Jump to content

२०२२ सिंगा अजिंक्यपद चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२२ सिंगा अजिंक्यपद चषक
सिंगापूर
पापुआ न्यू गिनी
तारीख २ – ६ जुलै २०२२
संघनायक अमजद महबूब आसाद वल्ला
२०-२० मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा अर्जुन मत्रेजा (११३) टोनी उरा (९३)
सर्वाधिक बळी विनोथ बस्करन (४) डेमियन रावू (४)

पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाने जुलै २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सिंगापूराचा दौरा केला. मालिकेला २०२२ सिंगा अजिंक्यपद चषक नाव दिले गेले. सर्व सामने इंडियन असोसिएशन मैदान येथे खेळविण्यात आले. सिंगापूरने हे सामने दोन्ही संघांच्या २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट ब स्पर्धेच्या तयारीसाठी आयोजीत केली होती. तसेच दोन्ही देशांमधील ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती.

सिंगापूरने पहिला सामना १८ धावांनी जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यामध्ये सुरेंद्र चंद्रमोहनच्या शतकाच्या जोरावर सिंगापूरने २०३ धावा केल्या. परंतु पापुआ न्यू गिनीने हे लक्ष्य सहज पार करून सामना जिंकला. तिसरा ट्वेंटी२० सामना पावसामुळे रद्द करावा लागल्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२ जुलै २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
१६८/५ (१८ षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१५०/९ (१८ षटके)
लेगा सियाका ४५ (३०)
अक्षय पुरी ३/२६ (४ षटके)
सिंगापूर १८ धावांनी विजयी.
इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर
पंच: आनंद नटराजन (सिं) आणि हरदीप जडेजा (सिं)
सामनावीर: अर्जुन मत्रेजा (सिंगापूर)‌
  • नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा करण्यात आला.
  • पापुआ न्यू गिनीने सिंगापूरमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • सिंगापूरने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये पापुआ न्यू गिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • अर्जुन मत्रेजा (सिं) आणि हिला व्हारे (पा.न्यू.गि.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


२रा सामना

[संपादन]
३ जुलै २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सिंगापूर Flag of सिंगापूर
२०३/७ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
२०६/७ (१९.४ षटके)
टोनी उरा ९३* (४०)
अमजद महबूब २/१२ (४ षटके)
पापुआ न्यू गिनी ३ गडी राखून विजयी.
इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर
पंच: हरदीप जडेजा (सिं) आणि सेंथील कुमार (सिं)
सामनावीर: टोनी उरा (पापुआ न्यू गिनी)
  • नाणेफेक : सिंगापूर, फलंदाजी.
  • नील कर्णिक (सिं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
५ जुलै २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
सामना रद्द
इंडियन असोसिएशन मैदान, सिंगापूर
पंच: सतीश बालसुब्रमण्यम (सिं) आणि आनंद नटराजन (सिं)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे सामना रद्द.