Jump to content

भारतीय महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२
श्रीलंका महिला
भारत महिला
तारीख २३ जून – ७ जुलै २०२२
संघनायक चामरी अटापट्टू हरमनप्रीत कौर
एकदिवसीय मालिका
निकाल भारत महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा निलाक्षी डि सिल्व्हा (१२३) शफाली वर्मा (१५५)
सर्वाधिक बळी इनोका रणवीरा (६) रेणुका सिंग (७)
मालिकावीर हरमनप्रीत कौर (भारत)
२०-२० मालिका
निकाल भारत महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा चामरी अटापट्टू (१३९) हरमनप्रीत कौर (९२)
सर्वाधिक बळी इनोका रणवीरा (६) राधा यादव (४)
मालिकावीर हरमनप्रीत कौर (भारत)

भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै २०२२ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने आणि तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत खेळवली गेली. मिताली राज हिने घेतलेल्या निवृत्तीमुळे हरमनप्रीत कौरला भारताच्या कर्णधारपदी नेमण्यात आले.

भारताने पहिला ट्वेंटी२० सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसरा सामन्यात देखील विजय मिळवत भारताने श्रीलंकेविरुद्ध सलग बारावा ट्वेंटी२० विजय नोंदवला. तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात कर्णधार चामरी अटापट्टूच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने भारताचा ७ गडी राखून पराभव केला, हा श्रीलंकेचा मायदेशातील भारताविरुद्धचा पहिला ट्वेंटी२० विजय होता. भारतीय महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.

भारताने पहिला महिला वनडे सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात भारताने १७४ धावांचे लक्ष्य एकही गडी बाद न होता पार केले. महिला वनडे सामन्यांमध्ये एकही गडी बाद न होता पाठलाग केलेली ही सर्वोच्च धावसंख्या होती. तिसऱ्याही सामन्यामध्ये विजय मिळवत भारताने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२३ जून २०२२
१४:००
धावफलक
भारत Flag of भारत
१३८/६ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१०४/५ (२० षटके)
कविशा दिलहारी ४७* (४९)
राधा यादव २/२२ (४ षटके)
भारत महिला ३४ धावांनी विजयी.
रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: सुसंता दिस्सनायके (श्री) आणि दीपल गुणवर्दने (श्री‌)
सामनावीर: जेमिमाह रॉड्रिगेस (भारत)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.

२रा सामना

[संपादन]
२५ जून २०२२
१४:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१२५/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१२७/५ (१९.१ षटके)
भारत महिला ५ गडी राखून विजयी.
रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: दीपल गुणवर्दने (श्री) आणि रनमोरे मार्टिनेझ (श्री‌)
सामनावीर: हरमनप्रीत कौर (भारत)
  • नाणेफेक : श्रीलंका महिला, फलंदाजी.

३रा सामना

[संपादन]
२७ जून २०२२
१४:००
धावफलक
भारत Flag of भारत
१३८/५ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१४१/३ (१७ षटके)
चामरी अटापट्टू ८०* (४८)
रेणुका सिंग १/२७ (४ षटके)
श्रीलंका महिला ७ गडी राखून विजयी.
रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: सुसंता दिस्सनायके (श्री) आणि रनमोरे मार्टिनेझ (श्री)
सामनावीर: चामरी अटापट्टू (श्रीलंका)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.


२०२२-२५ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धा - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
श्रीलंका Flag of श्रीलंका
१७१ (४८.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७६/६ (३८ षटके)
हरमनप्रीत कौर ४४ (६३)
इनोका रणवीरा ४/३९ (१० षटके)
भारत महिला ४ गडी राखून विजयी.
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी
पंच: रनमोरे मार्टिनेझ (श्री) आणि प्रगीथ राम्बुकवेल्ला (श्री)
सामनावीर: दीप्ती शर्मा (भारत)


२रा सामना

[संपादन]
श्रीलंका Flag of श्रीलंका
१७३ (५० षटके‌)
वि
भारतचा ध्वज भारत
१७४/० (२५.४ षटके)
अमा कंचना ४७* (८३)
रेणुका सिंग ४/२८ (१० षटके)
भारत महिला १० गडी राखून विजयी.
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी
पंच: लायडन हानीबल (श्री)‌ आणि प्रगीथ राम्बुकवेल्ला (श्री)
सामनावीर: रेणुका सिंग (भारत)


३रा सामना

[संपादन]
भारत Flag of भारत
२५५/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१६ (४७.३ षटके)
हरमनप्रीत कौर ७५ (८८)
इनोका रणवीरा २/२२ (१० षटके)
भारत महिला ३९ धावांनी विजयी.
पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी
पंच: रुचिरा पल्लियागुरुगे (श्री) आणि रविंद्र विमलासीरी (श्री)
सामनावीर: हरमनप्रीत कौर (भारत)


साचा:आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे