असिन तोट्टुंकल
असिन तोट्टुंकळ (मल्याळम: അസിന് തോട്ടുങ്കല്.) | |
---|---|
असिन तोट्टुंकळ | |
जन्म |
असिन तोट्टुंकळ ऑक्टोबर २६ १९८५ [वय् २४ वर्षे] कोच्ची , केरळ |
इतर नावे | मलबार अळगी,चेन्नै,तमिळ अम्मायी . |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट,जाहिरात. |
कारकीर्दीचा काळ | सन २००१-पासुन |
भाषा | मल्याळम |
प्रमुख चित्रपट | गजनी (चित्रपट) |
पुरस्कार | फिल्मफेअर,स्टारडस्ट,स्क्रीन,IIFA,ITFA इत्यादी. |
वडील | जोसेफ तोट्टुंकळ |
आई | सेलीन तोट्टुंकळ |
असिन तोट्टुंकळ(मल्याळम: അസിന് തോട്ടുങ്കല് ; रोमन लिपी:Asin Thottumkal )(ऑक्टोबर २६ १९८५,कोच्ची,केरळ-हयात) ही एक भारतीय मल्याळम अभिनेत्री आहे. ही प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटांतून झळकणारी,अनेक पुरस्कारांची मानकरी असणारी ती एक प्रसिद्ध अभिनेत्री असून असिन ह्या एकेरी नावाने ओळखली जाते. मल्याळम भाषेतील स्थानिक जाहिरातींतून पदार्पण करणारी असिन अल्पावधीतच लोकप्रिय झाली व वयाच्या १६ व्या वर्षी नरेंद्रन मकन जयकांतन वक ह्या मल्याळम भाषेतील चित्रपटाद्वारे आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ केला. त्यानंतर तेलुगूतील सुरुवातीचे काही चित्रपट वगळता तिने सातत्याने यशस्वी चित्रपट दिले आहेत ,तसेच तमिळ भाषेतील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून असिन ओळखली जाते. असिन ही केरळ राज्याच्या युथ आयकॉनची मानकरी आहे.सध्या असिन हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांतील चित्रपटांत काम करत आहे.
तेलुगू तील अम्मा नन्ना ओ तमिळा अम्मायी,घर्षणा,सिवमणी ,तमिळ भाषेतील गजनी,वर्लारु,मजा, पोक्किरी ,दसावतारम व हिंदी भाषातील गजनी हे तिचे काही यशस्वी चित्रपट.गजनी (चित्रपट) हा तिचा आत्तापर्यंतचा गाजलेला आणि सर्वात यशस्वी चित्रपट.हा तमिळ, त्यानंतर तेलुगूत व नव्या चित्रीकरणासह हिंदीत देखील गाजला.
पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण
[संपादन]मूळची केरळची असणारी असिन, केरळी असून तिची मातृभाषा मल्याळम आहे,त्या व्यतिरिक्त तिचे तमिळ, संस्कृत, तेलुगू, इंग्रजी, हिंदी तसेच फ्रेंच भाषांवर प्रभुत्व आहे. मुंबईत आल्यानंतर ती मराठी देखील शिकली आहे असे तिने एका मुलाखतीत नमूद केले. असिन ही आपल्या नावाचा अर्थ 'शुद्ध' किंवा 'पापरहित' असा सांगतात. तिच्या नावातील ’अ’(A)हे अक्षर संस्कृत मधून घेण्यात आले असून ’सिन’ (Sin-पाप) हे इंग्रजी भाषेतून घेतले आहे. दोहोंचा मिळून ’अ+सिन’, पापरहित असा होतो. चित्रपटात येण्यापूर्वी असिनने स्थानिक कंपन्यांच्या जाहिरातीतून काम केले आहे, तसेच काही नामांकित कंपन्यांची ती "ब्रँड अम्बॅसेडर" देखील आहे.
जाहिराती आणि ब्रँड अम्बॅसेडरशीप
[संपादन]- स्पिंझ ,टॅल्कम पावडर.
- मिरिंडा, शीतपेय.
- फेअरेव्हर,फेअरनेस क्रिम.
- बिगबझार,फॅशन@बीगबाजार.
- पॅराशुट, तेल(मॅरिको),हेअर ऑईल.
- क्लिनीक ऑल क्लिअर,हेअर शॅंपू.
- अरिआ ज्वेलरी,दागिने अलंकार.
- तनिश्क,दागिने अलंकार.
- टाटा स्काय,डी.टी.एच.सेवा.
- बिग ९२.७ एफ़.एम,रेडिओ सेवा.
- कोलगेट मॅक्सफ़्रेश,टूथपेस्ट.
- अमृतांजन,पेनबाम.
- शुअर डिओ,डिओडरंट स्प्रे.
चित्रपट कारकीर्द
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भदूवे
[संपादन]- http://en.wikipedia.org/wiki/Asin#References (ह्या लेखातील सर्व संदर्भ मूळ इंग्लिश भाषा व तमिळ लेखातून घेतले आहेत.)
बाह्य दुवे
[संपादन]- * इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील Asin चे पान (इंग्लिश मजकूर)
(आयएमडीबी वरील पृष्ठ)