रदरफोर्ड बी. हेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रदरफोर्ड बर्चर्ड हेस
रदरफोर्ड बी. हेस


सही रदरफोर्ड बी. हेसयांची सही

रदरफोर्ड बर्चर्ड हेस (इंग्लिश: Rutherford Birchard Hayes) (४ ऑक्टोबर, इ.स. १८२२ - १७ जानेवारी, इ.स. १८९३) हा अमेरिकेचा १९वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १८७७ ते ४ मार्च, इ.स. १८८१ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळली. याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकेच्या पुनर्बांधणीची प्रक्रिया पुरी होऊन अमेरिका दुसर्‍या औद्योगिक क्रांतीत प्रवेशली. त्याच्या प्रयत्नांमुळे त्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेच्या मुलकी सेवांमध्ये काही मूलभूत सुधारणा घडून आल्या. अध्यक्षपदावर निवडून येण्याअगोदर हेस ओहायोत लोअर सँडस्की (आताचे फ्रीमाँट) येथे वकिली करत असे. इ.स. १८५८ त्व इ.स. १९६१ या काळात तो सिनसिनाटीचा नगर-सॉलिसिटर होता. अमेरिकन यादवी युद्धास आरंभ होताच राजकीय व वकिली कारकीर्द सोडून हेस उत्तरेकडील संस्थानांच्या युनियन सैन्यात भरती झाला. यादवी युद्धात पाच वेळा जखमी झाला असला, तरी त्याने मोठा पराक्रम गाजवत मेजर जनरल पदापर्यंत बढती मिळवली. यादवी युद्धानंतर इ.स. १८६५ ते इ.स. १८६७ या काळात तो रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकन प्रतिनिधिगृहात निवडून गेला. इ.स. १८६७ साली प्रतिनिधिगॄहातील सदस्यत्व सोडून तो ओहायोच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीस उभा राहिला व इ.स. १८६७ साली पहिल्यांदा, तर इ.स. १८७१ साली दुसर्‍यांदा, अश्या दोन कार्यकाळांसाठी गव्हर्नरपदी बसला. गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ संपल्यावर त्याने पुन्हा काही काळ वकिली केली. परंतु इ.स. १८७५ साली राजकारणात पुन्हा प्रवेश करत तिसर्‍यांदा ओहायोचा गव्हर्नर बनला.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.