भारतीय क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२२
भारतीय क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२२ | |||||
आयर्लंड | भारत | ||||
तारीख | २६ – २८ जून २०१८ | ||||
संघनायक | अँड्रु बल्बिर्नी | हार्दिक पंड्या | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हॅरी टेक्टर (१०३) | दीपक हूडा (१६८) | |||
सर्वाधिक बळी | क्रेग यंग (४) | भुवनेश्वर कुमार (२) | |||
मालिकावीर | दीपक हूडा (भारत) |
भारत क्रिकेट संघाने जून २०२२ मध्ये दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. मे २०२२ मध्ये क्रिकेट आयर्लंडने दौऱ्याची अधिकृत पुष्टी केली. सदर मालिका भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी झाली. हार्दिक पंड्याकडे भारताचे कर्णधारपद सोपविण्यात आले. सर्व सामने डब्लिनमधील मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान येथे खेळविण्यात आले.
पावसाचा व्यत्यत आलेल्या पहिल्या ट्वेंटी२० सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या ट्वेंटी२० सामन्यात दीपक हूडाच्या शतकाच्या जोरावर भारताने २२५ धावांपर्यंत मजल मारली. संजू सॅमसन आणि दीपक हूडा या जोडीची १७६ धावांची भागीदारी ही ट्वेंटी२० मधील दुसऱ्या गड्यासाठी रचलेली सर्वोत्तम भागीदारी होती तसेच भारतासाठी कोणत्याही गड्यासाठी केलेली सर्वोत्तम भागीदारी होती. प्रत्युत्तरादाखल आयर्लंडने २२१ धावांपर्यंत मजल मारली परंतु ४ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १२ षटकांचा करण्यात आला.
- कोनोर ऑल्फर्ट (आ) आणि उमरान मलिक (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.