थर्गूड मार्शल
Jump to navigation
Jump to search
थर्गूड मार्शल (२ जुलै, इ.स. १९०८:बाल्टिमोर, मेरीलंड, अमेरिका - २४ जानेवारी, इ.स. १९९३:बेथेस्डा, मेरीलंड) हा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होता. मार्शल या न्यायालयातील पहिला कृष्णवर्णीय तर एकूण ९६वा न्यायाधीश होता.
याआधी मार्शल सर्वोच्च न्यायालयातच वकील होता. त्याने जिंकलेल्या अनेक खटल्यांमध्ये ब्राउन वि बोर्ड ऑफ एज्युकेशन हा खटला विशेष प्रसिद्ध आहे. याद्वारे अमेरिकेतील शाळांमधील वर्णविभागणी संपुष्टात आली.
मार्शलचे पणजोबा कॉंगोमध्ये जन्मलेले होते व तेथून त्यांना पकडून आणून अमेरिकेत गुलाम म्हणून विकले गेले होते.
बाल्टिमोरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळास मार्शलचे नाव दिलेले आहे.