Jump to content

कोरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोरिया
कोरिया
कोरिया
क्षेत्रफळ २,१९,१४० चौरस किमी
लोकसंख्या ७.३ कोटी
स्वतंत्र देश

कोरिया (कोरियन: 한국) हा पूर्व आशियामधील एक भूभाग आहे जो सध्या उत्तरदक्षिण कोरिया ह्या दोन सार्वभौम देशांमध्ये विभागला गेला आहे. कोरियन द्वीपकल्पावर वसलेल्या कोरियाच्या वायव्येस चीन तर ईशान्येस रशिया देश आहेत. आग्नेयेस प्रशांत महासागराचे कोरिया सामुद्रधुनीजपानचा समुद्र कोरियाला जपानपासून वेगळे करतात. कोरियाच्या दक्षिणेस पूर्व चिनी समुद्र आहे.

प्रागैतिहासिक काळापासून लोकजीवन असलेल्या कोरियावर सुरुवातीच्या काळात चीनी संस्कृतीचा मोठा पगडा होता. प्राचीन कोरियावर इ.स. पूर्व ५७ ते इ.स. ९३५ दरम्यान सिल्ला, इ.स. १३९२ पर्यंत कोर्यो तर इ.स. १३८८ ते इ.स. १८९७ सालापर्यंत चोसून ह्या साम्राज्यांची सत्ता होती. १९व्या शतकाच्या अखेरीस जपानी साम्राज्याने कोरियावर कब्जा केला व कोरियाला एक मांडलिक राष्ट्र बनवले. तेव्हापासून दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानच्या पराभवापर्यंत कोरिया साम्राज्यवादी जपानच्या ताब्यात होता.

१९४५ साली अमेरिकासोव्हिएत संघाने कोरियाची फाळणी करण्याचे निश्चित केले व ३८ रेखांशाला धरून कोरियाचे दोन तुकडे करण्यात आले. उत्तरेला सोव्हिएत संघाच्या पाठिंब्यावर कम्युनिस्ट तर दक्षिण भागात अमेरिकेच्या पाठिंब्यावर भांडवलशाही देशांची स्थापना झाली.