रेखा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रेखा
रेखा
जन्म भानुरेखा जेमिनी गणेशन
१० ऑक्टोबर, १९५४ (1954-10-10) (वय: ६५)
चेन्नई, तमिळनाडू
इतर नावे रेखा
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ इ.स. १९६६ - सद्य
वडील जेमिनी गणेशन
आई पुष्पवल्ली

भानुरेखा गणेशन ऊर्फ रेखा ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. रेखाने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका केल्या. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फटाकडी' या मराठी चित्रपटामध्ये 'कुठं कुठं जायाचं हनिमुनला..' या लावणीवर तिने केलेले नृत्य प्रचंड गाजले. रेखा ही राज्यसभा सदस्य आहे. राष्ट्रपतींच्या विशेष अधिकाराने मे २०१२ मध्ये तिची राज्यसभेवर नेमणूक झाली.

व्यक्तिगत परिचय[संपादन]

रेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ साली चेन्नईत झाला. तिचे वडील जेमिनी गणेशन तमिळ अभिनेते होते आणि आई पुष्पावली तेलुगू अभिनेत्री होती.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

१९६६ पासून तिने सिनेमात काम करायला सुरावात केली. रंगूला रत्नम नावाच्या तेलुगू सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका केली. १९७० मध्ये सावन भादों या चित्रपटापासून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि कानडी भाषेत १८० हून अधिक सिनेमामंध्ये काम केले आहे. त्यांना चित्रपट क्षेत्रात अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत.

‘खूबसूरत, खून भरी मांग, खिलाडियों का खिलाडी, उत्सव, मुकद्दर का सिकंदर आणि उमराव जान’ या चित्रपटांमधील रेखाच्या भूमिका विशेष गाजल्या.

निवडक चित्रपट[संपादन]

Translation arrow-indic.svg
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.पुरस्कार[संपादन]

रेखाला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतले उल्लेखनीय पुरस्कार :

रेखाचे चरित्रग्रंथ[संपादन]

  • Rekha: The Untold Story (लेखक : उस्मान यासीर). सायन पब्लिकेशनने या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे.
  • Eurekha! The Intimate Life Story Of Rekha (इंग्रजी, लेखक : मोहन दीप)

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]