आकाशगंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आकाशगंगा
ESO-VLT-Laser-phot-33a-07.jpg
रात्रीच्या आकाशातील पॅरनाल वेधशाळेवरील आकाशगंगेचे केंद्रक
निरीक्षण डेटा (J2000 युग)
प्रकार Sb, Sbc, किंवा SB(rs)bc[१][२] भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका
वस्तुमान ०.८–१.५×१०१२[३][४][५] M
आकार (प्रकाशवर्ष) १००–१८० kly (३१–५५ kpc)[६] (व्यास)
ताऱ्यांची संख्या १००–४०० अब्ज (२.५×१०११ ±१.५×१०११)[७][८][९]
हेही पहा: दीर्घिका

आकाशगंगा हे, सूर्यमाला आणि पर्यायाने पृथ्वी ज्या दीर्घिकेमध्ये आहे, त्या दीर्घिकेचे नाव आहे. तिचे इंग्रजी नाव Milky Way (मिल्की वे) अर्थात दुधट (दुधी रंगाचा) मार्ग असे आहे. अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून एक दुधाळ रंगाचा प्रवाह दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा. हंस, वृषपर्वा, देवयानी, ययाती, ब्रह्महृदय, पुनर्वसू, मृग, नौका, वृश्चिक, धनु आणि गरुड या तारकासमूहातून ही आकाशगंगा पसरत गेली आहे.

सूर्यमाला ही आकाशगंगेच्या मध्यापासून बाहेरील बाजूस सुमारे दोन तृतीयांश अंतरावर आहे, तर सूर्य साधारण २७००० प्रकाशवर्षे दूर आहे.[१०] सूर्याजवळ आकाशगंगेची जाडी २००० प्रकाशवर्षे आहे.[११][१२]

सूर्य, या आकाशगंगेच्या केंद्राभोवती परिभ्रमण करण्यासाठी पृथ्वीची २२.५ ते २५ कोटी वर्षे एवढा काळ घेतो. इंग्रजीत हा काळ गॅलॅक्टिक इयर म्हणून ओळखला जातो.

आकाशगंगा ही अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. विश्वाच्या तुलनेत आकाशगंगेचा आकार जरी लहान असला तरी तिच्यात अब्जावधी (सुमारे २५० अब्ज) तारे आहेत. आकाशगंगेचे विशाल स्वरूप, तिचा वैशिष्ट्यपूर्ण आकार, व त्यामधील आश्चर्यकारक तेजोमेघ या सर्व गोष्टी विलक्षण आहेत.

विश्वामध्ये एकाहून अधिक आकाशगंगा असाव्यात. संस्कृतमध्ये आकाशगंगेला दुसरे नाव मंदाकिनी असे आहे.[ संदर्भ हवा ]

आकाशगंगेचा जन्म[संपादन]

ग्रीक लोककथा[संपादन]

एके काळी ज्युपिटर देवाच्या पट्टराणीचा, जुनोचा मुलगा हर्क्युलस हा अतिशय अवखळ आणि खोडकर होता. एके दिवशी जुनो हर्क्युलसला स्तनपान करीत असतानाही त्याचा अवखळपणा चालू होता. त्यावेळी जुनोच्या स्तनामधून दुधाचा प्रवाह जो उसळला तो थेट स्वर्गामधून वाहू लागला. अजूनही तो दुधी रंगाचा पट्टा आपल्याला आकाशात दिसतो. ग्रीक लोकांनी त्या पट्ट्याला "दुग्ध मार्ग", "मिल्की वे" असे नाव ठेवले.

संदर्भ[संपादन]

 1. ^ Gerhard, O. (2002). "Mass distribution in our Galaxy". Space Science Reviews (इंग्रजी मजकूर) 100 (1/4): 129–138. arXiv:astro-ph/0203110. डी.ओ.आय.:10.1023/A:1015818111633. बिबकोड:2002astro.ph..3110G. 
 2. ^ हार्मुट फ्रॉमर्ट, ख्रिस्तीन क्रोनबर्ग (२६ ऑगस्ट, २००५). "क्लासिफिकेशन ऑफ द मिल्की वे गॅलॅक्सी". SEDS (इंग्रजी मजकूर). 2015-05-30 रोजी पाहिले. 
 3. ^ McMillan, P. J. (July 2011). "Mass models of the Milky Way". Monthly Notices of the Royal Astronomical Society (इंग्रजी मजकूर) 414 (3): 2446–2457. arXiv:1102.4340. डी.ओ.आय.:10.1111/j.1365-2966.2011.18564.x. बिबकोड:2011MNRAS.414.2446M. 
 4. ^ Kafle, P.R.; Sharma, S.; Lewis, G.F.; Bland-Hawthorn, J. (2012). "Kinematics of the Stellar Halo and the Mass Distribution of the Milky Way Using Blue Horizontal Branch Stars". The Astrophysical Journal (इंग्रजी मजकूर) 761 (2): 17. arXiv:1210.7527. डी.ओ.आय.:10.1088/0004-637X/761/2/98. बिबकोड:2012ApJ...761...98K. 
 5. ^ Kafle, P.R.; Sharma, S.; Lewis, G.F.; Bland-Hawthorn, J. (2014). "On the Shoulders of Giants: Properties of the Stellar Halo and the Milky Way Mass Distribution". The Astrophysical Journal (इंग्रजी मजकूर) 794 (1): 17. arXiv:1408.1787. डी.ओ.आय.:10.1088/0004-637X/794/1/59. बिबकोड:2014ApJ...794...59K. 
 6. ^ शॅनन हॉल (०४-०५-२०१५). "साईझ ऑफ द मिल्की वे अपग्रेडेड, सॉल्व्हिंग गॅलॅक्सी पझल" (इंग्रजी मजकूर). Space.com. 2015-06-09 रोजी पाहिले. 
 7. ^ "NASA – Galaxy". NASA and World Book (इंग्रजी मजकूर). Nasa.gov. November 29, 2007. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक April 12, 2009 रोजी मिळविली). December 6, 2012 रोजी पाहिले. 
 8. ^ Staff (December 16, 2008). "How Many Stars are in the Milky Way?" (इंग्रजी मजकूर). Universe Today. August 10, 2010 रोजी पाहिले. 
 9. ^ Odenwald, S. (१७ मार्च, २०१४). "Counting the Stars in the Milky Way" (इंग्रजी मजकूर). The Huffington Post. June 9, 2014 रोजी पाहिले. 
 10. ^ Gillessen, S. et al. (2009). "Monitoring stellar orbits around the massive black hole in the Galactic Center". Astrophysical Journal (इंग्रजी मजकूर) 692 (2): 1075–1109. arXiv:0810.4674. डी.ओ.आय.:10.1088/0004-637X/692/2/1075. बिबकोड:2009ApJ...692.1075G. 
 11. ^ Coffey Jeffrey. "How big is the Milky Way?" (इंग्रजी मजकूर). Universe Today. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक September 24, 2013 रोजी मिळविली). November 28, 2007 रोजी पाहिले. 
 12. ^ Rix, Hans-Walter; Bovy, Jo (2013). "The Milky Way's Stellar Disk". The Astronomy and Astrophysics Review (इंग्रजी मजकूर). in press. arXiv:1301.3168. डी.ओ.आय.:10.1007/s00159-013-0061-8. बिबकोड:2013A&ARv..21...61R.