चंद्रराव मोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चंद्रराव मोरे (जीवनकाळ: इ.स.चे १७वे शतक)राज्य जावळीच्या खोऱ्यात (वर्तमान सातारा जिल्हा, महाराष्ट्र) होती.चंद्रराव मोरे शुर मराठी सरदार होते.मोरे आडनाव नंतर अनेक आडनावात विभाजित ही झाले उदा. दुदुस्कर, धूळूप व इतर अनेक आडनावात मोरे पूर्ण हिंदुस्तान वसले.

     गैरसमज नको शौर्य जाणा! मोरे घराण्याचा प्रयत्न :  व सातारा जिल्ह्यातील पूर्वीच्या स्वराज्य काळातील मोरे घराण्याचा संबंध अगदी छत्रपती शिवाजी काळापासून आहे. मात्र, याच मोरे घराण्याचे समज-गैरसमज पसरल्याची खंत सध्याच्या पिढीला लागून राहिली आहे. नेमका हाच गैरसमज दूर करण्याचा एक प्रयत्न आता मोरे घराण्याने सुरु केला  यात त्यांनी दिलेल्या संदर्भात असे नमूद केले आहे की, राजकीय वैमनस्यातून रघुनाथपंत सबनीस व संभाजी कावजी बांदा या शिवरायांच्या शिलेदारांच्या हस्ते १६५६ मध्ये दौलतराव मोरे यांचे दत्तक पुत्र कृष्णराव मोरे (शेवटचे चंद्रराव) तसेच हनमंतराव व सूर्याजीराव यांचा घातपाताने अंत झाला. त्यानंतर राजगादीचे वारस कृष्णाजीराव व बाजीराव यांचा क्रूरपणे शिरच्छेद केला गेला, असे बखरीत नोंद आहे. जावळी (सातारा जिल्ह्यातील प्रांत) राजसत्ता संपुष्टात आल्यानंतर मोरे कुळवंशाने छत्रपतींच्या निर्वाणानंतरच्या काळातही स्वराज्याच्या रक्षणार्थ रक्त सांडले. मात्र, आपले १६० वर्षांचे राज्य वाचविण्यासाठी चंद्रराव मोरे घराण्याने छत्रपती शिवरायांना विरोध केला. हीच घटना सातत्याने काही इतिहास लेखकांनी पुढे आणली. परंतु, वास्तव कधीच समोर आणले नाही. मुळातच दूरवर गेलेली मोरे मंडळी कधी एकत्र आली नाहीत, अशी दोनशे पन्नास वर्षे निघून गेली. अवघ्या भारतभरात आपल्या क्षत्रिय लढाऊ बाण्याने ज्यांनी आपले स्थान निर्माण केले, त्यांनी कालांतराने शिवाजी महाराजांसोबत व निवार्णानंतरही स्वराज्य रक्षणार्थ शौर्य गाजविले आहे. हा घटनाक्रम आजपर्यंत कोठेच आला नसल्याची मोरे यांची खंत आहे. १९६० साली मोरे एकत्र आणण्याचा प्रयत्न जुन्याजाणत्या मोरेनी केला. पण, एकत्र येण्यास भौगोलिक स्थिती कारणीभूत ठरुन अडचणी आल्या. ज्या ३६०० एकर प्रांतात मोरे पूर्वजांनी शौर्य गाजवले. स्वराज्य स्थापनेच्यावेळी दूरवर गेलेले मोरे आणि कोयना प्रकल्पाने कांदाटी खोर्‍यातून दूरवर पाठवलेले मोरे अशी दोन वेळा या परिसरातून परांगदा होण्याची वेळ त्यांच्यावर आली. पण जसे नदीचा मूळ प्रवाह शोधला जातो तसाच कुळाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करत एक एक मोरे पुन्हा जावळी प्रांतात उचाट येथे येत आहेत. जुन्या जाणत्या मोरेंनी जंगलात फिरुन आपल्या चारशे वर्षांपूर्वीच्या शौर्याच्या पाऊलखुणा शोधल्या. चंद्रराव मोरेंचा वाडा जिथे होता, तिथे स्मृतिस्तंभ उभारुन 'ऐतिहासिक संदर्भा'सह माहिती दिली आहे.
           __अमर दुदुस्कर(मोरे)

जीवन[संपादन]

इ.स. १६५४ नंतर आदिलशहाने अफजलखानला जावळीवर चालून जाण्याचा हुकूम दिला. त्यामूळे चंद्रराव व शिवाजीराजे भोसले यांच्यानध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्याचा परिणाम म्हणून शिवाजीराजे भोसले जावळीवर चालून गेले त्यानंतर चंद्रराव तिथून पळून रायगडावर आले ते शिवाजी राजांना शरण गेला[ संदर्भ हवा ] काळांतराने त्याचा शिरच्छेद करण्यात आला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.