गद्दाफी स्टेडियम
Appearance
लाहोर शहरातील गद्दाफी किंवा गदाफी स्टेडियम हे पाकिस्तानातील सर्वात नामांकीत क्रिकेट मैदान आहे.हे सन १९५९ मध्ये बांधुन पूर्ण झाले.सन १९७४ पर्यंत याचे नाव लाहोर स्टेडियम होते परंतु कर्नल गद्दाफी यांना आदर देण्याचे दृष्टीने याचे नामांतर करण्यात आले. सन १९९६ मध्ये क्रिकेट विश्व चषक(वर्ल्ड कप) सामन्यांचे वेळी याची आसनक्षमता ६०,००० पर्यंत वाढविण्यात आली.याच्या नूतनीकरणाच्या वेळी लाल विटांच्या कमानी सभोवताल उभारण्यात आल्या आहेत.या मैदानात आधुनिक प्रकाश झोतांची व्यवस्था आहे. या मैदानावर क्रिकेटमधील अनेक विक्रम नोंदविल्या गेलेले आहेत.