नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे
जन्म नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे
फेब्रुवारी ५, इ.स. १९३६
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व मराठी
नागरिकत्व भारतीय
पेशा कीर्तनकार, प्रवचनकार
धर्म हिंदू
संकेतस्थळ
अधिकृत संकेतस्थळ

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबामहाराज सातारकर (फेब्रुवारी ५, इ.स. १९३६ - हयात) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत.

जीवन[संपादन]

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी, इ.स. १९३६ रोजी सातार्‍याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे [१]. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली होती. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे [२]. प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली. हरिविजय, भक्तिविजय या ग्रंथांवर ते प्रवचने करत असत. त्यांच्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र अप्पामहाराज सातारकर यांनी फडाची धुरा सांभाळली. इ.स. १९६२ साली अप्पामहाराजांचे निधन झाल्यावर अप्पामहाराजांचे पुतणे - नीळकंठ ज्ञानेश्वरांनी, अर्थात बाबामहाराज सातारकरांनी फडाची परंपरा सांभाळली.

संकीर्ण माहिती[संपादन]

सातारकर घराण्याचे आडनाव गोरे असे आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "अधिकृत संकेतस्थळ - व्यक्तिमत्त्व" (मराठी मजकूर). १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. 
  2. ^ "श्री बाबा महाराज सातारकर" (मराठी मजकूर). गौरांगप्रभू.ब्लॉगस्पॉट. ११ जुलै, इ.स. २०११. १३ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.