आर्जेन्टिना
आर्जेन्टिना República Argentina आर्जेन्टिना | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: En Unión y Libertad (अर्थ : एकतेत आणि स्वातंत्र्यात) | |||||
राष्ट्रगीत: ओइद मोर्तालेस, एल ग्रितो साग्रादो (मर्त्य मानवांनो, हा पवित्र घोष ऐका) | |||||
आर्जेन्टिनाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
ब्युनॉस आयर्स | ||||
अधिकृत भाषा | स्पॅनिश | ||||
सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | ख्रिस्तिना फर्नांदेझ दे कर्शनर | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | (स्पेनपासून) जुलै ९, १८१६ (घोषित) १९२१ (मान्यता) | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | २७,९१,८१० किमी२ (८वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १.१ | ||||
लोकसंख्या | |||||
- २००९ | ४,०१,३४,४२५ (३१वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १५/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ६३२.२२३ अब्ज[१] अमेरिकन डॉलर (२२वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | १४,०८७ अमेरिकन डॉलर (५०वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.८६९[२] (उच्च) (४९ वा) (२००७) | ||||
राष्ट्रीय चलन | पेसो (ARS) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | अर्जेन्टाईन प्रमाणवेळ (ART) (यूटीसी - ३:००) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | AR | ||||
आंतरजाल प्रत्यय | .ar | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ५४ | ||||
आर्जेन्टिना (स्पॅनिश: Argentina; उच्चार: आर्हेन्तिना (द.अ.) किंवा आर्खेन्तिना (स्पे.)) हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. ४ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २८ लाख चौरस किलोमीटर एवढे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अर्जेन्टिना दक्षिण अमेरिकेतील दुसरा तर जगातील आठवा मोठा देश आहे. या देशाचा धर्म ख्रिश्चन असून येथे स्पॅनिश व इटालियन भाषा बोलल्या जातात. फक्त दक्षिण अमेरिका खंडाचा विचार केल्यास हा देश आकाराने दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा देश बोलीव्हिया व केप हाॅर्नच्या मध्ये ३७०० किमी. लांब पसरलेला आहे. याची जास्तीत जास्त रुंदी १५०० किमी. आहे. अमेरिकेतील एका भव्य पर्वताचे '''अकंकागुआ''' नावाचे सर्वात उंच शिखर मात्र या देशात आहे. सन १८१६मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाले. जगातील डिएगो मॅराडोना, लायोनेल मेस्सी हे नाववंत फुटबॉलपटू याच देशातील आहेत. अर्जेन्टिनात कोळसा, शिसे, तांबे, जस्त, सोने, चांदी, निकेल व गंधकाचे साठे आहेत. हवाबंद डब्यात मांस भरून निर्यात करने, हा अर्जेन्टिनाचा प्रमुख उद्योग आहे.
इतिहास[संपादन]
नावाची व्युत्पत्ती[संपादन]
अर्जेन्टिना हे नाव लॅटिन भाषेतील argentum (चांदी) ह्या शब्दापासून तय्यार झाले आहे. अर्जेन्टिना ह्या शब्दाचा पहिला लिखित स्वरूपात असलेला उल्लेख La Argentina (१६०२) नामक Martín del Barco Centeneraच्या कवितेत सापडतो. अर्जेन्टिना हे नाव १८व्या शतकापर्यंत चलनात आले. इ.स. १८२६ च्या संविधानामध्ये प्रथम Argentine Republic ह्या नावाचा उल्लेच सरकारी दस्तऐवजामध्ये दिसतो.
प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]
स्पॅनिश साम्राज्याचा भाग[संपादन]
Amerigo Vespucci अमेरिगो वेस्पुचीच्या इ.स. १५०२ मधील जलप्रवासासोबत युरोपीय लोक पहिल्यांदी अमेरिकी खंडाच्या ह्या भागात आले. Juan Díaz de Solís आणि Sebastian Cabot सारखे दर्यावर्दी या भागात इ.स. १५१६ आणि इ.स. १५२६ साली अनुक्रमे आले. १५३६ मध्ये पेद्रो दे मेंडोसा (Pedro de Mendoza) ने ब्युनॉस आयर्स नामक एक छोटी वसाहत स्थापन केली. पण ही वसाहत इ.स. १५४१ मध्ये नष्ट केली गेली.
भूगोल[संपादन]
चतुःसीमा[संपादन]
अर्जेन्टिनाच्या उत्तरेस पेराग्वे व बोलीव्हिया, ईशान्येस ब्राझील व उरुग्वे, पश्चिमेस चिली हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस अटलांटिक महासागर आहे. अर्जेन्टिनाचे क्षेत्रफळ २८ लाख चौरस किलोमीटर एवढे आहे. पॅराग्वे आणि उरुग्वे ह्या अर्जेन्टिनामधील दोन महत्त्वाच्या नद्या आहेत.
राजकीय विभाग[संपादन]
अर्जेन्टिना २३ प्रांत आणि एक स्वायत्त शहर (ब्युनॉस आयर्स) असलेले संघराज्य आहे. प्रांतांना प्रशासकीय कामांसाठी विभागांमध्ये विभागले आहे.
मोठी शहरे[संपादन]
ब्युनॉस आयर्स[संपादन]
ब्युनॉस आयर्स ही अर्जेन्टिनाची राजधानी आणि देशातील सर्वात मोठे शहर आहे. त्यासोबतच ब्युनॉस आयर्स हे दक्षिण अमेरिकेतील दुसरे सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. बृहन ब्युनॉस आयर्स हे शहर ब्युनॉस आयर्स प्रांताचा भाग किंवा राजधानी नाही आहे. हे शहर अर्जेन्टिनातील एकमेव स्वायत्त शहर आहे. सन १८८०मध्ये ब्युनॉस आयर्स शहराला ब्युनॉस आयर्स प्रांतातून बाहेर काढले.
मेक्सिको शहर आणि साओ पाओलो सोबत ब्युनॉस आयर्स, हे लॅटिन अमेरिकेतील ३ मोठ्या शहरांपैकी एक आहे. ब्युनॉस आयर्सच्या रहिवाशांना अनेकदा पोर्तेन्योस (Porteños)ही म्हणतात. Porto म्हणजे बंदर आणि ब्युनॉस आयर्स हे बंदराचे शहर आहे.
कोर्दोबा[संपादन]
कोर्दोबा हे शहर अर्जेन्टिनाचे दुसरे सर्वात मोठे शहर आणि कोर्दोबा प्रांताची राजधानी आहे. कोर्दोबा अर्जेन्टिनाच्या जवळपास मध्यभागी आहे. हे शहर ब्युनॉस आयर्सपासून ७०० किमी वायव्य दिशेला आहे. २००१ च्या जनगणनेनुसार कोर्दोबाची लोकसंख्या १३ लाख एवढी आहे. कोर्दोबाची स्थापना ६ जुलै १५७३ साली खेरोनिमो लुइस दे कॅब्रेराने केली.
समाजव्यवस्था[संपादन]
वस्तीविभागणी[संपादन]
===धर्म===bhugolic sthiti
शिक्षण[संपादन]
संस्कृती[संपादन]
राजकारण[संपादन]
अर्थतंत्र[संपादन]
संदर्भ[संपादन]
- ^ "Argentina". 2010-10-06 रोजी पाहिले.
- ^ Human Development Report 2009. The United Nations. Retrieved 5 October 2009.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- सरकारी संकेतस्थळ
- Argentina at UCB Libraries GovPubs
- LANIC Argentina page
- आर्जेन्टिनाचे विकिमिडिया अॅटलास
विकिव्हॉयेज वरील आर्जेन्टिना पर्यटन गाईड (इंग्रजी)