Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३
ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडीज
तारीख ५ ऑक्टोबर – १२ डिसेंबर २०२२
संघनायक अ‍ॅरन फिंच (आं.टी२०) निकोलस पूरन (आं.टी२०)
कसोटी मालिका
२०-२० मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा डेव्हिड वॉर्नर (८९) काईल मेयर्स (४५)
सर्वाधिक बळी मिचेल स्टार्क (६) अल्झारी जोसेफ (५)
मालिकावीर डेव्हिड वॉर्नर (ऑ)

वेस्ट इंडीजचा पुरुष क्रिकेट संघ ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत दोन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय टी२० खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करत आहे.[] टी२० सामने २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी दोन्ही संघांच्या तयारीचा भाग आहेत,[] तर कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग बनतील.[][] मे २०२२ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याच्या सामन्यांची पुष्टी केली.[]

पार्श्वभूमी

[संपादन]

आधी हा दौरा ऑक्टोबर २०२० मध्ये होणार होता.[] २८ मे २०२० रोजी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या मालिकेचे सामने निश्चित केले.[][] मूलतः सामने २०२० आयसीसी पुरुष टी २० विश्वचषकासाठी सराव सामने म्हणून खेळले गेले असते. तथापि, जुलै २०२० मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने कोविड-१९ साथीच्या आजारामुळे टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१ पर्यंत पुढे ढकलली.[] ऑगस्ट २०२० मध्ये, तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने देखील साथीच्या रोगामुळे पुढे ढकलण्यात आले,[]आणि २०२० इंडियन प्रीमियर लीगच्या सुधारित वेळापत्रकाशी सामना झाला.[१०]

पथके

[संपादन]
कसोटी आं.टी२०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया[११] वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज[१२]

ऑस्ट्रेलियाला जाणारे उड्डाण चुकल्यामुळे शिमरॉन हेटमायरला वगळण्यात आले आणि त्याच्या जागी शामार ब्रुक्सला नियुक्त केले गेले.[१३] दुखापतीमुळे मार्कस स्टोइनिसला वगळण्यात आले.[१४] ६ ऑक्टोबर रोजी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घोषित केले की मिचेल मार्श त्याच्या घोट्याच्या दुखापतीमुळे दुसऱ्या टी२० सामन्याला मुकणार आहे.[१५]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला टी२० सामना

[संपादन]
 
५ ऑक्टोबर २०२२
१८:१० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१४५/९ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१४६/७ (१९ षटके)
काईल मेयर्स ३९ (३६)
जॉश हेझलवूड ३/३५ (४ षटके)
अ‍ॅरन फिंच ५८ (५३)
अल्झारी जोसेफ २/१७ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट
पंच: डॉनोव्हन कॉख (ऑ) आणि सॅम नोजास्की (ऑ)
सामनावीर: अ‍ॅरन फिंच (ऑ)


२रा टी२० सामना

[संपादन]
७ ऑक्टोबर २०२२
१८:१० (रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७८/७ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१४७/८ (२० षटके)
ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी
द गब्बा, ब्रिस्बेन
पंच: फिलिप गिलेस्पी (ऑ) आणि सॅम नोजास्की (ऑ)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑ)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.


कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
३० नोव्हेंबर–४ डिसेंबर २०२२
धावफलक
वि


२री कसोटी

[संपादन]


संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "ऑस्ट्रेलियाचे भरगच्च वेळापत्रक जाहीर". फॉक्स स्पोर्ट्स. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "ऑल रोड्स लीड टू ऑस्ट्रेलिया! वेस्ट इंडीज टू डाऊन अंडर फॉर टी२० अँड टेस्ट सिरीज". क्रिकेट वेस्ट इंडीज. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "पुरुषांचा भविष्यातील दौऱ्यांचा कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2019-07-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "पुरुषांचा भविष्यातील दौऱ्यांचा कार्यक्रम २०१८-२०२३ जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "२०२२-२३ साठी ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय सामने जाहीर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ a b "क्रिकेट ऑस्ट्रेलिया तर्फे २०२०-२१ साठी आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यासह ऑस्ट्रेलिया मैदानात परतणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "पुरुषांचा टी२० विश्वचषक पुढे ढकलण्याबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज टी२० सामने पुढे ढकलले, आयपीएलचे सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामान्यांशी जुळणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. 4 August 2020 रोजी पाहिले.
  10. ^ "ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज शेड्यूल रिजिगचा भाग म्हणून लांबणीवर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "विंडीज आं.टी२० साठी ऑसी संघात मोठे खेळाडू परतले". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर". क्रिकेट वेस्ट इंडीज. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ "ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडीज संघात हेटमायरच्या जागी ब्रूक्स". क्रिकेट वेस्ट इंडीज. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ "दुखापतग्रस्त मार्कस स्टोइनिस वेस्ट इंडीज विरुद्ध टी२० मालिकेतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  15. ^ "विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून ऑस्ट्रेलियन संघात बदल". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]