२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक
२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक | |||
---|---|---|---|
दिनांक | ३ – २० ऑक्टोबर २०२४ | ||
व्यवस्थापक | आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती | ||
क्रिकेट प्रकार | महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान | संयुक्त अरब अमिराती | ||
विजेते | न्यूझीलंड (१ वेळा) | ||
उपविजेते | दक्षिण आफ्रिका | ||
सहभाग | १० | ||
सामने | २३ | ||
मालिकावीर | आमेलिया केर | ||
सर्वात जास्त धावा | लॉरा वॉल्व्हार्ड (२२३) | ||
सर्वात जास्त बळी | आमेलिया केर (१५) | ||
अधिकृत संकेतस्थळ |
womens | ||
|
२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक ही आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती असेल.[१] सदर स्पर्धा ही ३ ते २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान बांगलादेशमध्ये आयोजित केली जाणार होती.[२] परंतु, बांगलादेशमधील राजकीय अशांततेमुळे स्पर्धा त्याच वेळापत्रकानुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्यात आली, तरीही यजमानपदाचे अधिकार बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडे ठेवण्यात आले.[३] दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यू झीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ३२ धावांनी पराभव करत पहिले विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत यजमानांसह १० संघ सहभागी झाले होते. ज्यामध्ये २०२३ आवृत्तीतील अव्वल सहा संघ, आयसीसी महिला आंतरराष्ट्रीय टी२० संघ क्रमवारीमधील पुढील सर्वोच्च स्थानी असलेला संघ आणि जागतिक पात्रता फेरीद्वारे निर्धारित इतर दोन संघांचा समावेश होता. स्कॉटलंड प्रथमच महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला.[४]
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत स्वीकारावा लागला.[५] न्यू झीलंडने उपांत्य फेरीत वेस्ट इंडीज आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पहिले विजेतेपद पटकावले.[६][७][८]
पार्श्वभूमी
[संपादन]आयसीसी महिला टी२० विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे आयोजित महिलांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांदरम्यान आयोजित एक व्यावसायिक आंतरराष्ट्रीय टी२० स्पर्धा आहे. आता दर दोन वर्षांनी होणारी ही स्पर्धा २००९ मध्ये पहिल्यांदा इंग्लंडमध्ये खेळवली गेली. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मागीलच्या स्पर्धेत १० संघ सहभागी झाले होते. गतविजेता ऑस्ट्रेलिया होता, ज्याने मागील आवृत्तीच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता.
यजमानांची निवड
[संपादन]ऑगस्ट २०२४ मध्ये, आयसीसीने घोषणा केली की २०२४ महिला टी२० विश्वचषक संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवला जाईल आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) अधिकृत यजमान राहील.[९]
स्वरूप
[संपादन]१० पात्र संघांना प्रत्येकी ५ संघांच्या २ गटांमध्ये विभागण्यात आले; एका गटातील सर्व ५ संघ इतर सर्व संघांसोबत सामने खेळतील. प्रत्येक गटामध्ये १० सामने खेळविले जातील आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीत प्रवेश करतील.
वेळापत्रक
[संपादन]२८ जुलै २०२४ रोजी, आयसीसीने घोषणा केली की ही स्पर्धा ३ ते २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत खेळवली जाईल. ती बांगलादेशमध्ये आयोजित केली जाणार होती. तथापि, ऑगस्ट २०२४ रोजी आयसीसीने जाहीर केल्यानुसार, बांगलादेशच्या सध्याच्या राजकीय स्थितीमुळे कारण काही सहभागी संघांच्या देशांतर्फे लागू करण्यात आलेल्या प्रवास सल्ल्यामुळे सदर स्पर्धा आता त्याच तारखांनुसार संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे.
१६ ऑगस्ट २०२४ रोजी, आयसीसीने जाहीर केले की सराव सामने २७ सप्टेंबर ते १ऑक्टोबर दरम्यान आयोजित केले जातील. परंतु, २६ ऑगस्ट २०२४ रोजी, सुधारित वेळापत्रकाच्या घोषणेनंतर, सराव सामने २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत खेळविले जातील.
पारितोषिक रक्कम
[संपादन]स्पर्धेसाठी US$७,९५८,०८० ची एकूण बक्षीस रक्कम उपलब्ध होती आणि संघाच्या कामगिरीनुसार खालीलप्रमाणे रकमेची विभागणी करण्यात आली [१०][११]
टप्पा | संघ | रक्कम (USD) | एकूण (USD) |
---|---|---|---|
विजेते | १ | $२,३४०,००० | $२,३४०,००० |
उपविजेते | १ | $१,१७०,००० | $१,१७०,००० |
उपांत्य सामन्यातील पराभूत संघ | २ | $६७५,००० | $१,३५०,००० |
गट फेरीतील प्रत्येक विजेता | २० | $३१,१५४ | $६२३,०८० |
५ ते ८ व्या स्थानावरील संघ | ४ | $६७,५०० | $२७०,००० |
९व्या आणि १०व्या स्थानावरील संघ | २ | $६७,५०० | $१३५,००० |
एकूण | $७,९५८,०८० |
पात्रता
[संपादन]एप्रिल २०२२ मध्ये, आयसीसीने स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रियेची पुष्टी केली.[१] यजमान म्हणून बांगलादेश या स्पर्धेसाठी आपोआप पात्र ठरला. पात्रता स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत आयर्लंडचा पराभव करून स्कॉटलंडने प्रथमच महिला टी२० विश्वचषकासाठी पात्रता मिळवली.[१२][१३] श्रीलंका दुसरा पात्र संघ ठरला. त्यांनी दुसऱ्या उपांत्य फेरीत संयुक्त अरब अमिरातीचा पराभव करून नवव्यांदा टी२० विश्वचषक गाठला.[१४]एकंदरीत, २०२३ मधील दहा पैकी नऊ संघ २०२४ टी२० विश्वचषक स्पर्धेत पोहोचले, फरक इतकाच की फक्त स्कॉटलंडने आयर्लंडची जागा घेतली.[१५]
पात्रता निकष | जागा | पात्र संघ |
---|---|---|
यजमान | १ | बांगलादेश |
२०२३ आयसीसी महिला टी२० विश्वचषक (यजमान वगळून मागील स्पर्धेतील ६ अव्वल संघ) |
६ | ऑस्ट्रेलिया इंग्लंड भारत दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड वेस्ट इंडीज |
आयसीसी महिला आंतरराष्ट्रीय टी२० संघ क्रमवारी (२७ फेब्रुवारी २०२३ रोजी पुढील अव्वल क्रमांकाचा संघ) |
१ | पाकिस्तान |
२०२४ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता | २ | स्कॉटलंड श्रीलंका |
एकूण | १० |
ठिकाणे
[संपादन]जुलै २०२२ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) ने जाहीर केले की ढाका आणि सिलहट या दोन ठिकाणी विश्वचषक सामने आयोजित केले जातील.[१६] जरी सिलहट हे मूळतः अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवणार होते, तरी ते यजमानपद ढाकाला मिळणार होते. नंतर, ऑगस्ट २०२४ मध्ये, आयसीसीने घोषणा केली की बांगलादेश ऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये महिला टी२० विश्वचषक खेळवला जाईल, परंतु तरीही या स्पर्धेचे आयोजन बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) करेल. हे सामने दुबई आणि शारजा येथे होणार आहेत.[१७]
संयुक्त अरब अमिराती
मधील ठिकाणे | ||
---|---|---|
दुबई | शारजा | |
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम | |
प्रेक्षक क्षमता: २५,००० | प्रेक्षक क्षमता: १६,००० | |
सामने: १२ (उपांत्य आणि अंतिम सामना) | सामने: ११ (उपांत्य सामना) |
बांगलादेश
मधील मूळ ठिकाणे | ||
---|---|---|
ढाका | सिलहट | |
शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | |
प्रेक्षक क्षमता: २५,४१६ | प्रेक्षक क्षमता: १८,५०० | |
सामने: १२ (उपांत्य आणि अंतिम सामना) | सामने: ११ (उपांत्य सामना) |
संघ
[संपादन]प्रत्येक संघाने स्पर्धेपूर्वी १५ खेळाडूंचा एक संघ निवडला आणि कोणत्याही जखमी खेळाडूच्या जागी नवीन नेमणूक करण्याची संघाला मुभा होती. पाकिस्तानने 25 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या संघाचे नाव जाहीर केले.[१८] तर दुसऱ्यादिवशी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला.[१९] २७ ऑगस्ट रोजी भारत आणि इंग्लंडने त्यांच्या संघांची घोषणा केली.[२०][२१] वेस्ट इंडीजने २९ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांचा संघ जाहीर केला.[२२] स्कॉटलंडने २ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली.[२३] त्यानंतर ३ सप्टेंबर २०२४ रोजी दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या संघाची घोषणा केली.[२४] न्यू झीलंडने १० सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली.[२५]
सामना अधिकारी
[संपादन]२४ सप्टेंबर २०२४ रोजी, आयसीसीने स्पर्धेसाठी सर्व-महिला मॅच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. दहा पंचांसोबत, जी.एस. लक्ष्मी, शांड्रे फ्रित्झ आणि मिशेल परेरा यांनाही सामनाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले.[२६][२७]
- सामना अधिकारी
- पंच
सराव सामने
[संपादन]टी२० विश्वचषकापूर्वी, सहभागी राष्ट्रे २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या दहा सराव सामन्यांमध्ये भाग घेतील. या सामन्यांना महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय दर्जा किंवा महिला टी२० दर्जा नसेल.[२८]
फेरी १
[संपादन]फेरी २
[संपादन]गट फेरी
[संपादन]आयसीसीने ५ मे २०२४ रोजी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले.[२९] स्पर्धेचे संयुक्त अरब अमिरातीमध्ये स्थलांतर केल्यानंतर, २६ ऑगस्ट २०२४ रोजी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले.[३०]
गट अ
[संपादन]स्थान | संघ | सा | वि | प | ब | अ | गुण | नि.धा. | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | ऑस्ट्रेलिया | 4 | 4 | 0 | 0 | 0 | 8 | २.२२३ | बाद फेरीसाठी पात्र |
2 | न्यूझीलंड | 4 | 3 | 1 | 0 | 0 | 6 | ०.८७९ | |
3 | भारत | 4 | 2 | 2 | 0 | 0 | 4 | ०.३२२ | |
4 | पाकिस्तान | 4 | 1 | 3 | 0 | 0 | 2 | −१.०४0 | |
5 | श्रीलंका | 4 | 0 | 4 | 0 | 0 | 0 | −२.१७३ |
पात्रता निकष: १) गुण; २) विजय; ३) निव्वळ धावगती; ४) सामान गुण असलेल्या संघांचा एकमेकांविरुद्ध निकाल
गट ब
[संपादन]स्थान | संघ | सा | वि | प | ब | अ | गुण | नि.धा. | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|
1 | वेस्ट इंडीज | 4 | 3 | 1 | 0 | 0 | 6 | १.५०४ | बाद फेरीसाठी पात्र |
2 | दक्षिण आफ्रिका | 4 | 3 | 1 | 0 | 0 | 6 | १.३८२ | |
3 | इंग्लंड | 4 | 3 | 1 | 0 | 0 | 6 | १.११७ | |
4 | बांगलादेश | 4 | 1 | 3 | 0 | 0 | 2 | −०.८४४ | |
5 | स्कॉटलंड | 4 | 0 | 4 | 0 | 0 | 0 | −३.१२९ |
पात्रता निकष: १) गुण; २) विजय; ३) निव्वळ धावगती; ४) सामान गुण असलेल्या संघांचा एकमेकांविरुद्ध निकाल
बाद फेरी
[संपादन]उपांत्य सामने | अंतिम सामना | |||||||
अ१ | ऑस्ट्रेलिया | १३४/५ (२० षटके) | ||||||
ब२ | दक्षिण आफ्रिका | १३५/२ (१७.२ षटके) | ||||||
उसा१वि | दक्षिण आफ्रिका | १२६/९ (२० षटके) | ||||||
उसा२वि | न्यूझीलंड | १५८/५ (२० षटके) | ||||||
ब१ | वेस्ट इंडीज | १२०/८ (२० षटके) | ||||||
अ२ | न्यूझीलंड | १२८/९ (२० षटके) |
उपांत्य सामने
[संपादन]पहिला उपांत्य सामना, १७ ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रलिया आणि दक्षिण आफ्रिके दरम्यान झाला. बेथ मूनीच्या ४४ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १३४ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १७.२ षटकांत आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. ॲनेके बॉशच्या नाबाद ७४ आणि लॉरा वोल्वार्डच्या ४२ धावांच्या जोरावर ८ गडी राखून विजय मिळवत न्यू झीलंडने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. [५]
१८ ऑक्टोबर रोजी शारजा क्रिकेट स्टेडियमवर दुसऱ्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडीजचा न्यू झीलंडविरुद्ध सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना, डिआंड्रा डॉटिनने २२ धावांत ४ गडी बाद केल्याने न्यू झीलंडला केवळ ९ बाद १२८ धावांची मजल मारता आली. परंतु त्यानंतर इडन कार्सनच्या २९ धावांत ३ गडी बाद करण्याने न्यू झीलंडला वेस्ट इंडीजला ८ बाद १२० धावांपर्यंत रोखण्यात यश मिळाले. सामन्यात ८ धावांनी विजय मिळवून न्यू झीलंडने २०१० नंतर प्रथमच अंतिम फेरी गाठली.[६]
उपांत्य सामना १
[संपादन] ऑस्ट्रेलिया
१३४/५ (२० षटके) |
वि
|
दक्षिण आफ्रिका
१३५/२ (१७.२ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला
- ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये तिची ३,००० वी धाव पूर्ण केली. तीने ३,००० धावा, १०० डावात केल्या हा एक विश्वविक्रम आहे.[३२]
उपांत्य सामना २
[संपादन] न्यूझीलंड
१२८/९ (२० षटके) |
वि
|
वेस्ट इंडीज
१२८/९ (२० षटके) |
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
अंतिम सामना
[संपादन]दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंडविरुद्ध सामना पार पडला. हा सामन्यातील विजय म्हणजे दोन्ही संघांसाठी त्यांचे पहिले आयसीसी पुरुष किंवा महिला टी२० विजेतेपद असणार होते.
आमेलिया केरला तिच्या ४३ (३८) आणि २४ धावांत ३ बळी अशा अष्टपैलू कामगिरीबद्दल अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानंतर, न्यू झीलंडच्या जॉर्जिया प्लिमरने पहिल्याच षटकात दोन चौकार मारले आणि पुढच्याच षटकात अयाबाँगा खाकाने तिला बाद केले. सुझी बेट्सने ३२ धावा केल्या मात्र तिला नॉनकुलुलेको म्लाबाने बाद केले. त्यानंतर सोफी डिव्हाइनला नेडीन डि क्लर्कने अवघ्या ६ धावांवर बाद केले. त्यानंतर हालीडे बाद होण्यापूर्वी आमेलिया केर आणि ब्रुक हालीडे यांच्या ५७ धावांच्या भागीदारीने संघाची धावसंख्या १२७ पर्यंत नेली. केर ४३ धावांवर बाद झाली. मॅडी ग्रीनने शेवटच्या षटकात मारलेल्या षटकारामुळे निर्धारित २० षटकांत न्यू झीलंडचा संघ ५ बाद १५८ धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. म्लाबाने ४ षटकात ३१ धावा देत २ गडी बाद केले तर खाका, डी क्लार्क आणि ट्रायॉन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.[३३][३४][३५][३६]
दक्षिण आफ्रिकेने डावाची सुरुवात जोरदार केली. लॉरा वॉल्व्हार्ड आणि तझमिन ब्रिट्स यांनी ४१ चेंडूत ५१ धावांची भागीदारी केली. ब्रिट्सला फ्रान जोनसने ७व्या षटकात बाद केले. १०व्या षटकात, आमेलिया केरने न्यू झीलंडला दोन झटके दिले. तिने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वोल्वार्डला ३३ धावांवर आणि शेवटच्या चेंडूवर ॲनेके बॉशला ९ धावांवर बाद केले. मेरिझॅन कॅपला इडन कार्सनने ८ धावांवर बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर रोझमेरी मायरने नेडीन डि क्लर्कला ६ धावांवर बाद करून दक्षिण आफ्रिकेची अवस्था ५ बाद ७७ अशी केली. त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेने नियमित अंतराने विकेट गमावल्या, सुने लूसने ८ धावांवर, ॲनेरी डेर्कसेनने १० धावांवर आणि ट्रायॉनने १४ धावांवर बाद झाली. न्यू झीलंडचा डाव २० षटकांत ९ बाद १२६ धावांवर संपला आणि न्यू झीलंडने सामना ३२ धावांनी जिंकला. न्यू झीलंडकडून अमेलिया केर आणि रोझमेरी मायर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.[३३][३७][३४][३५][३६]
२००९ आणि २०१० असे दोनवेळा अंतिम सामने गमावल्यानंतर अखेर तिसऱ्यावेळेस न्यू झीलंड भाग्यवान ठरले आणि त्यांनी त्यांचा पहिला आयसीसी महिला टी२० विश्वचषक जिंकला. पुरुष आणि महिला क्रिकेटमधील न्यू झीलंडचे हे पहिले टी२० विश्वचषक विजेतेपद देखील होते.[८][७][३८]
वि
|
दक्षिण आफ्रिका
१२६/९ (२० षटके) | |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- न्यू झीलंडचे हे पहिले आयसीसी महिला टी-२० विजेतेपद आहे.
संदर्भयादी
[संपादन]- ^ a b "मोठ्या आयसीसी स्पर्धेसाठी पात्रता मार्ग निश्चित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १० एप्रिल २०२२. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "२०२७ पर्यंतच्या आयसीसी महिला जागतिक स्पर्धांसाठी यजमानांची घोषणा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ जुलै २०२२. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "२०२४ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी नवे ठिकाण म्हणून संयुक्त अरब अमिरातीच्या निवड". www.icc-cricket.com. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंडवर सर्वसमावेशक विजय मिळवून स्कॉटलंडने पहिल्या महिला टी२० विश्वचषकाचे तिकीट मिळवले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). 2024-05-05. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b "शानदार दक्षिण आफ्रिका गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीमध्ये दाखल". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b "थरारक विजयासह न्यू झीलंड टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b "अमेलिया केरने न्यूझीलंडला प्रथम विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले". क्रिकबझ्झ. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b "दुबईमध्ये इतिहास रचला: न्यूझीलंडने पहिला महिला टी२० विश्वचषक जिंकला". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक संघर्षग्रस्त बांगलादेशातून युएईमध्ये हलवला". क्रिकबझ्झ. २९ ऑगस्ट २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसीतर्फे महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी बक्षीसाची विक्रमी रक्कम जाहीर". आयसीसी. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "महिला टी२० विश्वचषक विजेत्यांना बक्षीस रकमेत मोठी वाढ". आयसीसी. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयर्लंडवर विजय मिळवून स्कॉटलंडने पहिल्या महिला टी२० विश्वचषकाचे तिकीट मिळवले". www.icc-cricket.com. ५ मे २०२४.
- ^ "महिला टी२० विश्वचषक पात्रता: स्कॉटलंडची आयर्लंडवर मात, बांगलादेश विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळविले". बीबीसी स्पोर्ट. ५ मे २०२४.
- ^ "युएईवर मात करत श्रीलंकेचे महिला टी२० विश्वचषक जागेवर शिक्कामोर्तब". www.icc-cricket.com. ५ मे २०२४.
- ^ "स्कॉटलंडकडून दारुण पराभवानंतर आयर्लंड महिला टी२० विश्वचषक स्पर्धेला मुकला". द आयरिश टाइम्स.
- ^ "ढाका, सिलहट २०२४ महिला टी२० विश्वचषक सामने आयोजित करणार". न्यू एज बांगलादेश. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी नवीन ठिकाणे निश्चित". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेमध्ये फातिमा सना पाकिस्तानचे नेतृत्व करणार". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. १० जानेवारी २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ जॉली, लॉरा (२६ ऑगस्ट २०२४). "ब्राऊनचे पुनरागमन पण जोनासेनला विश्वचषक संघात जागा नाही". Cricket.com.au. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर". बीसीसीआय. २७ ऑगस्ट २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी इंग्लंड महिला संघाची निवड". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. २७ ऑगस्ट २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "टी-२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजच्या संघात डिआंड्रा डॉटिनचे पुनरागमन झाले आहे". ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ ऑगस्ट २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी स्कॉटलंड महिला संघाची निवड". क्रिकेट स्कॉटलंड. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "नवोदित तरुण खेळाडू सेश्नी नायडू, वोल्वार्डच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका टी२० विश्वचषक संघात". ईएसपीएन क्रिकइन्फो. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "डेव्हाईन आणि बेट्स सलग नवव्या टी२० विश्वचषकासाठी सज्ज". न्यूझीलंड क्रिकेट. 2024-09-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "All-female panel of match officials announced for Women's T20 World Cup 2024" [महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी सामना अधिकाऱ्यांचे सर्व-महिला पॅनेल जाहीर करण्यात आले]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३० सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Emirates Elite Panel of Match Officials for ICC Women's T20 World Cup 2024 announced" [आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी सामना अधिकाऱ्यांचे एमिरेट्स एलिट पॅनेल जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३० सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२४ सराव वेळापत्रक: संपूर्ण सामन्यांची यादी, सामन्यांच्या वेळा आणि ठिकाणे". विस्डेन. ६ मे २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी गट, सामने उघड झाले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ५ मे २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "महिला टी२० विश्वचषक २०२४ साठी अद्ययावत वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २६ ऑगस्ट २०२४. १९ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b "Women's T20 World Cup Points Table | Women's T20 World Cup Standings | Women's T20 World Cup Ranking" [महिला टी२० विश्वचषक गुण सारणी | महिला टी२० विश्वचषक क्रमवारी | महिला टी२० विश्वचषक क्रमवारी]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी - महिला टी२० विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड संपुष्टात". ईएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b "प्रेरित न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर मात करून महिला टी२० विश्वचषक २०२४ जिंकला". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b "South Africa vs New Zealand Women Live Score T20 World Cup: Celebration begins for Kiwis as team takes World Cup trophy home". Financial Express. 21 October 2024 रोजी पाहिले.
- ^ a b "महिला टी२० विश्वचषक अंतिम सामना: न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला नमवून पहिले विजेतेपद पटकावले अमेलिया केरने फलंदाजी आणि गोलंदाजीतही चमकली". स्काय स्पोर्टस. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ a b "न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून त्यांचा पहिला टी२० विश्वचषक जिंकला". बीबीसी. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "केर, हॅलिडे यांनी न्यूझीलंड क्रिकेटसाठी स्वप्नवत अशा दिवशी विश्वचषक गौरव केला". ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी२० विश्वचषक फायनल - व्हाईट फर्न्स शैलीत विश्वचषक जिंकला". न्यू झीलंड हेराल्ड (इंग्रजी भाषेत). २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.