वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२
Appearance
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२ | |||||
पाकिस्तान | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | ८ – १२ जून २०२२ | ||||
संघनायक | बाबर आझम | निकोलस पूरन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | इमाम उल हक (१९९) | शई होप (१५२) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद नवाझ (७) | अकिल होसीन (५) | |||
मालिकावीर | इमाम उल हक (पाकिस्तान) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जून २०२२ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. मूलत: सदर सामने डिसेंबर २०२१ मध्ये नियोजीत होते. परंतु वेस्ट इंडीजचे काही खेळाडू कोरोनाबाधित झाल्याने मालिका पुढे ढकलण्यात आली.
२८ मार्च २०२२ रोजी पीसीबीने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार सामने रावळपिंडीत होणार असल्याचे नमूद होते. सदर मालिका ही कुठलेही कोरोनानियमांशिवाय खेळवली जाईल असे पीसीबीने एप्रिल मध्ये स्पष्ट केले. मे २०२२ मध्ये सामने मुलतानला हलविण्यात आले व उन्हाळ्याचा त्रास कमी व्हावा म्हणून सामने सायंकाळी ४ पासून सुरू करण्याचे निश्चित झाले. पाकिस्तानने तीन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत वनडे मालिका ३-० ने जिंकली.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- मोहम्मद हॅरीस (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : पाकिस्तान - १०, वेस्ट इंडीज - ०.
२रा सामना
[संपादन]
३रा सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- धुळीच्या वादळामुळे वेस्ट इंडीजला ४८ षटकांमध्ये २७० धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
- शाहनवाझ दहानी (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : पाकिस्तान - १०, वेस्ट इंडीज - ०.