Jump to content

के. कामराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कुमारस्वामी कामराज या पानावरून पुनर्निर्देशित)
के. कामराज

कार्यकाळ
१९५४ – १९६३
मागील सी. राजगोपालाचारी
पुढील एम. भक्तवत्सलम

संसद
नागरकोविल साठी
कार्यकाळ
१९६७ – १९७५
मागील ए. नेसामोनी
पुढील कुमारी अनंतन

कार्यकाळ
१९६३ – १९६७
मागील नीलम संजीव रेड्डी
पुढील एस. निजलिंगप्पा

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ओ) चे पक्षाध्यक्ष
कार्यकाळ
१९६७ – १९७१
मागील कोणीही नाही
पुढील मोरारजी देसाई

जन्म १५ जुलै १९०३ (1903-07-15)
विरुधु नगर, मद्रास प्रांत
मृत्यू २ ऑक्टोबर, १९७५ (वय ७२)
चेन्नई
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सही के. कामराजयांची सही
के. कामराज यांचा मरिना बीचवरील पुतळा

कुमारसामी कामराज (तमिळ: காமராசர்; १५ जुलै १९०३ - २ ऑक्टोबर १९७५) हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यसेनानी राहिलेले कामराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते होते.ते संविधान सभेचे सदस्य होते[] १९५४ ते १९६३ दरम्यान तमिळनाडूचे मुख्यमत्रीपद व जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या कामराजांनी १९६७ साली इंदिरा गांधींनी काँग्रेस (आय) हा नवा पक्ष स्थापन केल्यानंतर उर्वरित काँग्रेस पक्षाचे नेतेपद सांभाळले. त्यांच्या मृत्यूनंतर १९७६ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न पुरस्कार दिला.

तमिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रियता कमावलेल्या कामराज ह्यांच्या आदराप्रित्यर्थ चेन्नईच्‍या अंतर्देशीय टर्मिनलला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

पूर्व जीवन

[संपादन]

के कामराज यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. कामराज फक्त ११ वर्षांचे होते तेव्हापासून त्यांनी काम करायला सर्वात केली.ते बातमीपत्र वाचून ज्ञान मिळवत[]

राजनीतिक कारकीर्द

[संपादन]

१३ एप्रिल १९५४ला के.कामराज मद्रास (आतचे तामिळनाडू )चे मुख्यमंत्री बनले. स्वतंत्र भारतामध्ये शाळेमध्ये मध्याअन्न भोजनची याजना सुरू करणारे ते पहिले मुख्यमंत्री होते.ते तीनवेळा मद्रासचे मुख्यमंत्री राहिले.१९६६ मध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आग्रह होता की के. कामराज यांनी देशाचा पंतप्रधान बनाव पण कामराज यांनी मला पंतप्रधान बानायच नाही असे ठाम मत ठेवले []लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधीला पंतप्रधान बंवन्यामध्ये के कामराज यांची भूमिका होती ते त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व व स्वभाव साधा आणि प्रामाणिक होता[]

भूषविलेले पदे

[संपादन]
  • १९४० ते १९५४ - तामिळनाडू काँग्रेस समिती अध्यक्ष .
  • १९४६ - भारतीय संविधान मसुदा समितीचे सदस्य.
  • १९५२ - लोकसभेचे खासदार.
  • १९५४ - माद्रसचे मुख्यमंत्री.
  • १९६३ काँग्रेसचे अध्यक्ष[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ www.theprint.in/politics/k-kamaraj-the-southern-stalwart-who-gave-india-two-pms/127890/%3famp
  2. ^ https://www.theprint.in/politics/k-kamaraj-the-southern-stalwart-who-gave-india-two-pms/127890/%3famp
  3. ^ https://www.thewirehindi.com/article/veteran-congress-leader-k-kamaraj-legacy/13358/amp[permanent dead link]
  4. ^ https://timesofindia.indiatimes.com/readersblog/the-bookish-nerd/k-kamaraj-the-must-needed-lesson-for-inc-23243/
  5. ^ "संग्रहित प्रत". 2020-10-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-12 रोजी पाहिले.