Jump to content

"मंगळगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६: ओळ ६:
|चित्रशीर्षक=
|चित्रशीर्षक=
|चित्ररुंदी=200px
|चित्ररुंदी=200px
|उंची= मी.
|उंची= ६६४ मी.
|प्रकार=गिरिदुर्ग
|प्रकार=गिरिदुर्ग
|श्रेणी=मध्यम
|श्रेणी=मध्यम
ओळ ३४: ओळ ३४:


==गडावरील राहायची सोय==
==गडावरील राहायची सोय==
या मंदिरात दरवर्षी मोठी यात्रा भरते. त्यामुळे त्यासाठी लागणारी भांडीकुंडी गावकर्‍यांनी येथे ठेवलेली आहे. या गडावर मुक्काम करायचा झाल्यास येथेच आपल्याला मुक्काम करता येऊ शकतो. या मंदिराच्या मागे एक छोटी माची गेलेली आहे.
==गडावरील खाण्याची सोय==
==गडावरील खाण्याची सोय==
==गडावरील पाण्याची सोय==
==गडावरील पाण्याची सोय==
गडावर पाण्याच्या दोन टाक्या आहेत, एक कोरडी, पण दुसरीत पिण्याचे पाणी असते.
==गडावर जाण्याच्या वाटा==
==गडावर जाण्याच्या वाटा==



१८:५९, २३ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती


मंगळगड
नाव मंगळगड
उंची ६६४ मी.
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी मध्यम
ठिकाण जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे गाव
डोंगररांग
सध्याची अवस्था
स्थापना {{{स्थापना}}}


मंगळगड ऊर्फ कांगोरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान

कसे जाल ?

मंगळगडाला जाण्यासाठी दोनतीन मार्ग आहेत. चंद्रगड पाहून तेथून महादेव मुर्‍ह्यामार्गे अंदाजे सहातासांच्या पाय प्रवासानंतर मंगळगडाला पोहोचता येते. या पायी मार्गावर दोनदा डोंगर चढून उतरावा लागतो.

भोर-महाड मार्गावर वरंधा घाट आहे. वरंधा घाटाच्या कोकणातील पठारावर माझेरी गाव आहे. या माझेरीतूनही डोंगरदर्‍या, ओढे नाले ओलांडीत सहासात तासांच्या जंगलातील पायपिटी नंतर मंगळगड गाठता येतो. महाडकडून भोरकडे जाताना भिरवाडीच्या पायथ्याच्या पिंपळवाडीकडे जाणारा फाटा आहे. या गाडीरस्त्यानेही पिंपळवाडीला तासाभरात पोहोचता येते. शकतो. महाडहूनही ठरावीक वेळेत पिंपळवाडीसाठी एस.टी. बसेस आहेत.

पिंपळवाडीतून गडावर जाणारी वाट म्हणजे उभा चढ आहे. चांगल्या चालीने दीड तासात आपण गडावर पोहोचतो. एका उद्‌ध्वस्त झालेल्या दरवाजाच्या अवशेषामधून गडात प्रवेश होतो. गडाचा विस्तार बर्‍यापैकी मोठा आहे. गडाच्या बालेकिल्ल्यावर एका वाड्याचे अवशेष आहेत. उत्तर अंगाला पाण्याची कातळ-कोरीव टाकी आहेत. गडाला एक माची आहे. माची तटबंदीने बांधून काढलेली आहे. कातळमाथ्याच्या खाली दोन लहान सुळके आहेत. त्यांना स्थानिक लोक नवरानवरीचे सुळके म्हणतात.

इतिहास

शिवाजी महाराजांना जावळी स्वराज्यात हवी होती. पण चंद्रराव मोरे दाद लागू देत नव्हते. त्यांस मारल्याशिवाय राज्य साधत नाही, हे पाहून महाराजांनी मोका हेरला आणि जावळीवर हल्ला केला. मोर्‍यांचा खातमा करून जावळी स्वराज्यात दाखल केली; रायगडापासून कोयनेपर्यंतचा मुलूख स्वराज्यात दाखल केला. रायगड, कांगोरी, चंद्रगड, वाझोटा असे किल्ले स्वराज्यात आले. कांगोरीगडाचे नाव महाराजांनी मंगळगड असे ठेवले.

छायाचित्रे

कांगोरी गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

मंगळगडाच्या माचीवर कांगोरी देवीचे मंदिर आहे. या उंचीवर येऊन देवीचे दर्शन घेणे अतिशय कष्टप्रद असल्याने भक्तांनी खाली दुधाणेवाडीत या मूर्तीचे एक प्रतिरूप स्थापन करून आपली सोय करून घेतली आहे. वर्षातून एकदा गडावर देवीचा उत्सवही साजरा होतो..

गडाच्या फेरीमधे तटबंदी, उद्‌ध्‍वस्त दरवाजा, माची, शंकराची पिंडी, दीपमाळ, घरांची जोती इत्यादी पहायला मिळतात. या कांगोरी गडावरून मकरंदगड, प्रतापगड, रायगड, लिंगाणा, असे किल्ले दिसतात. तसेच रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची पठारेही दिसू शकतात.

गडावरील राहायची सोय

या मंदिरात दरवर्षी मोठी यात्रा भरते. त्यामुळे त्यासाठी लागणारी भांडीकुंडी गावकर्‍यांनी येथे ठेवलेली आहे. या गडावर मुक्काम करायचा झाल्यास येथेच आपल्याला मुक्काम करता येऊ शकतो. या मंदिराच्या मागे एक छोटी माची गेलेली आहे.

गडावरील खाण्याची सोय

गडावरील पाण्याची सोय

गडावर पाण्याच्या दोन टाक्या आहेत, एक कोरडी, पण दुसरीत पिण्याचे पाणी असते.

गडावर जाण्याच्या वाटा

१. चंदगड-महादेव मुर्‍ह्यामार्गे

२. वरंधा घाटाच्या कोकणातील पठारावरल्या माझेरी गावातून

३. महाड-भोर रस्त्यावर भिरवाडीच्या पायथ्याच्या असलेल्या पिंपळवाडी फाट्याने जाऊन, मग पिंपळवाडी गावामार्गे

मार्ग

जाण्यासाठी लागणारा वेळ

दीड तास ते सात तास.

संदर्भ

सांगाती सह्याद्रीचा

डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

हेसुद्धा पाहा