ह्यू जॅकमॅन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ह्यू जॅकमन या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्यू जॅकमॅन
२०१७ बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये लोगन चित्रपटाच्या जागतिक प्रीमिअरच्या वेळी ह्यू जॅकमॅन
जन्म ह्यू मायकल जॅकमॅन
१२ ऑक्टोबर, १९६८ (1968-10-12) (वय: ४९)
सिडनी, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया
शिक्षण वेस्टर्न ऑस्ट्रेलियन ॲकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌स
युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, सिडनी (बी.ए.)
पेशा
  • अभिनेता
  • गायक
  • निर्माता
कारकिर्दीचा काळ १९९४ - आता
जोडीदार डेबोरा ली फर्नेस (१९९६ - आता)
अपत्ये

ह्यू मायकल जॅकमॅन (जन्म १२ ऑक्टोबर १९६८) एक ऑस्ट्रेलियन अभिनेता, गायक आणि निर्माता आहेत. त्यांनी मोठ्या सिनेमांमधील भूमिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त केली आहे. त्यांना ॲक्शन/सुपरहीरो, ऐतिहासिक आणि रोमँटिक भूमिकांसाठी ओळखले जाते. विशेषत: एक्स-मेन चित्रपट मालिकांमधील वोल्व्हरीन हे पात्र दीर्घकाळ साकारण्यासाठी ते जगभर ओळखले जातात. त्याचबरोबर केट अँड लिओपोल्ड (२००१), व्हॅन हेल्सिंग (२००४), द प्रेस्टिज (२००६) आणि ऑस्ट्रेलिया (२००८) या चित्रपटातील प्रमुख भूमिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.