वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२
नेदरलँड्स
वेस्ट इंडीज
तारीख ३१ मे – ४ जून २०२२
संघनायक पीटर सीलार निकोलस पूरन
एकदिवसीय मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मॅक्स ओ'दाउद (१७९) शामार ब्रुक्स (१६७)
सर्वाधिक बळी लोगन व्हान बीक (४) अकिल होसीन (८)‌
मालिकावीर अकिल होसीन (वेस्ट इंडीज)

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी मे-जून २०२२ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने ॲम्स्टलवीन शहरातील व्ही.आर.ए. मैदान या मैदानावर झाले. ही पहिलीच अशी वेळ होती जेव्हा वेस्ट इंडीजने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला. यापूर्वी १९९१ मध्ये दोन ५५ षटकांचे सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीज संघ नेदरलँड्सच्या दौऱ्यावर आला होता.

दौऱ्यापूर्वी किरॉन पोलार्डच्या निवृत्तीमुळे निकोलस पूरनला वेस्ट इंडीजचा कर्णधार नेमण्यात आले. शई होपच्या नाबाद ११९ धावांच्या जोरावर वेस्ट इंडीजने पहिला सामना जिंकला. पुढील दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत वेस्ट इंडीजने मालिका ३-० ने जिंकली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

नेदरलँड्स Flag of the Netherlands
२४०/७ (४५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२४९/३ (४३.१ षटके)
तेजा निदामनुरु ५८* (५१)
अकिल होसीन २/२९ (९ षटके)
शई होप ११९* (१३०)
लोगन व्हान बीक २/४९ (८ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी (ड/लु पद्धत).
व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: शई होप (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे वेस्ट इंडीजला ४५ षटकांमध्ये २४७ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
  • वेस्ट इंडीजने नेदरलँड्समध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • तेजा निदामनुरु (ने) आणि केसी कार्टी (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : वेस्ट इंडीज - १०, नेदरलँड्स - ०.


२रा सामना[संपादन]

नेदरलँड्स Flag of the Netherlands
२१४ (४८.३ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१७/५ (४५.३ षटके)
स्कॉट एडवर्ड्स ६८ (८९)
अकिल होसीन ४/३९ (१० षटके)
ब्रँडन किंग ९१* (९०)
बास डी लिड २/४६ (८ षटके)
वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी.
व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन
पंच: नितीन बाठी (ने) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: ब्रँडन किंग (वेस्ट इंडीज)


३रा सामना[संपादन]

वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
३०८/५ (५० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
२८८ (४९.५ षटके)
काईल मेयर्स १२० (१०६)
बास डि लीड १/३४ (५ षटके)
मॅक्स ओ'दाउद ८९ (१२१)
शर्मन लुईस ३/६७ (९.५ षटके)
वेस्ट इंडीज २० धावांनी विजयी.
व्ही.आर.ए. मैदान, ॲम्स्टलवीन
पंच: अड्रायन व्हान देर दीस (ने) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: काईल मेयर्स (वेस्ट इंडीज)