थियोडोर रूझवेल्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
थियोडोर रूझवेल्ट
थियोडोर रूझवेल्ट


सही थियोडोर रूझवेल्टयांची सही

थियोडोर रूझवेल्ट (इंग्लिश:Theodore Roosevelt) (ऑक्टोबर २७, इ.स. १८५८:न्यू यॉर्क - जानेवारी ६, इ.स. १९१९:ऑइस्टर बे, न्यूयॉर्क) हे अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष होते.

परिचय[संपादन]

थियोडोर रूझवेल्ट हे मूळचे जमीनदार होते. संशोधक आणि लेखक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांना शिकारीचा छंद होता. राजकारणी आणि मुत्सद्दी म्हणून त्यांची कारकिर्द उल्लेखनीय आहे. थियोडोर रूझवेल्ट हे न्यूयॉर्कचे राज्यपाल म्हणून काम करत असतानाच अमेरिकेच्या उपाध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. विल्यम मॅक्कीन्लेंच्या हत्येनंतर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले.

कामगिरी[संपादन]

इ.स. १८९८ साली स्पेनबरोबर अमेरिकेच्या झालेल्या युद्धात थियोडोर रूझवेल्ट यांनी रफ रायडर्स नावाची पलटण तयार केली होती. रशिया-जपान युद्ध थांबवण्यात थियोडोर रूझवेल्ट यांनी केलेली कामगिरी विशेष महत्वाची मानली जाते. या कामगिरीच्या सन्मानार्थ इ.स. १९०५ सालचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार त्यांना देण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.