिंगापूर)
  • नाणेफेक : सिंगापूर महिला, क्षेत्ररक्षण.
  • ओमान आणि सिंगापूर या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • सिंगापूरने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ओमानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • जोसेलिन पूर्नकरन (सिं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२१ जून २०२२
११:००
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
४६ (१४.३ षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
४७/५ (१०.३ षटके)
विनु कुमार ७ (८)
अँजेलाइन मारे ३/१२ (४ षटके)
साची धाडवाल १४* (२०)
शफिना महेश २/२१ (४ षटके)
कतार महिला ५ गडी राखून विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: तबारक दर (हाँ.काँ.) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: अँजेलाइन मारे (कतार)
  • नाणेफेक : कतार महिला, क्षेत्ररक्षण.
  • कतार आणि सिंगापूर या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • कतारने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये सिंगापूरवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • आनंन्याप्रिया वेंकट (सिं) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२२ जून २०२२
११:००
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१३५/४ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
८२/६ (२० षटके)
विनीफ्रेड दुराईसिंगम ७३ (६८)
अमांदा डि'कोस्टा २/१९ (४ षटके)
प्रियंका मेंडोंका ४५* (४८)
नुर दानिया स्युहादा १/८ (४ षटके)
मलेशिया महिला ५३ धावांनी विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: समद अकबर (था) आणि आनंद नटराजन (सिं)
सामनावीर: विनीफ्रेड दुराईसिंगम (मलेशिया‌)
  • नाणेफेक : ओमान महिला, क्षेत्ररक्षण.
  • मलेशिया आणि ओमान या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • मलेशियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ओमानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२२ जून २०२२
१५:००
धावफलक
संयुक्त अरब अमिराती Flag of संयुक्त अरब अमिराती
२१४/१ (२० षटके)
वि
कतारचा ध्वज कतार
६१/७ (२० षटके)
ईशा ओझा ११५ (६७)
साची धाडवाल १/३७ (४ षटके)
साची धाडवाल ११ (१३)
सुरक्षा कोट्टे ४/११ (४ षटके)
संयुक्त अरब अमिराती महिला १५३ धावांनी विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: समद अकबर (था) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: ईशा ओझा (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती महिला, फलंदाजी.
  • संचिन सिंग (सं.अ.अ.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


गट ब

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग १.५३२ उपांत्य फेरीत बढती
नेपाळचा ध्वज नेपाळ १.०९४
कुवेतचा ध्वज कुवेत -०.७७७ बाद
भूतानचा ध्वज भूतान ०.१२२
बहरैनचा ध्वज बहरैन -३.०२४
१७ जून २०२२
११:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
९४/९ (२० षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
४४ (१७.५ षटके)
काजल श्रेष्ठ २६ (३५)
सोनम ४/१३ (४ षटके)
शेरिंग झांग्मो १६ (२८)
संगीता राय ४/६ (२.५ षटके)
नेपाळ महिला ५० धावांनी विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: आनंद नटराजन (सिं) आणि लोगनाथन पूबालन (म)
सामनावीर: संगीता राय (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ महिला, फलंदाजी.
  • नेपाळ आणि भूतानने मलेशियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • सोनम आणि साङे वांग्मो (भू‌) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१७ जून २०२२
१५:००
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
४०/१ (६.१ षटके)
वि
थरंगा गजनायके १५* (१९)
प्रियदा मुरली १/१० (२ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: समद अकबर (था) आणि तबारक दर (हाँ.काँ)
  • नाणेफेक : कुवेत महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत सामना रद्द.
  • कुवेत आणि बहरैनने मलेशियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • इशरा सुहुन (ब) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१८ जून २०२२
११:००
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
१०२/८ (२० षटके)
वि
भूतानचा ध्वज भूतान
८८/७ (२० षटके)
मारिको हिल ४० (३६)
सोनम २/२३ (४ षटके)
शेरिंग झांग्मो २५* (३७)
मारिको हिल २/१५ (४ षटके)
हाँग काँग महिला १४ धावांनी विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: सारिका प्रसाद (सिं) आणि दुर्गा सुवेदी (ने‌)
सामनावीर: मारिको हिल (हाँग काँग)
  • नाणेफेक : भूतान, क्षेत्ररक्षण.
  • हाँग काँगने मलेशियामध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • एलिसा हबर्ड (हाँ.काँ.) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

१८ जून २०२२
१५:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१०७/४ (२० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
८२/७ (२० षटके)
रुबिना छेत्री ३४* (२७)
मरिअम्मा हैदर २/१० (४ षटके)
प्रियदा मुरली ३१ (४०)
सिता राणा मगर २/१९ (४ षटके)
नेपाळ महिला २५ धावांनी विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: तबारक दर (हाँ.काँ.) आणि विश्वनंदन कालीदास (म)
सामनावीर: रुबिना छेत्री (नेपाळ)
  • नाणेफेक : कुवेत महिला, क्षेत्ररक्षण.

१९ जून २०२२
१०:३०
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
७९/९ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
८१/२ (११.२ षटके)
दीपिका रसंगिका ४७* (४९)
इक्रा सहार २/८ (४ षटके)
केरी चॅन २३* (१९)
गयानी फर्नांडो १/२१ (२ षटके)
हाँग काँग महिला ८ गडी राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: समद अकबर (था) आणि सारिका प्रसाद (सिं)
सामनावीर: केरी चॅन (हाँग काँग)
  • नाणेफेक : हाँग काँग महिला, क्षेत्ररक्षण.
  • बहरैन आणि हाँग काँग या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • हाँग काँगने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बहरैनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • पूर्वजा जगदीश (ब) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२० जून २०२२
१०:३०
धावफलक
बहरैन Flag of बहरैन
१४/६ (७ षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
१५/२ (३.४ षटके)
इशरा सुहुन ६ (१०)
कविता कुंवर २/२ (२ षटके)
सिता राणा मगर ४ (३)
पवित्रा शेट्टी १/३ (२ षटके)
नेपाळ महिला ८ गडी राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: समद अकबर (था) आणि विश्वनंदन कालीदास (म)
सामनावीर: कविता कुंवर (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ७ षटकांचा करण्यात आला.
  • बहरैन आणि नेपाळ या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • नेपाळने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बहरैनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२१ जून २०२२
१०:३०
धावफलक
भूतान Flag of भूतान
११२ (१९.४ षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
११६/७ (१९ षटके)
न्गावांग चोदेन २८ (३४)
अम्ना तारिक २/२० (४ षटके)
माऱ्याम ओमर ४६ (५३)
अंजू गुरुंग २/२२ (४ षटके)
कुवेत महिला ३ गडी राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: आनंद नटराजन (सिं) आणि नारायणन सिवन (सिं)
सामनावीर: माऱ्याम ओमर (कुवेत)
  • नाणेफेक : कुवेत महिला, क्षेत्ररक्षण.
  • कुवेतने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये भूतानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

२१ जून २०२२
१४:१५
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१०९/६ (२० षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
११२/३ (१५.५ षटके)‌
रुबिना छेत्री ३२* (३६)
बेटी चॅन २/१७ (४ षटके)
मारिको हिल ४५ (३२)
संगीता राय २/२० (२ षटके)
हाँग काँग महिला ७ गडी राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: आनंद नटराजन (सिं) आणि लोगनाथन पूबालन (म)
सामनावीर: मारिको हिल (हाँग काँग)
  • नाणेफेक : नेपाळ महिला, फलंदाजी.

२२ जून २०२२
१०:३०
धावफलक
हाँग काँग Flag of हाँग काँग
९०/८ (२० षटके)
वि
कुवेतचा ध्वज कुवेत
६० (१७.४ षटके)
नताशा माईल्स २८ (३६)
अम्ना तारिक ३/१३ (४ षटके)
माऱ्याम ओमर २२ (२८)
माऱ्याम बिबी ४/८ (४ षटके)
हाँग काँग महिला ३० धावांनी विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: विश्वनंदन कालीदास (म) आणि लोगनाथन पूबालन (म)
सामनावीर: माऱ्याम बिबी (हाँग काँग)
  • नाणेफेक : कुवेत महिला, क्षेत्ररक्षण.

२२ जून २०२२
१४:१५
धावफलक
भूतान Flag of भूतान
१२६/२ (२० षटके)
वि
बहरैनचा ध्वज बहरैन
६३/६ (२० षटके)
डेचेन वांग्मो ६४* (५२)
प्रज्ना जगदीश १/१४ (२ षटके)
थरंगा गजानायके ३० (३७)
अंजू गुरुंग २/७ (४ षटके)
भूतान महिला ६३ धावांनी विजयी.
युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बंगी
पंच: लोगनाथन पूबालन (म) आणि नारायणन सिवन (म)
सामनावीर: डेचेन वांग्मो (भूतान)
  • नाणेफेक : बहरैन महिला, क्षेत्ररक्षण.
  • बहरैन आणि भूतान या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • भूतानने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बहरैनवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • डेचेन वांग्मो (भू) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


बाद फेरी

[संपादन]
  उपांत्य सामने अंतिम सामना
                 
अ१  संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ८१ (१९.५ षटके)  
ब२  नेपाळचा ध्वज नेपाळ पाऊस - खेळ रद्द  
    अ१  संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १०१/५ (१८.२ षटके)
  अ२  मलेशियाचा ध्वज मलेशिया १००/४ (२० षटके)
ब१  हाँग काँगचा ध्वज हाँग काँग ७४/८ (११ षटके)
अ२  मलेशियाचा ध्वज मलेशिया ८६/४ (११ षटके)  

उपांत्य सामने

[संपादन]
१ला उपांत्य सामना
२४ जून २०२२
११:००
धावफलक
वि
वैष्णवी महेश १६ (११)
अस्मिना कर्माचार्य ५/१० (३.५ षटके)
सामन्याचा निकाल लागला नाही.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: तबारक दर (हाँ.काँ.) आणि विश्वनंदन कालीदास (म)
  • नाणेफेक : नेपाळ महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे उर्वरीत खेळ झाला नाही व गट फेरीत गुण जास्त असल्याने संयुक्त अरब अमिराती अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला.

२रा उपांत्य सामना
२४ जून २०२२
१५:००
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
८६/४ (११ षटके)
वि
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग
७४/८ (११ षटके)
मास एलिसा ३३* (२४)
माऱ्याम बीबी २/२३ (२ षटके)
कॅरी चॅन १९ (१०)
निक नुर अतिला २/९ (२ षटके)
मलेशिया महिला १२ धावांनी विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: सारिका प्रसाद (सिं) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: मास एलिसा (मलेशिया‌)
  • नाणेफेक : हाँग काँग महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ११ षटकांचा करण्यात आला.
  • मलेशियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये हाँग काँगवर पहिल्यांदाच विजय मिळवला.

अंतिम सामना

[संपादन]
अंतिम सामना
२५ जून २०२२
११:००
धावफलक
मलेशिया Flag of मलेशिया
१००/४ (२० षटके)
वि
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
१०१/५ (१८.२ षटके)
ऐना हामीझाह हशिम २८* (३८)
इंदुजा नंदकुमार २/१७ (४ षटके)
तीर्था सतीश ५५ (४२)
ऐसा एलीसा १/१० (२.४ षटके)
संयुक्त अरब अमिराती महिला ५ गडी राखून विजयी.
किन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूर
पंच: आनंद नटराजन (सिं) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: तीर्था सतीश (संयुक्त अरब अमिराती)
  • नाणेफेक : मलेशिया महिला, फलंदाजी.