भगिनी निवेदिता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भगिनी निवेदिता
भगिनी निवेदिता
भगिनी निवेदिता
जन्म मार्गारेट नोबल
२८ ऑक्टोबर १८६७
मृत्यू १३ ऑक्टोबर १९११

भगिनी निवेदिता (१८६७–१९११), या लेखिका, शिक्षिका, एक सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य होत्या.मार्गारेट एलिझाबेद नोबल असे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव. भारतात आल्यावर स्वामी विवेकानंद यांनी त्याना संन्यासदीक्षा दिली, त्यानंतर त्यांचे नाव भगिनी निवेदिता असे झाले.उत्तर आयर्लंड येथे मार्गारेट चा जन्म झाला.(सन २०१६ हे वर्ष निवेदितांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.) नोबल कुटुंब हे धर्मजिज्ञासा, सुशीलता आणि सात्विकता यांच्याविषयी प्रसिद्ध होते.मार्गारेटचे प्राथमिक शिक्षण मेंचेस्टर येथे झाले. स्वदेशाविषयी प्रेम, स्वदेश स्वातंत्र्य विषयी लढा आणि जगातील विविध प्रश्न आणि तेथे उत्पन्न होणा-या विविध विचारसरणी यांचा परिणाम तिच्या मनावर होत होता.वडिलांच्या निधनानंतर तिने आपले शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर ति लंडन येथे आली व शिक्षिका म्हणून काम करू लागली.हस्त-खेळत बालशिक्षण या नव्या प्रयोगाकडे तिचे लक्ष वेधले गेले आणि तिने त्याचा सखोल अभ्यास केला.शिक्षण क्षेत्रातील अधिकाधिक प्रगती कळावी यासाठी तिने 'सिसेम' मंडळाचे सदस्यत्व घेतले आणि त्यात सक्रीय सहभागही घेतला.१८९४ च्या सुमारास क्रांतीकार्यासाठी 'सिनफेन' नावाचा पक्ष कार्यरत झाला आणि मार्गारेटणे त्यातही सहभाग घेतला. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत भारतीय तत्वविचार मांडून स्वत:ची छाप उमटविली आणि त्यांचे कौतुक सर्वदूर झाले. त्यानंतर काही काळाने स्वामीजी लंडन येथे आले. त्यांची व्याख्याने ऐकायला मार्गारेट जावू लागली.स्वामी विवेकानंद यांच्या तत्वविचारांचे आकर्षण तिला वाटू लागले. एक आदर्श दार्शनिक म्हणून स्वामीजींकडे ती आदराने पाहू लागली. आणि त्यामुळेच ती त्यांना अल्पावधीतच सद्गुरू असे संबोधू लागली.मानवामध्ये चारित्र्य घडण करणारे शिक्षण स्वामीजीना अपेक्षित होते, त्यासाठी महान निश्चयाने कार्य करू शकणा-या व्यक्ती त्याना हव्या होत्या. त्यांच्या या आवाहनाला मार्गारेटणे प्रतिसाद दिला आणि स्वामीजींच्या कार्यात सहभागी होण्याची तिने मनापासून तयारी दाखविली.{१}

संदर्भ व नोंदी==[संपादन]

१. विवेकानंद कन्यां- भगिनी निवेदिता (वि.वि. पेंडसे) ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन

चरित्रे[संपादन]

भगिनी निवेदिता यांची चरित्रे अनेकांनी लिहिली आहेत, त्यांपैकी काही ही :-

  • अग्निशिखा भगिनी निवेदिता (प्रा. प्रमोद डोरले)
  • भगिनी निवेदिता (म.ना. जोशी)
  • भगिनी निवेदिता (सविता ओगीराल)
  • भगिनी निवेदिता (सुरेखा महाजन)
  • भगिनी निवेदिता संक्षिप्त चरित्र व कार्ये (काशिनाथ विनायक कुलकर्णी).
  • विवेकानंद कन्यां- भगिनी निवेदिता (वि.वि. पेंडसे) ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन

भगिनी निवेदिता -एक चिंतन ( दिलीप कुलकर्णी ,संध्या गुळवणी, चारुता पुराणिक) ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.