सातमाळा-अजिंठा डोंगररांगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सातमाळा-अजिंठा डोंगररांगा ही सह्याद्री पर्वतरांगेच्या तीन प्रमुख डोंगररांगांपैकी एक आहे. ही डोंगररांग तुटक तुटक असून तिची साधारण दिशा पश्चिम-पूर्व आहे. ही डोगररांग गोदावरीतापी नदीच्या खोऱ्यांना वेगळी करते. हिची सुरुवात नाशिक जिल्ह्याच्या वायव्येकडील सुरगाणा तालुक्यात होते. या डोंगररांगेच्या पश्चिम भागाला सातमाळा डोंगर तर नाशिक जिल्ह्यातीलच मनमाडपासून पुढे अंकाई-टंकाईपासून या रांगांनाच अजिंठा डोंगर म्हणून ओळखतात. या डोंगररांगांचा उतार उत्तरेकडे तीव्र असून दक्षिणेकडे गोदावरी नदीच्या खोऱ्याकडे मंद उतार आहे. देवगिरीचा किल्लाअजिंठा-वेरूळची लेणी याच डोंगरात आहेत.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.