शिव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महादेव या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
शिव
Shiva and Parvati.jpg
शिव व पार्वती यांचे मध्ययुगीन लघुचित्र
मराठी शिव 6313
निवासस्थान कैलास, स्मशान
लोक शैव
वाहन नंदी
शस्त्र त्रिशूळ
वडील अज्ञात
आई अज्ञात
पत्नी सती, पार्वती, गौरी, उमावती
अपत्ये कार्तिकेय, गणपती,अशोक्सुन्दरी.
अन्य नावे/ नामांतरे महादेव, उमापती, भोलेनाथ, ईश्वर, उमेश, गंगाधर, त्रिनेत्र, त्र्यंबक, नीलकंठ, महेश, रुद्र, शंकर, शंभू, शूलपाणि, सदाशिव, सांब, गौरीहर, दीनानाथ,khandoba,
या देवतेचे अवतार खंडोबा, ज्योतिबा
या अवताराची मुख्य देवता महादेव, कालभैरव, हनुमान, अर्धनारीश्वर, दत्तात्रेय
मंत्र ॐ नमः शिवाय !
नामोल्लेख लिंग पुराण
तीर्थक्षेत्रे १२ ज्योतिर्लिंग ( भारतातील ),
बंगलोर संग्रहालय येथील शिव पार्वती मूर्ती

शिव ही हिन्दु धर्मातील एक देवता आहे.[१][२]




देवता विकास[संपादन]

भारतीय संस्कृतीचे मूळ असलेल्या वैदिक साहित्यात रुद्र या नावाची देवता आढळते.[३] यजुर्वेदातील रुद्रसूक्त प्रसिद्ध आहे.[४] रुद्र ही देवता पुराणकाळात शंकर किंवा शिव या नावाने उदयाला आलेली दिसते.[५] शिव या देवतेच्या विकासासाठी शैव सम्प्रदायाचे महत्त्वाचे योगदान आहे. या सम्प्रदायाचे साहित्य म्हणजे शैव पुराणे होत. शिव पुराण, लिंग पुराण ही शंकर या देवतेशी सम्बन्धित पुराणे होत.[६]

देवतेचे स्वरूप[संपादन]

शिव ही पुरुष देवता असून ब्रह्मा, विष्णु या देवतांच्या जोडीने त्याचे उल्लेख सापडतात. प्रलयाच्या शिव हा या सृष्टीचा संहार करणारा आहे असे मानले जाते.या देवतेचे वास्तव्य कैलास पर्वतावर असून पार्वती ही त्याची पत्नी आहे. गणपती आणि कार्तिकेय हे त्याचे पुत्र मानले जातात.[७]

  • वैदिक काळ--

वैदिक काळात शिव हा रुद्र या स्वरूपात पूजिला जात असे. रुद्र ही ऋग्वेदात मध्यम स्वरूपाची देवता मानली जाते. धनुष्य बाण हे त्याचे आयुध असून तो जटाधारी आहे. तो एक महान वैद्य असून त्याच्याजवळ वेगवेगळी औषधे असतात असे मानले जाते.[७]

अथर्ववेदात व्रात्यकाण्ड आहे. यामध्ये रुद्र हा व्रात्यांशी सम्बन्धित देव आहे असे नोन्दविलेले आहे.याला महादेव असे सम्बोधिले आहे. हा देव नन्तर पशूंच्याकडे गेला. त्याला अनन्तर त्यामुळे पशुपती असेही नवा पडले आहे. ब्राह्मणग्रन्थांच्या काळात रुद्र ही वैदिक धर्मातील एक महत्त्वाची देवता बनली होती. त्यान्तर उपनिषद साहित्याने देखील महेश्वर, शिव या नावाने या देवतेला सन्मान दिलेला दिसतो.[७]

रामायण हा जरी वैष्णव सम्प्रदायाचा ग्रन्थ असला तरी त्यामध्ये शिवाच्या पूजनाचे सन्दर्भ दिसतात.रामायणातील शिवाची उपासना ही केवळ मानव करतात असे नसून देव आणि दानव सुद्धा शिवाची पूजा करतात. रावणाने केलेली शंकराची तपश्चर्या हा यातील विशेष उल्लेख मानला जातो.[७]

महाभारतात शिवाचे एक दार्शनिक रूप दिसते आणि दुसरे रूप हे लोकांमध्ये प्रचलित असे आहे. शिवाचा योगदर्शनाशी असलेला सम्बन्ध हा ही महाभारतात दिसून येतो. त्याला महायोगी असे सम्बोधिले आहे.[७]

शारीरिक आणि भौतिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • राखाडी रंग

शिवाचा रंग कर्पूरासारखा (कापरासारखा) पाण्ढरा आहे; म्हणून त्याला `कर्पूरगौर' असेही म्हणतात. हे राखाडी रंगाचे आवरण म्हणजे चिताभस्म असते.[८] शिवाला रोज नवीन चिताभस्म लागते.

  • गंगा

जी (स्नानकर्त्या जिवाला) भगवत्पदाप्रत पोहोचवते ती गंगा’. ही गंगा स्वर्गात होती. भगीरथाच्या कठोर तपश्‍चर्येमुळे ती पृथ्वीवर आली. त्या वेळी गंगेच्या प्रवाहाचा भयानक वेग अन्य कोणीही थोपवू शकत नव्हता म्हणून शंकराने गंगेला आपल्या जटेत धारण केले, म्हणून शिवाला गंगाधर असे म्हणतात.[९]

शिवाने भाली, म्हणजे कपाळी चन्द्र धारण केला आहे.[१०] चन्द्रमा ही क्षमाशीलता, ममता आणि वात्सल्य या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे.

शिवाने हलाहल हे समुद्रमन्थनामधून निघालेले विष प्राशन केले; या विषाचा दाह कमी व्हावा यासाठी वासुकी नाग शिवाने धारण केला. नागाला शिवाचे आयुधही समजले जाते, यामुळे शिवाला नागेन्द्र असे सम्बोधले जाते.[११]

  • तिसरा डोळा

शिवाचा कपाळावर भुवयांच्या मध्ये जरा वर ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा आहे.[१२] हा डोळा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे तो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो. असे मानले जाते कि जर महादेवाचा तिसरा डोळा उघडला तर समोरचे सर्व काही राख होत असे.

  • व्याघ्राम्बर

वाघ हा रज-तमांचे प्रतीक आहे. अशा वाघाला (रज-तमांना) मारून शिवाने त्याचे आसन केले आहे.

  • गजचर्म

शिवाने गजचर्मसुद्धा परिधान केले आहे.[१३]

शिवाचे भारतातील महत्त्वाचे बारा ज्योतिर्लिंगाचे स्थान[संपादन]

देवांचे देव महादेव यांनी भक्तांना वेळोवेळी आपले दर्शन दिले आणि जेथे - तेथे आपल्या भक्तांच्या आग्रहास्तव नैसर्गिक लिंग स्वरूपात बारा ठिकाणी ठाण माण्डले, त्यालाच " ज्योतिर्लिंग " म्हणून ओळखले जाते.[१४] सम्पूर्ण भारतात अवघ्या महाराष्ट्रातच शिवाचे पाच ज्योतिर्लिंग स्थापित आहे. ह्या प्रत्येक ज्योतिर्लिंगासोबत शिवाची एक एक आख्यायिका आहे.[१५]

१. श्री सोमनाथ, सोरटी ( गुजरात )

२. श्री मल्लिकार्जुन, श्री शैलम ( आन्ध्रप्रदेश )

३. श्री महाकालेश्वर, उज्जैन ( मध्यप्रदेश )

४. श्री ओंकारेश्वर, शिवपुरी ( मध्यप्रदेश )

५. श्री वैद्यनाथ, परळी ( महाराष्ट्र )

६. श्री औण्ढ नागनाथ, हिंगोली / परभणी ( महाराष्ट्र )

७. श्री केदारेश्वर, केदारनाथ ( उत्तरांचल प्रदेश )

८. श्री त्र्यम्बकेश्वर, नाशिक ( महाराष्ट्र )

९. श्री रामेश्वर, रामेश्वरम / सेतूबन्धनं ( तामिळनाडू )

१०. श्री भीमाशंकर, डाकिनी / पुणे ( महाराष्ट्र )

११. श्री विश्वेश्वर, वाराणसी ( उत्तरप्रदेश )

१२. श्री घृष्णेश्वर, वेरूळ / औरंगाबाद ( महाराष्ट्र )

सर्वत्र पसरलेले इतर शिवलिंगे[संपादन]

दशरथेश्वर महादेव मन्दिर ,मुखेड (महाराष्ट्र )

अजय अमहेश्वर, महेन्द्रपर्वत अमरनाथ-काश्मीर एकलिंग-उदयपूर कण्डारिया महादेव-खजुराहो
कपालेश्वर-क्रौंचपर्वत कुम्भेश्वर-कुम्भकोणम कुमारेश्वर-क्रौंचपर्वत गौरीशंकर-जबलपूर
तारकेश्वर-पश्चिम बंगाल पशुपतिनाथ-नेपाळ पक्षीतीर्थ-चेंगलपेट प्रतिज्ञेश्वर-क्रौंचपर्वत
बृहदीश्वर-तंजावर भुवनेश्वर-ओरिसा मध्यमेश्वर-काशी गोकर्ण महाबळेश्वर-कर्नाटक वाळकेश्वर-मुम्बई
मुक्तपरमेश्वर-अरुणाचल वैद्यनाथ-कांगडा व्यासेश्वर-काशी सर्वेश्वर-चितोडगड
सुन्दरेश्वर-मदुरा स्तम्भेश्वर-चितोड हरीश्वर-मानस सरोवर हाटकेश्वर-बडनगरू

संदर्भ[संपादन]

  1. ^ Tripathi, Pt Kk. Hindu Devi-Devta (hi मजकूर). Prabhat Prakashan. आय.एस.बी.एन. 978-93-5048-298-8. 
  2. ^ Shashikant (2018-02-02). Sadhana Path February 2018: साधना पथ फरवरी 2018 (hi मजकूर). Diamond Pocket Books Pvt Ltd. 
  3. ^ Oldenberg, Hermann (1988). The Religion of the Veda (en मजकूर). Motilal Banarsidass Publ. आय.एस.बी.एन. 978-81-208-0392-3. 
  4. ^ S, Chandra Mouli M. (2018-10-25). Vedic Evolution: Its Philosophy and Science (en मजकूर). Notion Press. आय.एस.बी.एन. 978-1-64429-525-0. 
  5. ^ Chakravarti, Mahadev (1986). The Concept of Rudra-Śiva Through the Ages (en मजकूर). Motilal Banarsidass Publ. आय.एस.बी.एन. 978-81-208-0053-3. 
  6. ^ Chaturvedi, B. K. (199?). The Hymns And Orisions Of Lord Shankar (en मजकूर). Diamond Pocket Books (P) Ltd. आय.एस.बी.एन. 978-81-7182-169-3. 
  7. a b c d e जोशी, महादेवशास्त्री (२००० (पुनर्मुद्रण)). भारतीय संस्कृती कोश खंड नववा. पुणे: भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन. pp. ३०५–३२१. 
  8. ^ Shah, Vaishali (2019-07-11). Hindu Culture and Lifestyle: Living Indian Traditions in the age of Artificial Intelligence (en मजकूर). Notion Press. आय.एस.बी.एन. 978-1-64587-608-3. 
  9. ^ Prabhudesai, Pralhad Krishna. Ādiśaktīce viśvasvarūpa (mr मजकूर). 
  10. ^ Gupta, M. (2004-12). Hindu gods and goddesses (en मजकूर). Star Publications. आय.एस.बी.एन. 978-81-7650-091-3. 
  11. ^ Haq, Kaiser (2015-10-12). The Triumph of the Snake Goddess (en मजकूर). Harvard University Press. आय.एस.बी.एन. 978-0-674-91511-4. 
  12. ^ Storl, Wolf-Dieter (2004-09-14). Shiva: The Wild God of Power and Ecstasy (en मजकूर). Simon and Schuster. आय.एस.बी.एन. 978-1-59477-780-6. 
  13. ^ Geer, Alexandra van der (2008-10-16). Animals in Stone: Indian Mammals Sculptured Through Time (en मजकूर). BRILL. आय.एस.बी.एन. 978-90-474-4356-8. 
  14. ^ MURTY, SUDHA (2018-04-01). GARUDJANMACHI KATHA (mr मजकूर). Mehta Publishing House. आय.एस.बी.एन. 978-93-87789-72-2. 
  15. ^ Thiyan, Tamil (2018-04-28). 40 Amazing and Interesting Facts about Lord Shiva (en मजकूर). Independently Published. आय.एस.बी.एन. 978-1-9809-5475-0.