संयुक्त राष्ट्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संयुक्त राष्ट्र संघटना
الأمم المتحدة
United Nations
Organisation des Nations Unies
联合国
Organización de las Naciones Unidas
Организация Объединённых Наций
Flag of the United Nations.svg
संयुक्त राष्ट्र संघटनेचा ध्वज
United Nations (Member States and Territories).svg
स्थापना २४ ऑक्टोबर, इ.स. १९४५
मुख्यालय न्यू यॉर्क शहर, Flag of the United States अमेरिका
सदस्यत्व
१९३ सदस्य देश (संपूर्ण यादी)
अधिकृत भाषा
अरबी, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश
सरचिटणीस
पोर्तुगाल एंटोनियो गुटेरेश
अध्यक्ष
स्वित्झर्लंड [जोसेफ डाईस]
संकेतस्थळ www.un.org

संयुक्त राष्ट्रसंघ किंवा संयुक्त राष्ट्रे (संरा) (इंग्रजी: United Nations) ही आंतरराष्ट्रीय विधी, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानवाधिकार या बाबींमध्ये सहकार्य सुलभ करणे आणि विश्वशांती प्राप्त करणे अशी घोषित उद्दिष्टे असलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 'संरा'ची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाच्या जागी देशा-देशांमधील युद्धे थांबविण्यासाठी आणि संवादासाठी अधिष्ठान पुरविण्याच्या उद्देशाने झाली होती. ही संस्था स्थापन करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला होता, पण भारताचे या संस्थेच्या कामापासून नेहमी अलिप्त राहण्याचे धोरण राहिले आहे. आपले कार्यक्रम रावबिण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक दुय्यम संस्था आहेत.[ संदर्भ हवा ]

जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत. जगभरात असलेल्या कार्यालयांमधून वर्षभरात होणाऱ्या नियमित बैठकांमधून ’संरा’ आणि तिच्या खास संस्था सारलक्षी आणि प्रशासकीय बाबींवर निर्णय घेतात. संस्थेची सहा मुख्य उपांगे आहेत : आमसभा (मुख्य चर्चाकारी सभा); सुरक्षा परिषद (शांती आणि सुरक्षेसाठीचे विवक्षित ठराव करणारी); आर्थिक व सामाजिक परिषद (आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक सहकार्य व विकासास चालना देण्यात सहकार्यासाठी); सचिवालय (’संरा’ला आवश्यक अभ्यासकार्ये, माहिती आणि सुविधा देण्यासाठी); आंतरराष्ट्रीय न्यायालय (प्रमुख न्यायिक अंग) आणि ’संरा’ विश्वस्त संस्था (सध्या अक्रिय). ’संरा’ व्यवस्थेतील इतर प्रमुख संस्थांमध्ये विश्व स्वास्थ्य संघटना, विश्व अन्न कार्यक्रम आणि युनिसेफ यांचा समावेश *होतो. महासचिव ही ’संरा’ची सर्वात ठळक व्यक्ती असते आणि २००७ मध्ये हे पद दक्षिण कोरियाचे बान की-मून यांनी मिळविले. सदस्य राष्ट्रांकडून मिळणाऱ्या निर्धारित आणि ऐच्छिक देणग्यांमधून संस्थेला वित्तपुरवठा होतो आणि अरेबिक, चिनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या तिच्या सहा अधिकृत भाषा आहेत. ही विश्वसंघटना आहे. सचिवालयातील मुख्य हा महासचिव आहेसयुक राज्यशांतता प्रशापित करतात.[ संदर्भ हवा ]

राष्ट्रसंघाची उद्दीष्टे[ संदर्भ हवा ][संपादन]

राष्ट्रसंघ कशासाठी स्थापन झाला, त्याचे हेतू व उद्दिष्टे काय आहेत हे राष्ट्रसंघाच्या घटनेत स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्यांची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे-

  • जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करणे
  • राष्ट्राराष्ट्रांत मैत्रीचे व सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे.
  • आंतरराष्ट्रीय प्रश्न युद्धाच्या मार्गाने न सोडविता ते शांततेच्या मार्गाने सोडविणे.
  • राष्ट्रसंघातील सर्व राष्ट्रे सार्वभौम व स्वतंत्र आहेत आणि त्यांनी सामुदायिक सुरक्षिततेसाठी राष्ट्रसंघाचे नियम पाळावेत.
  • आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करावे. ांतता प्रस्थापित करणे. श

२०१५ला या संघटनेला ७० वर्ष पूर्ण झाले

विशेष संस्था[संपादन]

खालील १७ संयुक्त राष्ट्रांच्या विशेष समित्या आहेत.

क्र. संक्षेप ध्वज समिती मुख्यालय स्थापना
FAO
Food and Agriculture Organization
खाद्य व कृषी संस्था इटली रोम इ.स. १९४५
IAEA
International Atomic Energy Agency
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था ऑस्ट्रिया व्हियेना इ.स. १९५७
ICAO
International Civil Aviation Organization
आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था कॅनडा माँत्रियाल इ.स. १९४७
IFAD
International Fund for Agricultural Development
आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी इटली रोम इ.स. १९७७
ILO आंतरराष्ट्रीय मजूर संस्था स्वित्झर्लंड जिनिव्हा इ.स. १९१९
IMO
International Maritime Organization
आंतरराष्ट्रीय सागरी संस्था युनायटेड किंग्डम लंडन इ.स. १९४८
IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अमेरिका वॉशिंग्टन, डी.सी. इ.स. १९४५
ITU आंतरराष्ट्रीय दूरध्वनी संघ स्वित्झर्लंड जिनिव्हा इ.स. १९४७
UNESCO
United Nations Educational, Scientific and Cultural Organization
युनेस्को फ्रान्सपॅरिस इ.स. १९४६
१० UNIDO संयुक्त राष्ट्रे औद्योगिक विकास संस्था ऑस्ट्रिया व्हियेना इ.स. १९६७
११ UPU
Universal Postal Union
जागतिक पोस्ट संघ स्वित्झर्लंड बर्न इ.स. १९४७
१२ WB विश्व बँक अमेरिका वॉशिंग्टन, डी.सी. १९४५
१३ WFP
World Food Programme
विश्व खाद्य कार्यक्रम इटली रोम इ.स. १९६३
१४ WHO
World Health Organization
विश्व स्वास्थ्य संस्था स्वित्झर्लंड जिनिव्हा १९४८
१५ WIPO
World Intellectual Property Organization
विश्व बौद्धिक संपदा संस्था स्वित्झर्लंड जिनिव्हा इ.स. १९७४
१६ WMO
World Meteorological Organization
विश्व हवामान संस्था स्वित्झर्लंड जिनिव्हा इ.स. १९५०
१७ UNWTO
World Tourism Organization
विश्व पर्यटन संस्था स्पेन माद्रिद इ.स. १९७४

संयुक्त राष्ट्रे खालील संस्थांमार्फत मानव विकासाचे कार्य बघतात:[संपादन]

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: