पांडुरंग वैजनाथ आठवले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पांडुरंगशास्त्री आठवले या पानावरून पुनर्निर्देशित)
पांडुरंगशास्त्री आठवले
चित्र:Pandurang Shastri Athavale, (1920-2003).jpg
दादाजी
मूळ नाव पांडुरंगशास्त्री वैजनाथशास्त्री आठवले
जन्म ऑक्टोबर १९ इ.स. १९२०
रोहा, महाराष्ट्र
निर्वाण ऑक्टोबर २५ इ.स. २००३
मुंबई, महाराष्ट्र
भाषा मराठी
वडील वैजनाथशास्त्री आठवले
आई पार्वती आठवले
पत्नी निर्मला ताई
अपत्ये जयश्री तळवळकर (मानसकन्या)


पांडुरंगशास्त्री आठवले (ऑक्टोबर १९, १९२० - ऑक्टोबर २५, २००३) हे मराठी तत्त्वज्ञ होते. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक होते. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.

जीवन[संपादन]

पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म ऑक्टोबर १९, १९२० रोजी रोहे या कोकणातील गावी झाला. पारंपारिक शिक्षणाबरोबर 'सरस्वती संस्कृत पाठशाळेत' संस्कृत व्याकरणाबरोबर न्याय, वेदांत, साहित्य, त्याचबरोबर इंग्लिश भाषा साहित्याचा अभ्यास पांडूरंगशास्त्री यांनी केला. त्यांना रॉयल ऐशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सभासद पद देऊन सन्मानीत केले होते. या ग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्व मानव्य शाखेतील प्रमुख लेखकांचे, ग्रंथाचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे यावर चिंतन केले. श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत (माधवबाग मुंबईत) पांडुरंगशास्त्री यांनी पवित्र व्यासपिठावरुन नियमितपणे न चुकता वैदिकांचा तेजस्वी जीवनवाद, way of life, way of worship & way of thinking याचा विचार सतत दिला.

पुरस्कार[संपादन]

इ.स. १९९२ मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला तो पुरस्कार देतांना तेव्हाचे राज्यपाल चिदंबरम सुब्रमणियम म्हणाले होते ' विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षीत राहते. पांडुरंग शास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील दैदीप्यमान आशेचा किरण आहेत[१]

संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]